03/05/2025
हृदयरोग तज्ञ असल्याचा अभिमान आहे ....
२३ वयाची गृहिणी सारखे दम लागतो म्हणून जवळपास १ वर्षापूर्वी ओपीडी मध्ये आल्या होत्या, त्यांच्या हृदयाच्या सोनोग्राफी मध्ये हृदयाला खुप मोठे छिद्र असल्याचे कळले, त्यांना आता प्रेग्नंन्सी प्लॅनिंग करायची होती, पण हृदयाला मोठे छिद्र असल्यामुळे प्रेग्नन्सी मध्ये जीवाला धोका होता, त्यामुळे पहिल्यांदा छिद्राचे ऑपेरेशन करायचे गरजेचे होते. छिद्राच्या ऑपरेशन मध्ये पण एक ओपन हार्ट आणि दुसरे दुर्बिणीद्वारे बटण च्या साहाय्याने असे दोन पर्याय होते. दोनीही पर्याय सांगितल्यावर दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करायचे ठरले. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या हृदयाच्या छिद्राचे दुर्बिणीद्वारे बटण च्या साहाय्याने यस्वीरित्या ऑपरेशन केले.
१ वर्षापूर्वी हे ऑपरेशन झाले. पेशन्ट एकदम व्यवस्थित घरी गेले. नंतर पेशंटची ट्रान्सफर बाहेरगावी झाल्यामुळे माझ्याकडे त्यांना फॉलोव अप करता आला नाही.
२ दिवसापूर्वी तोच पेशन्ट तिच्या बाळाला घेऊन माझ्या ओपीडी मध्ये तिच्या बाळाच्या हृदयाची सोनोग्राफी करण्यासाठी आले होते. पेशंटची नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. दोघेही पेशन्ट आणि तिचे बाळ एकदम व्यवस्थित होते.
पेशंट आणि कुटुंब पुर्ण आनंदात होते....
बार्शीसारख्या ठिकाणी अश्या सुविधा आपण देऊ शकतो याचा अभिमान वाटतो...
डॉ आदित्य साखरे
इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट
अँजिओग्राफी स्पेशालिस्ट
जगदाळे मामा हॉस्पिटल
बार्शी