Dr Anupam Takalkar

Dr Anupam Takalkar Working at Dr Takalkar skin care, Aurangabad. Middle Maharashtra's first ISO certified skin clinic. Pioneered cosmetic dermatology in Marathwada

08/05/2025
Feeling Honored and Grateful!Our installation ceremony was graced by esteemed dignitaries —  Chief Guest Hon'ble Mr. Har...
26/04/2025

Feeling Honored and Grateful!

Our installation ceremony was graced by esteemed dignitaries —
Chief Guest Hon'ble Mr. Haribhau Bagde, Governor of Rajasthan;

Dr. Bhagwat Karad, Member of Parliament and Former Minister of State for Finance, Government of India;

Dr. Vinay Rathod, Superintendent of Police, Chhatrapati Sambhajinagar;

along with senior IMA leaders —

Dr. Ravi Wankhedkar, Former National President, IMA;

Dr. Santosh Kadam, State President, IMA Maharashtra;

Dr. Hosie Kapadia, National Vice President, IMA;

Dr. Shivkumar Utture, Former Chairman, Maharashtra Medical Council and Convener, IMA JDN HQ;
Dr. Jayesh Lele, Former HSG, IMA HQ;
Dr. Anil Avhad, State Secretary, IMA Maharashtra;

Dr. Anil Pachankar, Former Vice President, IMA HQ;

Dr. Santosh Kulkarni, President-Elect, IMA Maharashtra State;

Dr. Sanjay Kadam, Ex-MMC Member;

Dr. Santosh Ranjalkar, Vice President, IMA Maharashtra State.

With immense pride and humility, I, Dr. Anupam Takalkar, have been installed as the President of Indian Medical Association, Chhatrapati Sambhajinagar Branch – one of the largest and most dynamic IMA branches in India.
I am honored to work alongside an excellent team:
- Dr. Yogesh Lakkas, Secretary
- Dr. Shivaji Pole, Treasurer
- Dr. Ujwala Dahiphale (Immediate Past President),
- ⁠Vice President Dr. Kedar Sane, and Dr. Archana Sane
- Dr. Vikas Deshmukh, President-Elect
- Joint Secretaries Dr. Sambhaji Chintle, Dr. Prashant Darak, Dr. Sanjay Patne, and Dr. Gitesh Dalvi

Heartfelt gratitude to each one of you for gracing our installation ceremony with your esteemed presence. Your support, blessings, and encouragement have added immense value and honor to the event.

Your presence made this milestone even more special.
Looking forward to a year of teamwork, service, and excellence.
Together, let us take IMA Chhatrapati Sambhajinagar Branch to even greater heights!

कुष्ठरोग बरा होतो, पण समाजाची मानसिकता कधी बदलेल?डॉ. अनुपम टाकळकर, त्वचारोग तज्ज्ञआज विश्व कुष्ठरोग दिन! मोठमोठ्या घोषणा...
30/01/2025

कुष्ठरोग बरा होतो, पण समाजाची मानसिकता कधी बदलेल?

डॉ. अनुपम टाकळकर,
त्वचारोग तज्ज्ञ

आज विश्व कुष्ठरोग दिन! मोठमोठ्या घोषणा, सरकारी अहवाल, जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन —सगळं काही आहे. पण प्रत्यक्षात, कुष्ठरोग अजूनही आपल्या दारात आहे, आणि समाज मात्र डोळे झाकून बसला आहे.

होय, भारताने २००५ मध्ये कुष्ठरोग “हद्दपार” ( एलिमिनेट) केला. सरकारी आकड्यांनुसार, १०,००० लोकसंख्येमागे १ पेक्षा कमी रुग्ण म्हणजे हद्दपार!

पण त्याचे “निर्मूलन” (इरॅडिकेशन) झाले का? अजिबात नाही.

WHO च्या २०२२ च्या अहवालानुसार, दरवर्षी सुमारे २ लाख नवीन प्रकरणं नोंदवली जातात, त्यातली ६०% प्रकरणं भारतातली आहेत. २०२१-२२ मध्ये आपल्या देशात ७५,००० हून अधिक नवीन रुग्ण! आकडे पाहून अंगावर काटा यावा असे.

आता प्रश्न असा आहे—आणखी किती दिवस आपण हा आजार आहेच असं मान्य करणार नाही?

काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला तपासलं. हातापायावर संवेदनाहीन चट्टे, चेहऱ्यावर सूज. निदान केलं तर *हिस्टॉइड हॅन्सन्स!* हा कुष्ठरोगाचा गंभीर प्रकार. अत्यंत संसर्गजन्य. आता ही केस दुर्मिळ मानली जाते, पण तरीही आलीच ना ओपीडीमध्ये? म्हणजे कुठेतरी पाळंमुळं आहेत अजून.

दुसऱ्या एका तरुण रुग्णाला वयाच्या पंचविशीत हा आजार झाला. तो दवाखान्यात यायलाच तयार नव्हता. का? तर "लोक काय म्हणतील?" हा मोठा प्रश्न. कुष्ठरोगावर औषधं मोफत आहेत, पण त्यावर समाजाचं औषध अजूनही नाही.

एक असाच गूगल शिक्षित तरुण, अहो पण डॉक्टर लेप्रसी तर भारतात नाही ना आता!!

“कुष्ठरोगाची भीती कमी, पण सामाजिक कलंक मोठा!”

कुष्ठरोग हा फक्त त्वचेचा आजार नाही. तो मनावर, समाजावर, नातेसंबंधांवर परिणाम करतो. *मल्टी-ड्रग थेरपी (MDT)* मुळे हा आजार पूर्णपणे बरा होतो. WHO हे उपचार मोफत देतं. तरीही लोक डॉक्टरांकडे उशिरा येतात. का? कारण कुष्ठरोगाचं नाव जरी काढलं तरी लोक चार पावलं मागे सरकतात.

आजही समाजात कुष्ठरोग असलेल्या लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, सूनांना माहेरी पाठवलं जातं, लग्न जुळत नाहीत. हा आजार टाळता येतो, १००% बरा होतो, तरीही लोक दुरावा ठेवतात.

म्हणजे आजाराचा संसर्ग कमी झाला, पण अज्ञान आणि पूर्वग्रहांचा संसर्ग मात्र वाढलाय!

“उपचार फक्त शरीरावर नाही, तर मानसिकतेवरही आवश्यक “

डॉक्टर म्हणून आमचं काम फक्त औषधं देण्याचं नाही. आम्ही रुग्णांना धीर देतो, त्यांच्या भीतीला सामोरं जायला शिकवतो. रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे शंकानिरसन करतो. रुग्ण स्वतः तर आमचा पेशंट असतोच पण बऱ्याच वेळा त्याच्या घरच्यांच्या मनातील गैरसमज शोधून त्यांना योग्य माहिती द्यावी लागते.

जिल्हा कुष्ठरोग अधिकाऱ्यांकडे नोंदणी होते, सरकारी योजनांचा फायदा मिळतो. पण समाजाचा पाठिंबा मिळाला तर उपचाराचा प्रभाव दुप्पट होईल.

कुष्ठरोग हा लपवण्याचा विषय नाही. तो वेळेवर ओळखून उपचार करायचा विषय आहे. लवकर निदान केलं, योग्य औषधं घेतली, तर कुष्ठरोग *पूर्णपणे बरा होतो*. पण त्यासाठी लोकांनी पुढे यायला हवं.

“समाज म्हणून आपण काय करू शकतो?”
- कुष्ठरोगासंदर्भात अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करूया.
- लक्षणं आढळल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला लोकांना प्रवृत्त करूया.
- कुष्ठरोग्यांना समाजाचा आधार देऊया.
- उपचार घेतलेल्या आणि बऱ्या झालेल्या लोकांना समान संधी मिळवून देऊया.

कुष्ठरोग आजही आहे. पण समाजाचं दुर्लक्ष अधिक धोकादायक आहे. आजाराला उपचार आहेत, पण मानसिकतेच्या बदलालाच खरी गरज आहे. आपण कितीही आधुनिक झालो तरी कुष्ठरोगाबद्दलची मानसिकता जर अजूनही जुनाट असेल, तर खरंच आपण प्रगत आहोत का?

आजच्या दिवशी स्वतःला हा प्रश्न विचारा—कुष्ठरोग्यांपासून आपण लांब जाणार, की त्यांच्यासोबत उभं राहणार?

डॉ. अनुपम टाकळकर,
त्वचारोग तज्ज्ञ,
छत्रपती संभाजीनगर

पतंग उडवा... पण जबाबदारीनं!-  डॉ. अनुपम टाकळकरगेल्या काही दिवसांपासून शहरात धारदार मांज्याच्या जखमांनी भीतीचं वातावरण पस...
15/01/2025

पतंग उडवा... पण जबाबदारीनं!

- डॉ. अनुपम टाकळकर

गेल्या काही दिवसांपासून शहरात धारदार मांज्याच्या जखमांनी भीतीचं वातावरण पसरलंय. कालच एका पोलीस उपनिरीक्षकाचा गळा कापला गेला. एका क्षणी पतंगाचा आनंद घेतला जातो, पण दुसऱ्याच क्षणी हा आनंद कुणाच्या आयुष्यावर घाला घालतो. नाशिकमध्ये तर कालच एका व्यक्तीचा धारदार मांज्यामुळे मृत्यू झाला. हे काय चाललंय?

पतंगाच्या उड्डाणांनी आकाश भरलंय, पण त्याचसोबत रुग्णालयंही जखमींनी भरतायत. हात कापलेले, गळ्याला खोल जखमा, आणि काहींच्या डोळ्यातले आसवे पाहून काळजाला धक्का बसतोय.

पतंगाचा खेळ आता जीवघेणा ठरत चाललाय.

अपघात टाळण्यासाठी काही सोपे परंतु महत्वाचे उपाय:

1. हेल्मेटचा वापर करा: चेहरा आणि गळा सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण कव्हर असलेलं “मोठे” हेल्मेट घाला.

2. स्कार्फचा वापर करा:
गळ्याभोवती -पुरुषांनीही - स्कार्फ बांधून प्रवास करा.

3. सावधगिरीने वाहन चालवा:
पतंग उडवल्या जाणाऱ्या भागांमध्ये वेग कमी ठेवा आणि सतर्क राहा.

4. संरक्षण जाळी लावा:
गाडीच्या हँडलवर समोरच्या भागावर - “अहमदाबाद पॅटर्न” प्रमाणे ‘उलट्या इंग्रजी यू’ आकाराची जाड लोखंडी तार बसवा.

5. गर्दी टाळा:
शक्य असल्यास पतंग उडवल्या जाणाऱ्या भागांत जाणं टाळा.

जनजागृतीची गरज:
धारदार मांज्यावर बंदी आणणं ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही, तर समाजाचीही आहे. सुरक्षित पतंगोत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक मांज्याचा वापर करा.

पतंगाचा आनंद घ्या, पण तो कुणाचं आयुष्य हिरावणार नाही याची काळजी घ्या.

मीही पतंग उडवायचो, आता मुलांसोबत पतंग उडवतो, पण कधीही धारदार मांजा किंवा नायलॉनचा दोरीचा वापर करत नाही. पतंग उडवण्याचा आनंद घेताना दुसऱ्याच्या आयुष्यावर संकट का आणायचं?

हा खेळ आनंदाचा आहे, पण जबाबदारीही आपलीच आहे. सावध रहा, सुरक्षित रहा!

पतंग आनंदाचा,पण दोरी जबाबदारीची हवी!!डॉ अनुपम टाकळकर गेल्या काही दिवसांत धारदार मांज्यामुळे झालेल्या जखमांच्या घटनांमध्य...
14/01/2025

पतंग आनंदाचा,
पण दोरी जबाबदारीची हवी!!

डॉ अनुपम टाकळकर

गेल्या काही दिवसांत धारदार मांज्यामुळे झालेल्या जखमांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेकांना गळा, हात किंवा इतर ठिकाणी गंभीर जखमा होत आहेत. पतंग उडवण्याचा आनंद घेताना वापरला जाणारा धारदार मांजा — ज्यामध्ये काच, तारा किंवा धातू मिसळलेली असते — तो केवळ पतंगच नव्हे, तर मानवी शरीरालाही गंभीर इजा पोहोचवतो.

*जखम झाल्यास करावयाचे प्राथमिक उपचार:*

1. *रक्तस्त्राव थांबवा:* स्वच्छ कापडाने जखम दाबून ठेवा. किमान सलग ५-१० मिनिटे दाब देणे आवश्यक.

2. *प्रतिजैविक लावा:*
अँटीसेप्टिक क्रीम जसे की सोफ्रामायसिन किंवा सिल्वरेक्स वापरून जखम निर्जंतुक ठेवा.

३. *डॉक्टरांचा सल्ला घ्या:* घरगुती उपाय करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी तत्काळ वैद्यकीय मदत घ्या.

*जखम टाळण्यासाठी खबरदारी:*

1. *धारदार मांजा टाळा:* सुरक्षित साध्या दोऱ्यांचा वापर करा.

2. *मुलांवर लक्ष ठेवा:* आपले पाल्य हा घातक मांजा पतंग उडवताना *मुलांवर लक्ष ठेवा:* आपले पाल्य हा घातक मांजा पतंग उडवताना तर वापरत नाही ना याची पालकांनी काळजी घ्यावी

3. *जनजागृती मोहीम राबवणे आता काळाची गरज:* धारदार मांज्याच्या धोक्यांविषयी शाळा, सार्वजनिक ठिकाणी, आणि सोशल मीडियावरून जनजागृती करणे गरजेचे आहे.

*टू-व्हिलर वाहन चालकांसाठी विशेष उपाय:*

1. *हेल्मेट वापरा:*
पूर्ण कव्हर असलेले ‘मोठे’ हेल्मेट वापरल्यास चेहरा व गळा सुरक्षित राहतो.

2. *गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी:* पतंग उडवल्या जाणाऱ्या भागातून वाहन चालवताना वेग कमी ठेवा.

3. *स्कार्फ किंवा कापडाचा वापर:* गळ्याभोवती दाट स्कार्फ बांधा, ज्यामुळे मांज्याचा परिणाम कमी होईल.

4. *संरक्षण जाळी:* गाडीच्या हँडल आणि समोरील भागावर जाळी बसवून मांज्यामुळे होणारे अपघात टाळा.

5. *सावधगिरीने वाहन चालवा:* पतंग उडवण्याच्या भागांमध्ये दोऱ्यांवर लक्ष ठेवा व आवश्यकता भासल्यास वाहन थांबवा.

*सार्वजनिक जबाबदारी:*
सामाजिक आणि प्रशासन स्तरावर धारदार मांज्यावर बंदी घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत. नागरिकांनीही सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पतंगोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. पतंग खेळण्याचा आनंद घेताना दुसऱ्यांच्या आयुष्याला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.

*हा मांजा फक्त*
*पतंगच कापत नाही,*
*तर कुणाच्या आयुष्याचा* *आनंदही कापू शकतो*
*याचे भान ठेवावे*

*डॉ. अनुपम टाकळकर*
त्वचारोग तज्ज्ञ,
छत्रपती संभाजीनगर

21/08/2024

कोलकाता घटना के विरोध में छत्रपति संभाजीनगर के डॉक्टरों ने किया रास्ता रोको। तेज बारिश में - जमीन पर बैठकर किया आक्रामक ठिया आंदोलन!!

30/03/2024

Online voting
(For IMA Chhatrapati Sambhajinagar branch members)

Working at Dr Takalkar skin care, Aurangabad. Middle Maharashtra's first ISO certified skin clinic. Pioneered cosmetic dermatology in Marathwada

🌟 *Vote for Dr. Anupam Takalkar for President Elect.*Why Dr. Anupam Takalkar?- During his tenure, IMA became one of the ...
26/03/2024

🌟 *Vote for Dr. Anupam Takalkar for President Elect.*

Why Dr. Anupam Takalkar?

- During his tenure, IMA became one of the top branches in India.
- Innovative leadership for real change.
- Proven record of success.
- Working sincerely as a grassroots worker since 13 years.
- Selfless and committed service; always available for IMA work.

Choose the next president who has taken our IMA branch to new heights.

*Let’s come together and support Dr. Anupam Takalkar for the post of President elect.*

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची भेट आणि चर्चा*Yesterday, we had the privilege of meeting Dr. Bharati Pa...
13/03/2024

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांची भेट आणि चर्चा

*Yesterday, we had the privilege of meeting Dr. Bharati Pawar, Minister of State for Health and Family Welfare, Government of India. During our discussion with Dr. Pawar, we addressed several pressing concerns affecting the medical community.*

*Dr. Yashwant Gade*, president, emphasized the importance of maintaining the integrity of modern medicine, advocating for a patient-centric approach while safeguarding against the integration of alternative systems. He also highlighted the ongoing challenges faced by doctors, including violence in healthcare settings and the need for comprehensive legal protection.

He urged for stronger legal protections for healthcare professionals and institutions against violence, including the implementation of deterrent laws at the central level. Recommending exemptions for small and medium-sized hospitals and clinics from certain regulatory acts, he argued against criminal prosecution of doctors, emphasizing the detrimental effects on patient care and treatment costs. He also advocated for the separation of licensing exams from undergraduate medical education admissions processes.

*Dr. Anupam Takalkar,* secretary, echoed these sentiments, emphasizing the need for adequate staffing in medical colleges. He underscored the importance of avoiding fee capping for doctors. He stressed the necessity of promptly filling vacant medical professor positions before establishing new medical colleges. Joined by *Dr. Ujwala Dahiphale, Dr. Arvind Gaikwad, Dr. Sanjiv Saoji, Dr. Ujjwala Zavar, and, Dr Kanchan Roplekar*, Dr. Takalkar emphasized the need for sustainable solutions to address the challenges faced by the medical fraternity. Their collective voices echoed the urgent need for holistic reforms to ensure the well-being of both healthcare providers and patients alike. Dr Dahiphale and Dr. Takalkar also emphasized the need for increased rates under the MJPJAY scheme.

We extend special thanks to Maharashtra IMA, *Dr. Dinesh Thakre,* President, and *Dr. Saurabh Sanjanwala* for their invaluable guidance and support. Their leadership and expertise have been instrumental in navigating the complexities of healthcare advocacy and ensuring the representation of doctors' concerns effectively.

*Dr. Bharti Pawar* expressed appreciation for the insights provided by the Indian Medical Association (IMA) and pledged to review the issues raised. Additionally, Dr. Bharathi Pawar, the Health Minister for the state government of India, displayed a genuine eagerness to engage with the concerns raised by the medical community. Her commitment to reviewing the health manifesto and charter of demands showcased a dedication to understanding and addressing the issues faced by healthcare professionals. Dr. Pawar's pledge to study the presented documents thoroughly and provide a thoughtful response demonstrated her proactive approach to governance and healthcare reform. As a responsive leader, she expressed optimism about collaborating with stakeholders to enact meaningful change for the betterment of healthcare delivery in India.

*Dr. Bhagwat Karad*, the Minister of State for Finance, assured his support for the medical community and pledged to address GST concerns. Dr. Bhagwat Karad, the Minister of State for Finance in the Indian government, affirmed his solidarity with the medical community, drawing from his personal affiliation as a member. His assurance to stand by the doctors and address their concerns, including resolving GST issues, highlighted a commitment to fostering a supportive environment for healthcare professionals. Dr. Karad's acknowledgment of the vital role played by doctors underscored his dedication to ensuring their well-being and the sustainability of the healthcare sector. As a key figure in government, his promise to advocate for the interests of the medical fraternity signals a promising path towards collaborative solutions and positive outcomes.

*We presented Dr. Pawar with the IMA health manifesto and the Charter of demands, to which she committed to study and respond promptly.*

Among the dignitaries present were Dr. Datta Kadam, Dr Paras Mandlecha, Dr. Rajendra Shewale, Dr. Renu Boralkar, Dr. Sangita Shinde, Dr. Archana Sane, Dr. Abhay Dhanorkar, Dr Ravindra Zavar, Dr. Sambhaji Chintle, Dr. Lokhande, Dr Archana Bhandekar, Dr Anjali Gade, Dr Mahesh Moharir, Dr Sidhant Goyal, Dr Pratibha Palwade, Dr Sonali Saoji, Dr Rishikesh Khadilkar, dr Ram Gosawi,, each contributing valuable insights and perspectives to the discussion on healthcare challenges and reforms.

*Dr Yashwant Gade*
President

*Dr Anupam Takalkar
Hon. Secretary

IMA Chhatrapati Sambhajinagar branc

Address

Dr Takalkar Skin And Hair Clinic Akashwani Aurangabad
Aurangabad
431003

Opening Hours

Monday 11am - 3am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 7:30pm
Friday 10am - 5:15am

Telephone

+919011588022

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Anupam Takalkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Anupam Takalkar:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category