निरोगी जीवनासाठी आयुर्वेद

  • Home
  • India
  • Basmat
  • निरोगी जीवनासाठी आयुर्वेद

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद Dr Suryakant V Mete, Vishwaprabha Ayurved Panchakarm Clinic,Basmat mob.9421491938

05/09/2024
10/07/2023

Dr Suryakant V Mete, Vishwaprabha Ayurved Panchakarm Clinic,Basmat mob.9421491938

21/02/2023

*किडणी विकारांची लक्षणे* आपण जो आहार घेतो त्यातून अनेक वेळा विषारी पदार्थ ही पोटात जात असतात. हे टॉक्सिन रक्तात जमा होते. रक्ताची गाळण करण्याचे काम किडनी करीत असते.

सर्व प्रकारच्या टाकाऊ पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम किडन्या करीत असतात. त्यांचे आरोग्य राखणे महत्वाचे असते. जर टाकाऊ घटक शरीराबाहेर पडणे बंद झाले तरी आपले आरोग्य बिघडू शकते. म्हणून किडनीचे आरोग्य जपायला हवे आहे.

▪️किडनीचे कार्य काय आहे…

किडनी आपल्या शरीरातील टाकाऊ घटकांना बाहेर काढत असते. शरीरातील तरल पदार्थांचे ती संतुलन राखत असते. आपल्या शरीरातील रक्त किडनीद्वारे फिल्टर होत असते.

▪️लघवीचे कार्य बिघडणे –

शरीरातील टाकाऊ घटक लघवीतून बाहेर पडत असतात. लघवीचे प्रमाण कमी किंवा जास्त होणे, लघवीचा रंग बदलणे, लघवीला वास येणे
▪️पायांना सूज – किडनीचे कार्य बिघडल्यास हिमोग्लोबिनचे संतुलन बिघडते. त्यामुळे पायांना सूज येते. डोळ्यांच्या खाली सूज येते. त्यामुळे थकवाही वाढतो.

▪️भूक कमी लागणे –

जेव्हा किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ काढण्याचे काम थांबवते तेव्हा तेव्हा ते शरीरात साठू लागतात. त्यामुळे उलटी होते, वजन कमी होते, पोटात दुखते, भूक कमी लागते.

एकाग्रता कमी होते –

आपले मन कशात लागत नाही, एकाग्रता कमी लागते, आणि अचानक माणूस बेशुद्ध होऊ शकतो.

▪️दम लागणे –

काहीवेळा किडनी फंक्शन नीट न झाल्यास फप्फुसांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे श्वास घेण्यास वेळ लागू शकतो.

▪️स्किनवर रॅशेस –

जर रक्त शुद्धीकरण होत नसेल तर त्वचेवर चट्टे उमटू शकतात, खाज येऊ शकते.

Address

Basmat
431512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when निरोगी जीवनासाठी आयुर्वेद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share