08/07/2021
गुडघेदुखी व आधुनिक शास्त्रशुद्ध उपचार प्रणाली
"गुडघेदुखी" हा एक असा शब्द आहे जो, जसे जसे चाळीशी येऊ लागते तसे तसे आठवू लागतो. भारतासारख्या देशांमध्ये जिथे वाढत्या वयानुसार व खनिजांच्या आहारामधील कमतरतेमुळे होणारी गुडघेदुखी आणि सांधे प्रत्यारोपण हे एक समीकरणच झाले आहे. गुडघेदुखीचे बरेच प्रकार असतात. त्यापैकी
१) संधीवातामुळे उद्भवणारी गुडघेदुखी(Rheumatoid Arthritis)©️DrJyeshtharaj
२) खेळामधील किंवा अपघातामध्ये होणाऱ्या गुडघ्याच्या अंतर्गत जखमा.(Sports Injury)
३) वयोमानानुसार हाडांची झीज झाल्यामुळे होणारी गुडघेदुखी त्यालाच वैद्यकीय भाषेमध्ये (Degerative Osteoarthritis) असे संबोधतात.
गुडघा हा अतिशय क्लिष्ट प्रकारचा सांगा आहे, याचे कारण की मनुष्य हा द्विपाद प्राणी आहे आणि आपल्या शरीराचे संपूर्ण वजन व चलनवलन हे यावर अवलंबून असते.©️DrJyeshtharaj
शरीररचनाशास्त्रानुसार गुडघा हा मांडीचे एक, पायाचे दोन व वाटी अशा तीन हाडांपासून तयार होतो. त्याच्या नैसर्गिक हालचालींसाठी व स्थिरतेसाठी त्याला विविध प्रकारच्या दोर्या(Ligaments) गाद्या(Cartilage and Meniscus)व द्रव पदार्थाने भरलेले पिशव्या(Bursae) असतात. तसेच या हाडांच्या मध्ये वंगणासारखा एक पदार्थ असतो त्याला Synovial Fluid असे संबोधतात.
जे हालचाल मृदुपणे व सहज होण्यास मदत करते. जसे जसे वय वाढत जाते तसे तसे त्यातील गाद्यांची झिज होऊ लागते, Synovial Fluid कमी होते.
याची बरीच कारणे असतात त्यापैकी, आपली बदललेली जीवनपद्धती, आहार तसेच खनिजांची कमतरता आणि हाॅर्मोन्स ही सर्वात महत्त्वाची कारणे होय.
गुडघेदुखीचे सर्वसाधारणपणे चार ग्रेड्स किंवा स्तर असतात .
ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन मध्ये आॅस्टिओ-अर्थराइटिस चे उपचार हे खालील प्रकारे आहे जे शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित आहेत
१) व्यायाम(Exercises):-( ग्रेड एक साठी)
२) रिजनरेटीव्ह मेडिसिन किंवा ॲडव्हान्सड पी आर पी थेरपी(Advanced Platelet Rich Plasma) (ग्रेड २ व ३ साठी उपयुक्त.)
३) रेडिओफ्रिक्वेन्सी डिनर्वेशन(RF Denervation) किंवा कुलर रेडिओ फ्रिक्वेन्सी(Cooled RF)( ग्रेड ३ व ४ साठी उपयुक्त.)
४) सांधे प्रत्यारोपण आणि इतर सर्जरी.©️DrJyeshtharaj
यापैकी आपल्याला फक्त सांधेप्रत्यारोपणाबाबतीतच जागृतता आहे, कारण इतर वरील उपचार हे भारतात फारसे प्रचलित नव्हते परंतु आताच्या काळात आणि वैद्यकशास्त्राच्या जागतिकीकरणामुळे हे उपचार आपल्याकडे आता उपलब्ध झाले आहेत.
---------------------------