14/10/2016
मधुमेह (डायबिटीस)
==============
मधुमेह (डायबिटीस) एक असा आजार आहे, जो वयाच्या कोणत्याही वर्षी शरीराला जडू शकतो. यापासून दूर राहण्यासाठी वेळोवेळी आपल्या रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे. अनेक वर्ष रक्ताची तपासणी न केल्यामुळे तुम्ही या आजारापासून अनभिज्ञ राहू शकता. तपासणीनंतर तुम्हाला डायबेटीस आहे,असे समजल्यास घाबरून जाऊ नका. हा असाध्य आजार नाही. नियमित दिनचर्या आणि योग्य उपचाराद्वारे या आजारावर नियंत्रण शक्य आहे. एका सर्वेक्षणानुसार २०२५ पर्यंत संपूर्ण जगात 33.3 कोटी लोक डायबेटीसचे रुग्ण असतील.
मधुमेहाची लक्षणे
खूप तहान लागणे, वारंवार अथवा रात्री लघवीला जावे लागणे, भूक जास्त लागूनही जेवण न जाणे, किंबहुना वजन घटणे आणि अशक्तपणा जानवणे. मधुमेहींना अर्धांगवायू व हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. तोंड गोड होणे, कानात मळ वाढणे, शरीरावरील मळ व चिकटपणा वाढणे, हातपाय बधीर होणे, मुंग्या येणे, अंग शिथिल होणे, गार पदार्थ आवडणे, हातापायांची जळजळ होणे, रक्तामध्ये साखर वाढण्याच्या आधी ही लक्षणे पूर्वरूप म्हणून निर्माण होतात.
1. मधुमेह, महिलांच्या मासिक चक्राला आणि काम इच्छेलाही प्रभावित करतो. डायबिटीस पिडीत व्यक्तीच्या नाड्या क्षतिग्रस्त होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे त्यांना कामोत्तेजना उशिरा होणे, परमोच्च आनंद मिळण्यात अडचण इ. लक्षणे दिसून येतात. डायबिटीस नियंत्रणात ठेवल्यास हे विकार ठीक होऊ शकतात किंवा यावर उपचार करणे शक्य आहे.
2. किडनी फेल होण्याच्या सर्वेक्षणामध्ये ४४ टक्के रुग्ण मधुमेह ग्रस्त आढळून आले आहेत.
3. जर तुम्हाला मधुमेह असेल तर हृदयविकाराच्या झटक्याने तुमचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते.
4. दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ टेलिव्हिजनसमोर बसल्यास डायबेटीस वाढतो.
5. सध्याच्या काळात मधुमेहाचे रुग्ण इन्सुलिनचा वापर करतात. नव्वद वर्षांपूर्वी मधुमेहाचे रुग्ण बोवाइन (गोजातीय) आणि पोर्सिने इन्सुलिनचा वापर करत होते.
6. धुम्रपान केल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. धुम्रपानामुळे हृदय प्रणाली आणि कोशिकांच्या संवेदनशिलतेवर वाईट प्रभाव पडतो.
7. आईचे दुध किती फायदेशीर आहे. हे या गोष्टीवरून स्पष्ट होते की, तीन महिने किंवा त्यापेक्षा मोठ्या बाळाला स्तनपान दिल्यास लहानपणात टाइप-1 मधुमेहाचा धोका कमी होतो. आणि तरुणपणात लठ्ठपणाचा धोका राहत नाही.
8. डायबिटीसमुळे आपल्या बहुमुल्य आयुष्यातील ५ ते १० वर्ष कमी होतात.
9. मधुमेहाच्या रुग्णांना फ्ल्यू-निमोनिया होण्याचा धोका जास्त प्रमाणत वाढतो. निश्कर्षातील आकड्यानुसार प्रत्येक वर्षी ३० हजार लोकांचा मृत्यू फ्ल्यू आणि निमोनियामुळे होतो.
10. मधुमेहामुळे दातांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते आणि हिरड्यांवर सूज येते.
11. नाशपातीसाख्या आकाराचे शरीर असलेल्या लोकांमध्ये मधुमेहाचा धोका त्या लोकांच्या तुलनेत कमी असतो, ज्यांचे शरीर सफरचंदाच्या आकराचे असते.
12. ज्या वयोवृद्ध लोकांना मधुमेह असतो, ते आपल्या तब्येतीच्या बाबतीत अनभिज्ञ असतात.
13. 90 टक्के मधुमेहाचे रुग्ण लठ्ठपणाचे शिकार असतात.
14. मधुमेहींची रक्तशर्करा सातत्याने अतिशय अचूकरीत्या मोजणे आणि त्यानुसार इन्सुलिनचा डोस प्रत्येकवेळी अगदी तंतोतंत वेळेत देणे होत नाही. 60 ते 70 टक्के मधुमेहींमध्ये वेळेत इन्सुलिन घेतले जात नाही, असे आढळून आले आहे.
15. ‘सीजीएमएस’ म्हणजेच ‘कन्टिन्युअस ग्लोकोज मॉनिटरिंग सिस्टिम’ या उपकरणाद्वारे रक्तशर्करेवर अतिशय बारकाईने सतत लक्ष ठेवणे शक्य होते. त्यानुसार संबंधित व्यक्तीला इन्सुलिनचा डोस द्यावा लागतो.
16. मधुमेह झाल्यानंतर पायातील हाडे कठीण होत कमकुवत होऊ लागतात. तसेच त्वचा कोरडी होणे, पीडिताचे केस गळणे अशा समस्या वाढतात, असे तज्ज्ञ सांगतात.
17. अ )नियमित व्यायाम करणे, ब) संतुलित आहार घेणे, क ) नियमित ठरावीक वेळी औषधे घेणे, ड ) डॉक्टरांनी सुचविल्याप्रमाणे रक्तचाचण्या (टेस्ट) तसेच इतर तपासण्या वेळेवर करणे. आपल्या काही शंका असतील तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधणे.
18. उपवासामुळे शरीरातील रासायनिक क्रियेत बदल होतो. त्याचा मधुमेहावर दुष्परिणाम होतो म्हणून पूर्ण उपवास करण्याचे टाळावे. उपवास करणे अत्यंत आवश्यक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात बदल करावा.
19. उपचार
• आहार नियंत्रण जेणेकरून वजन नियंत्रित होईल समतोल व वेळेवर आहार ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली ठरेल.
• योग्य औषधोपचार आधुनिक वैद्यकामध्ये इन्सुलिन चे इंजेक्शन वा रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी गोळ्या उपलब्ध आहेत.