15/10/2025
बालविधवा झालेल्या तुळसीमाता शुभ्रधवल वस्त्र नेसत होत्या. जानवे घालून संध्यावंदन करत होत्या. भक्तिमार्गावरील त्यांचा प्रवास सुरू झाला होता. भगवान् नित्यानन्दांनी तिला शक्तिपात दीक्षा दिली. आणि द्वैतापासून अद्वैताकडे, अंधारातून प्रकाशाकडे असा त्यांचा प्रवास सुरू झाला.
चिदाकाशगीतेचे रहस्य सांगून आत्मज्ञान पक्के करून आपली प्रथम शिष्या म्हणून भगवान् नित्यानन्दांनी तिचा स्वीकार केला.
ज्या काळात विधवांना धार्मिक कार्यात भाग घेण्यापासून वंचित ठेवण्यात येत होते, ज्या समाजात कर्मठांचाच भरणा होता, अशा काळात एका विधवा स्त्रीला आध्यात्मिक शक्ती देऊन नित्यानन्दांनी क्रांती केली. आत्मज्ञान मिळवण्याचा हक्क सगळ्या जातींनाच नव्हे तर स्त्रियांनासुद्धा असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. असा मोठा क्रांतिकारी बदल नित्यानन्दांनी त्या काळात करून दाखवला.
Tulsi Mata, a young widow, wore pure white garments. She performed her daily prayers wearing the sacred thread (janave). Her journey on the path of devotion had begun. Bhagwan Nityananda bestowed upon her Shaktipat initiation, and thus began her spiritual journey — from duality to non-duality, from darkness to light.
By revealing to her the mystery of the Chidakasha Gita and establishing her firmly in self-realization, Bhagwan Nityananda accepted her as his first disciple.
At a time when widows were excluded from participating in religious activities, and society was dominated by rigid orthodoxy, Nityananda created a revolution by granting divine power to a widow. He emphatically declared that the right to attain self-knowledge belongs not only to all castes but also to women. Such a profound and revolutionary change was brought about by Bhagwan Nityananda in that era.
From the book Avdhoota Bhagwan Nityananda Pavitra Parayan Grantha written by Siddhaguru Parampoojya Swami Vijayananda