28/05/2025
1 - वेदांग ज्योतिष - परिचय
सामान्यतः आकाशात असलेले ग्रह, नक्षत्रे इत्यादींच्या गती, स्थिती आणि त्यांच्या प्रभावांचे विश्लेषण ज्या शास्त्रात केले जाते, त्याला 'ज्योतिषशास्त्र' म्हणतात. भारतीय वैदिक सनातन परंपरेत ज्योतिषशास्त्राला सर्व विद्यांचे मूळ असलेल्या वेदांचे अंग मानले जाते, म्हणून त्याला 'वेदांग' म्हणतात. 'ज्योतिषशास्त्र' हे कालनियमक असल्यामुळे याला 'कालशास्त्र' असेही म्हणतात.

वेदांचे सहा अंग आहेत –
शिक्षा (उच्चारशास्त्र), कल्प (कर्मकांड), व्याकरण, निरुक्त (व्युत्पत्तीशास्त्र), छंद आणि ज्योतिष. या वेदांगांना 'शास्त्र' असेही म्हटले जाते. हे शास्त्र आपल्या प्राचीन ऋषीमुनींची देणगी आहे.
वेदांची सहा अंगे (वेदांग) पुढीलप्रमाणे:
1 - शिक्षा – अंग - नाक
उच्चारण, स्वर, मात्रे, उदात्त-अनुदात्त स्वर यांचा अभ्यास (फोनेटिक्स आणि उच्चारशास्त्र).
2 - कल्प – अंग - हात
विधी, कर्मकांड, यज्ञ यांचे नियमन करणारे शास्त्र (रिच्युअल्स आणि विधीशास्त्र).
यामध्ये गृह्यसूत्र, श्रौतसूत्र, धर्मसूत्र इत्यादींचा समावेश होतो.
3 - व्याकरण – अंग - मुख
भाषेचे शुद्ध स्वरूप आणि नियम (Grammar).
पाणिनि यांचे अष्टाध्यायी हे प्रसिद्ध व्याकरण ग्रंथ आहे.
4 - निरुक्त – अंग - कान
वेदांमधील दुर्गम आणि पुरातन शब्दांचा अर्थ लावण्याचे शास्त्र (एतिमोलॉजी).
5 - छंद – अंग - पाय
वेदांतील मंत्रांचे छंदशास्त्र किंवा छंदरचना (मीटर / मिटरशास्त्र).
उदा. गायत्री, अनुष्टुप, त्रिष्टुप इत्यादी.
6 - ज्योतिष – अंग - डोळे
कालज्ञान, यज्ञासाठी योग्य वेळ ठरवणे, ग्रह-नक्षत्रांचे ज्ञान (खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र).
क्रमश:......
---------------------------------------------------------------------------------
। ज्योतिषशास्त्रांचे शास्त्रोक्त शिक्षण ।
ऑनलाइन | ऑफलाइन | पोस्टल कोर्सेस उपलब्ध..
ज्योतिष अभ्यासाची खरी वाटचाल इथून सुरू होते...
अनुभवी मार्गदर्शन | प्रमाणित अभ्यासक्रम । घरबसल्या शिका…आता शक्य आहे!
ज्योतिष | वास्तुशास्त्र | अंकशास्त्र |
आजच प्रवेश घ्या । Join Now – प्रवेश सुरू आहेत!
----------------------------------------------------------------------------
श्री उत्तम गावडे
संस्थापक – अध्यक्ष
Astro-Vaastu Study Centre
8722745745 , 8762042745,
Follow us on Instagram
https://www.instagram.com/avsc_official/