27/11/2025
काल नागपूर येथे संविधान दिनानिमित्त, माझे खूप जवळचे मित्र अप्पर आयुक्त श्री. पाचरणे यांच्या प्रेरणेतून, महाराष्ट्र राज्य GST कार्यालयाच्या ३०० अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत "भारतीय संविधान व प्रशासनातील नैतिकता" या विषयावर संवाद साधला.
अगदी वैयक्तिक आयुष्यातील उदाहरणे देऊन, आपण यासाठी नेमके काय करू शकतो व कधी सुरुवात करता येईल याबाबत बोललो.
सर्वांनी जवळपास दीड तास अतिशय ध्यानपूर्वक व मन लावून ऐकले व मी जे बोलत होतो, ते त्यांच्या हृदयापर्यंत पोहचत होते, असे सर्वांचे चेहरे सांगत होते.
त्यामध्ये मांडलेले काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे...
१. आपल्या स्वतःच्या आयुष्यात नैतिकता जपणे,
२. कथनी व करनी मधील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करणे,
३. आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट/इकीगाई शोधण्यासाठी बाल वा तरुण वयातच प्रयत्न करणे,
४. आपल्यामुळे दररोज इतर कुणाच्या तरी आयुष्यात आनंद निर्माण करण्याची काहीतरी कृती करणे.
५. आपल्या आयुष्याचे Long term vision document तयार करणे.
आणि हे सर्व होण्यासाठी खालील धोरण ठरवून अमलात आणावे ...
१.चांगले प्रेरक वाचन.
२. आपल्या आजुबाजूला असणाऱ्या जिवंत रोल मॉडेल्सचा शोध व त्यांच्या शक्य तेवढा सहवासात/संपर्कात राहण्याचा प्रयत्न.
३. समविचारी आयुष्यभराचे मित्र जोडणे.
एकूणच आपल्या स्वतःच्या आयुष्याचे संविधान तयार करणे व त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणे.
कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या या खुल्या आकाशाखाली असणाऱ्या, झाडांनी आच्छादित निसर्गरम्य जागी हा कार्यक्रम झालेला.
ही जागा सकाळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छ केली होती हे विशेष.