22/01/2026
#हिवाळ्यात_मूळव्याधाचा_त्रास_वाढतोय_जाणून_घ्या_कारणं_व_उपचार
थंडीच्या दिवसांमध्ये अनेक रुग्ण आमच्याकडे येऊन सांगतात की त्यांचा मूळव्याधाचा त्रास हिवाळ्यात जास्त वाढतो
आज आपण याच विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत.
नमस्कार,
मी डॉ. अमित भापकर,
स्वयंभू हॉस्पिटल, एमआयडीसी, बारामती.
❄️ थंडीत मूळव्याध का वाढतो?
🔹पाणी कमी पिण्याची सवय
थंडीत तहान कमी लागते, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते आणि शौच कडक होते.
🔹व्यायाम कमी होतो
थंडीत चालणं-फिरणं कमी होतं, त्यामुळे पचनक्रिया मंदावते.
🔹रक्ताभिसरण कमी होणं
हिवाळ्यात रक्तप्रवाह कमी झाल्याने गुदद्वाराच्या भागात सूज येते व वेदना वाढतात.
🚨 मूळव्याधाची प्रमुख लक्षणे
✔️ संडास करताना रक्त येणे
✔️ संडास करताना तीव्र वेदना होणे
✔️ गुदद्वाराजवळ गाठ/मांस बाहेर आल्यासारखं वाटणं
✔️ संडास करताना आग होणे
✔️ उवासारखं पाणी बाहेर येणे
✔️ संडास झाल्यावरही पोट पूर्ण साफ न झाल्यासारखं वाटणं
🏡 मूळव्याधावर घरगुती उपाय
✅ भरपूर पाणी प्या (कोमट पाणी अधिक फायदेशीर)
✅ फायबरयुक्त आहार घ्या – फळे, पालेभाज्या, सलाड
✅ रोज किमान 20 मिनिटे चालणे / व्यायाम
✅ टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसू नका
✅ एकाच वेळी शौच होईल अशी सवय लावा
✅ गरम पाण्यात बसून शेक (Sitz Bath) घ्या
🏥 उपचार कधी घ्यावेत?
वरील सर्व उपाय करूनही त्रास कमी होत नसेल,
तर घाबरू नका, लाजू नका — त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
👉 आजकाल मूळव्याधावरचे उपचार खूप सोपे झाले आहेत
✔️ एक दिवसात ऑपरेशन
✔️ कुठलीही चिरफाड नाही
✔️ ड्रेसिंगची गरज नाही
✔️ 3–4 दिवसांत रोजच्या कामाला सुरुवात
जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला मूळव्याध / भगंदरचा त्रास होत असेल,
तर स्वयंभू हॉस्पिटल, बारामती येथे नक्की भेट द्या.
#स्वयंभु_हॉस्पिटल
📍बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, MIDC,
बारामती
📞8625834237