02/11/2019
गर्भसंस्कार.......एक मौलिक उपचार.
व्याख्यान...
दिनांक ५/११/२०१९
मंगळवार..
ढगे मळा,मातृ मंदिर बार्शी.
व्याख्याते..
डॉ गोदेपूरे मॅडम
डॉ गायकवाड मॅडम.
नऊ महिन्यांची वारी
करून पूर्ण मातेच्या उदरी
जन्म घेतो श्री:हरी
जग रुपी या सुंदर मंदिरी
क्षणांत रुणझुणतो नाद
त्याच्या रडण्याचा परिसरी
हा एकच क्षणं आयुष्याचा
रडता बाळं माऊली होते हर्षभरी
सुवर्णकाळ तिच्या आयुष्याचा
असतो हाच एकदम भरजरी
पदराआड येऊनी जेंव्हा
अमृतप्राश करतो श्री:हरी
त्याच्या लालन-पालनात होते
मग्न ती बाह्य-अंतरी
तिच्या आयुष्याच्या सुखाची
हीच तर खरी शिदोरी..
हीच शिदोरी मातेला आयुष्यभर पुरावी....
आपले बाळं हे एक तेजस्वी दिव्यं आणि निरोगी असावे हे कोणत्या आईला वाटणार नाही....
हीच आपली इच्छा आज सत्यात उतरावी असे जर वाटत असेल तर.... एकच 'राजमार्ग' आपल्या समोर दिसतो, तो म्हणजे 'गर्भ-संस्कार'.
अगदी पुरातन काळापासून याचे दाखले आपल्या संस्कृतीत, इतिहासात आहेत.त्यातले सगळ्यात महत्वाचे म्हणजे अभिमन्यूचे.
खरं तर गर्भसंस्कार ही प्रक्रिया सुरू होते जेंव्हा जोडपं आपल्याला मुल व्हावे ही इच्छा मनात आणते तेंव्हापासूनच.
तेंव्हा पासूनच त्यांची... मनाची सकारात्मक विचारसरणी...दोघांचे परस्परांतील प्रेम....आणि गर्भधारणा झाल्यापासून ते प्रसूती होई पर्यंतचा काळ....म्हणजेच बाळाचा ज्ञान ग्रहण करण्याचा सगळ्यात सक्षमं काळ.....या काळात जे जे तुम्ही गर्भसंस्कार च्या माध्यमातून आपल्या होणाऱ्या बाळावर संस्कार करताल ते तुम्हाला आपली भावी पिढी सुदृढ आणि सक्षम करण्यात नक्कीच मदत करेल.
गर्भसंस्कार चा फायदा होणाऱ्या बाळाच्या पंचेंद्रियांचा विकासाबरोबरच,आनुवंशिक व्याधी टाळणे,सहज सुलभ प्रसूती होणे इत्यादींसाठीही उपयुक्त ठरतो. मी तर म्हणेन की मात्या पित्याची गुणसूत्र आपल्या अपत्यात गुण देतात तर गर्भसंस्कार त्यात सद्गुणांची पेरणी करतात....
आदरणीय कवी राम शेवाळकर म्हणतात....
कळा झाल्या कळ्या
आणि उणावल्या वेणा
देहातून गेही बाई
आला इवला पाहुणा...
या इवल्याश्या पाहूण्याचे स्वागत करताना प्रत्येक माऊली आज स्वतःला धन्य झाल्या सारखे,जीवनाचे सार्थक झाल्याचे समजते.
या गर्भ पूर्व आणि गर्भसंस्कार बद्दल आणखी सखोल आणि वैज्ञानिक माहिती आपल्याला दिनांक ५ नोव्हेबर मंगळवार रोजी डॉ सौ गोदेपुरे मॅडम आणि डॉ सौ जयश्री गायकवाड मॅडम आपल्या व्याख्यानातून भगवंत योग परिवार या आपल्या हक्काच्या व्यासपीठावरून आपले योग गुरु अनीलजी वेदपाठक यांच्या अनुमतीने सकाळी ठीक ७ वाजता...करणार आहे.तरी आपण व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती.
आपला योग बंधू
डॉ अमित लाड.
भगवंत योग परिवार.
बार्शी.