Nilesh' Raje

Nilesh' Raje My LîFe mÝ RûLê

05/05/2015

आंबा बागायतदाराची आत्महत्या हे सरकारचे पाप
नितेश राणे यांनी केले कोले कुटुंबीयांचे सांत्वन...
कोले यांच्या कुटुंबियांना आमदार नितेश राणे यांच्याकडून एक लाख रूपयांची तातडीची आर्थिक मदत...
कोकणी जनतेने शिवसेनेचे २३ आमदार निवडून दिले. मात्र, या आमदारांना शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत. असे आमदार काय कामाचे ? ज्यांच्या जीवावर मंत्रीपदे घेऊन मिरवतात, त्यांना शेतकऱ्यांचे दुखः दिसत नाही का ? असा संतप्त सवाल आमदार नितेश राणे यांनी करत, आता कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय बस झाला. या शेतकऱ्यांना वेळीच न्याय न मिळाल्यास मंत्री आणि आमदारांना कोकणात फिरायला देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. देवगड-मोर्वेवाडी येथील आंबा बागायतदार पांडुरंग हरी कोले यांनी रविवारी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर बेघर झालेल्या कोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी आमदार नितेश राणे आज (सोमवारी) सकाळी कोले कुटुंबियांच्या घरी गेले होते. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या पांडुरंग हरी कोले यांच्या कुटुंबियांना आमदार नितेश राणे यांच्याकडून एक लाख रूपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. कोले कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
तालुक्यातील हिंदळे-मोर्वेवाडी येथील शेतकरी पांडुरंग हरी कोले यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुुंबियांची आमदार राणे यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मुुख्यमंत्रीही कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत काही बोलले नाहीत. यावेळी कोकणातील जनतेने सेना भाजपचे २३ आमदार निवडुन दिले. त्यांना विरोधी पक्षाचा एक आमदार काय करू शकतो, हे दाखवणार. आमच्या पध्दतीने आम्ही काम करणार. सेना भाजपचे नेते फक्त फोटोसेशन करून सहानुभूती दाखवायला येतात. शेतकरी नुकसानग्रस्त आहे, हे वास्तव का मान्य करत नाही. ही जाणीव त्यांना करून देणारत व हवेवर उडणाऱ्या लोकप्रतिनिधींना जमिनीवर आणण्याचे काम आम्ही आमच्या पध्दतीने करणार. आमदार राणेंसोबत तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, सभापती डाॅ. मनोज सारंग, विभागीय अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

Address

Tv Centre
Aurangabad
431003

Telephone

8793222463

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilesh' Raje posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nilesh' Raje:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram