26/10/2021
प्रसंग.... जळगाव भेट
सविता (नाव बदलले आहे) खूप दिवसांपासून संधिवाताच्या आजाराने त्रस्त होती. बरयाच ठिकाणी उपचार घेऊनही आराम मिळत नव्हता. त्रास जास्त असल्याने चालनं फिरणं ही बंद होते. तिच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार या दुखण्यामुळे कित्येक दिवसांपासून परगावी आजारी असलेल्या सविताच्या आईला इच्छा असुनही तिला भेटायला जाता येत नव्हते. जळगाव मध्ये दर महिन्याच्या ४थ्या शनिवारी संधिवात तज्ञ डॉक्टर व्हिजीटला येतात,अशी पेपरमधील जाहिरात वाचून सविताची मुलगी तिला मागील महिन्यात उपचारासाठी घेऊन आली.
डॉक्टरांनी व्यवस्थित तपासून तिला संधिवात म्हणजे रुमॅटॉईड आरथरायटिस आहे असे सांगितले आणि त्या बद्दलचे बरेचसे गैरसमज दूर केले. सांगितलेल्या गोळ्या चालू केल्यावर काही दिवसांतच सांधेदुखी कमी होऊन सविता आता चालु फिरु लागली. बरे वाटल्याने लगेचच ती आपल्या आजारी आईला भेटायला गेली. दुर्दैवाने ती भेटायला गेल्यानंतर ३ दिवसांतच तिच्या आईचे निधन झाले.
काही दिवस तिकडे थांबून जळगाव ला परत आली. परवा या महिन्याच्या व्हिजीटला फॉलोअपला आल्यावर तिने ही सगळी कहाणी सांगीतली आणि तुमच्या उपचारानेच मी माझ्या आईला शेवटचं भेटु शकली, असं सांगून मनापासून धन्यवाद दिले.
रुग्णांवर उपचार करत असताना, आपल्यामुळे मायलेकींची शेवटची भेट घडवून आणता आली, याचं मनोमन समाधान मिळाले.
डॉ.अमोल राऊत
संधिवात तज्ञ.