28/07/2025
दि. 26 जुलै 2025 रोजी डॉ बोटे किडनी केअर सेंटर ,बार्शी येथे द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मोफत मूत्र रोग तपासणी , लठ्ठपणा व मधुमेहासाठी आहार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये जवळपास 154 रुग्णांची मुतखडा ,प्रोस्टेट व लघवीच्या आजारांसंबंधात तपासणी करण्यात आली व उपचार मार्गदर्शन करण्यात आले . त्यामध्ये 98 पुरुष रुग्ण, 47 स्त्री रुग्ण व 9 लहान मुले यांचा समावेश होता.
लघवीचे आजार असणाऱ्या 58 रुग्णांची युरोफ्लोमेट्री तपासणी मोफत करण्यात आली. प्रोस्टेटचे आजार असणाऱ्या 47 पुरुष रुग्णांची पीएसए टेस्ट मोफत करण्यात आली.
15 रुग्णांना लठ्ठपणा व डायबिटीस साठी डॉ नलिनी बोटे आहार तज्ञ यांनी जीवन शैलीमध्ये बदल व आहार यासाठी मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी डॉ. बोटे किडनी केअर सेंटर च्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
शिबिरा मधील रुग्णांची तपासणी डॉ. सचिन बोटे (एमसीएच युरो सर्जन) यांनी केली.
डॉ बोटे किडनी केअर सेंटर
भवानी पेठ बस स्टँड जवळ डॉक्टर सुनील पाटील हॉस्पिटल शेजारी बार्शी.
फोन 093079 72733