साईंकृपा मेडिकल अण्ड जनरल स्टोर्स चंदनखेड़ा

  • Home
  • India
  • Bhandak
  • साईंकृपा मेडिकल अण्ड जनरल स्टोर्स चंदनखेड़ा

साईंकृपा मेडिकल अण्ड जनरल स्टोर्स चंदनखेड़ा it's imformative page about health

Permanently closed.
हृदय - Heart
31/03/2022

हृदय - Heart

प्रत्येक घराची गरज!डिजिटल थर्मो मीटर!कोविड सौम्य असो मध्यम की तीव्र स्वरूपाचा,त्या वर लक्ष ठेवण्या करता डिजिटल थर्मो मीट...
19/06/2021

प्रत्येक घराची गरज!
डिजिटल थर्मो मीटर!
कोविड सौम्य असो मध्यम की तीव्र स्वरूपाचा,
त्या वर लक्ष ठेवण्या करता डिजिटल थर्मो मीटर हे अत्यंत उपयुक्त साधन आहे!

पाऱ्या च्या थर्मा मीटर इतकीच अचूकता असल्याने
फुटण्याची शक्यता कमी असल्याने,
पाऱ्या च्या थर्मो मीटर चे रिडींग सहज वाचनीय,बघणीय नसल्याने
डिजिटल थर्मो मीटर ने
जवळपास
पाऱ्या च्या थर्मो मीटर ला हद्दपार केले आहे.

वापरताना काही नियम:
1)कोविड काळात ज्याचा थर्मो मीटर त्यानेच वापरवा!
2)इतर आजारात ,प्रत्येक वेळी वापरताना किमान थर्मो मीटर सॅनिटाइझ करून घ्यावा
3)तापमान घेताना किमान 10 मिनिटे आधी कोणतेही गरम अथवा थंड पदार्थ खाणे टाळावे, रिडींग चुकण्याची शक्यता वाढते!
4)तापमान घेताना थर्मो मीटर जिभेखाली च ठेवावा,काखेत वा इतर ठिकाणी ठेवल्यास रिडींग चुकू शकते!

थर्मो मीटर कसा वापरावा
1)एकच थर्मो मीटर फ्यारेनहाईट आणि सेल्सियस असे तापमान दाखवते, वरचे बटन दाबून आपण हवा तो मोड ठेवू शकतो!
2)बटन दाबले की "बीप" असा आवाज होऊन थर्मो मीटर सुरू होतो.
मात्र लगेच जिभेखाली ठेवू नये.
3)स्क्रीन वर LO ही अक्षरे आल्या नंतर च थर्मो मीटर जिभेखाली धरावे आणि तोंड पूर्ण बंद करावे.
4)दीड ते 2 मिनिटात पुन्हा "बीप"असा आवाज आल्या नंतर थर्मो मीटर बाहेर काढावे त्यावेळी स्क्रीन वर आलेला आकडा हा आपल्या शरीराचे त्या वेळचे तापमान होय!
5)आठवणीने आपला थर्मो मीटर बंद करून पुन्हा नीट पॅक करून ठेवावे.

आजारी असताना हे आकडे एका पेपर वर वेळेसहित लिहून ठेवावे
.हा कागद डॉक्टरांना दाखवल्यास त्यांना उपयोग होतो!
बाजारात बऱ्याच कंपनीचे डिजिटल थर्मो मीटर उपलब्ध आहेत
सध्या तरी हिक्स आणि मेडिटेक या कंपनीचे चांगले वाटतात!

घरात एक तरी थर्मो मीटर असायला हवा!
हा सअसा खराब होत नाही,सेल संपल्यास सहज बदलता येतो!.......शशांक माह्त्रे (facebook post)

*याला जबाबदार कोण???*⁉️⁉️⁉️काल पर्वाची घटना माझ्या गावातील एका  फार्मासिस्ट बंधुचा CT स्कोर फक्त दोन असताना तो घाबरल्याम...
01/06/2021

*याला जबाबदार कोण???*
⁉️⁉️⁉️
काल पर्वाची घटना माझ्या गावातील एका फार्मासिस्ट बंधुचा CT स्कोर फक्त दोन असताना तो घाबरल्यामुळे भरती झाला असता त्याला सात दिवस मेरोपेनम दिवसातून तीनदा म्हणजे एक्केविस व्हायल लागलीत व वरून स्टिरॉइड चा भडीमार !! व रेमडेसीविर चा मारा !!
खरच आवश्यक होते का हे ,ऑक्सिजन स्याचुरेशन पहिल्या दिवसापासून मेंटेन होत ,टेम्प्रेचर पण नाही ,असं असताना सुद्धा औषधाचा भडीमार कशाला !!
⁉️⁉️
अतोनात फोर्थ जेणेरेशनच्या अँटीबायोटिक्स चा वापर तसेच स्टिरॉइड चा वापर पण अंधाधुंद !!
⁉️⁉️

कोविड १९ महासाथीच्या काळात माणसाच्या प्रतिकार शक्तीत वाढ करण्यावर भर दिला जात आहे. तसंच अँटीबायोटिक्सचा वापरही या काळात वाढला आहे. त्यामुळे अँटीबायोटिक्सचे फायदे-तोटे यावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. अजूनतरी कोविड-१९वर प्रभावी उपचार दृष्टिपथात न आल्यामुळे अँटीबायोटिक्सवर लोक अवलंबून आहेत. अँटीबायोटिक्स बराच काळ घेतली गेली, तर त्यांचा बॅक्टेरियावर पडणारा प्रभाव कमी होतो. या पार्श्वभूमीवर अँटीबायोटिक्सचा डोस वाढवण्याचे फायदे-तोटे यावर विचार व्हावा!

अँटीबायोटिक्सचा जादा डोस समस्या निर्माण करत असून त्यामुळे जास्त क्षमतेचे बॅक्टेरिया विकसित होऊ शकतात. नव्याने विकसित होत असलेल्या स्ट्रेन्सचं आरोग्य चांगलं असणं हा या समस्येचा नवा आयाम आहे. , 'नवी औषधं विकसित करताना ती संसर्गापासून किती प्रभावी पद्धतीने मुक्ती देऊ शकतात, हे पाहिलं जातं. मात्र ज्या बॅक्टेरियांना लक्ष्य करण्यासाठी हे औषध विकसित केलं जातं, त्यांच्याबद्दल रेझिस्टन्स तयार होण्याबरोबरच त्यांच्यापासून नव्या, तंदुरुस्त स्ट्रेन्स विकसित होऊ शकतील, या शक्यतेवर फारसं लक्ष दिलं जात नाही.'
😷😷
फार्मासिस्ट हृशिकेश गोखरे,ब्रम्हपुरी

रेमडीसीविर,टोस्युलिझुम्याबआणि ,आता अँफोटेरीन बी,हे इंजक्शन देखील मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळणार नाही!वरील दोन इंजक्शन जसे ...
15/05/2021

रेमडीसीविर,
टोस्युलिझुम्याब
आणि ,आता

अँफोटेरीन बी,
हे इंजक्शन देखील मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळणार नाही!

वरील दोन इंजक्शन जसे मिळायचे त्याच पद्धतिने आता हे देखील मिळणार!

हळू हळू बहुतेक सगळीच औषधे अशी मिळायला लागली
तर ती वेळेवर आणि योग्य किमतीत कशी भेटणार?

काळाबाजार होईल या शक्यतेतून अशा आयडिया कोणत्या भांगर डोक्यातून निघत असतील?

मागच्या वेळच्या लाटेत याच केमिस्ट नी पेशन्ट ला अगदी सहज ही औषधे पुरवली होती!
मात्र आता कंट्रोल आणि निर्णय काहीही माहिती नसलेल्या लोकांच्या हातात गेल्याने च या औषधांचा काळा बाजार होतोय यात तीळ मात्र शंका नाही!

वाईट वाटत ते याचं की ,
पेशन्ट हताशपणे भटकत असतात प्रिस्क्रिप्शन घेऊन!

औषध लिहून देणाऱ्या डॉक्टर ला देखील माहिती आहे की हीऔषधे फार्मसी मध्ये मिळणार नाहीत!
मग त्याची प्रिस्क्रीशन देऊन पेशन्ट ची ससे होलपट करणे हे चूकच!

पण हे करून आपण नकळत काळ्या बाजाराला प्रोत्साहन देतोय हे लक्षात घेत नाहीत!......शशांक म्हात्रे (फेसबुक वरून)

चंदनखेडा येथे कोविड केअर सेंटर सुरू ....
01/05/2021

चंदनखेडा येथे कोविड केअर सेंटर सुरू ....

🙏🙏🙏
29/04/2021

🙏🙏🙏

🙏❤️🥘🍲  भात कसा करावा?🍲🥘❤️🙏🥘 आयुर्वेदाच्या पद्धतीने भात कसा करायचा हे शिकवायला हवे. भात कसा पिकवायचा आणि भात कसा खायचा हे...
18/01/2021

🙏❤️🥘🍲 भात कसा करावा?🍲🥘❤️🙏

🥘 आयुर्वेदाच्या पद्धतीने भात कसा करायचा हे शिकवायला हवे. भात कसा पिकवायचा आणि भात कसा खायचा हे ज्ञान सुमारे २५०० वर्षांपूर्वी भारताने जगाला दिले. एवढी वर्ष भात खाऊनही भारतीयांना डायबेटीस होत नव्हता आणि आज तोच भारत मधुमेहाची राजधानी झालाय. हे कसं काय ? भात बनवण्याच्या पद्धतीतील बदल याला कारणीभूत आहे.

🥘 भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असल्यामुळे त्याच्याने डायबेटीस होऊ शकतो असे आधुनिक विज्ञान सांगते. गंमत म्हणजे भाताच्या काही विशिष्ट जाती खाल्ल्याने किंवा भातापासून बनवलेले खीर, खिचडी यासारखे काही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने प्रमेह हा डायबेटीसशी साम्य दाखवणारा 'प्रमेह' हा आजार होऊ शकतो असे आयुर्वेद सांगतो. आयुर्वेदानुसार द्रवरूप कफाला वाढवणारा कोणताही पदार्थ प्रमेह निर्माण करू शकतो. थोडक्यात आधुनिक शास्रानुसार ज्या भाताचा GI जास्त त्याने डायबेटीस होण्याची शक्यता अधिक तर आयुर्वेदानुसार जो भात कफाला वाढवतो त्याच्याने डायबेटीस होण्याची शक्यता जास्त. म्हणजेच आपण भाताची कफ वाढवण्याची प्रवृत्ती कमी करू शकलो तर डायबेटीसला घाबरण्याची गरज नाही. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला ‘दहा कलमी’ कार्यक्रम वापरला पाहिजे. यातील पाच नियम तांदळाच्या निवडीसंदर्भात आहेत तर पाच नियम भात शिजवण्यासंबंधी आहेत.

🙏🍲🥘 भाताची निवडणूक 🥘🍲🙏

🥘 ज्या तांदळाचा दाणा लांब असतो आणि ज्याला सुगंध असतो तो डायबेटीसचे कारण ठरतो असे चरक संहितेत सांगितले आहे. त्यामुळे बासमती, आंबेमोहोर स्पर्धेतून बाद होतात. सुगंध असलेला तांदूळ कधीतरी सणाच्या दिवशीच खावा. International Rice Research Institute आणि University of Queensland यांनी जगातील २३३ तांदळाच्या जातींवर संशोधन केले आहे. या रिसर्चचे प्रमुख डॉ. फिट्सगेराल्ड यांच्या म्हणण्यानुसार “भारतातील सुवर्ण आणि मसुरी तांदळाचा GI ५५ पेक्षा कमी आहे; तर बासमती तांदळाचा GI ६८ आहे असे सांगितले आहे. आयुर्वेदानुसार जे धान्य तुम्ही राहत असलेल्या प्रदेशात तयार होते ते तुमच्यासाठी योग्य असते. म्हणून आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भागात तयार होणारा तांदूळ खाण्यास योग्य.

🥘 ज्या तांदळाचे पीक कमी दिवसात तयार होते तो पचायला हलका असतो. पूर्वी कोकणात साठ दिवसात तयार होणारा साठेसाळीचा भात मिळत असे. पण आता तो क्वचितच बघायला मिळतो. जागतिकीकरणाच्या उत्साहात आपण आपल्या बऱ्याच देशी गोष्टी गमावून बसलो ही त्यातलीच एक.

🥘 तांदळावरील आवरण काढण्यासाठी त्याच्यावर जितक्या अधिक प्रक्रिया केल्या जातात तेवढा तो शुभ्र बनतो आणि पचायला जड होतो. म्हणूनच कमी प्रोसेस केलेल्या ब्राऊन राईसची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ब्राऊन राईस खाल्ल्याने तांदळाच्या वरच्या कवचात असणारे पोषक घटक टिकून राहतात. जास्त पॉलिश केल्याने ते निघून जातात.

🥘 पूर्वीच्या काळी धान्य घरात साठवून ठेऊन मग वापरण्याची पद्धत होती. साठवून ठेवलेल्या तांदळातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तो कफ वाढवत नाही. नवीन तांदळाचा भात चिकट होतो आणि जुन्या तांदळाचा भात मोकळा होतो हे आपण पाहतोच. हल्ली धान्य साठवून ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. “महिन्याचे रेशन महिन्याला भरा” अशी कामचलाऊ व्यवस्था उदयास आली आहे. या गोष्टीचा फायदा घेऊनच आता दोन वर्ष ‘एज’ (Aged) केलेला महाग तांदूळ काही कंपन्यानी विकायला आणला आहे. याला पर्याय म्हणून भात करण्यापूर्वी तांदूळ थोडे भाजून घेतल्यास त्याच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि तो पचायला हलका होतो.

🥘 म्हणजेच सुगंध नसलेला, आपण राहत असलेल्या प्रदेशात तयार होणारा, कमी दिवसात तयार होणारा, कमी प्रक्रिया केलेला, एक वर्ष साठवून ठेवलेला किंवा भाजून घेतलेला तांदूळ भात करण्यासाठी योग्य आहे.

🙏🍲🥘 ऑपरेशन राईस 🥘🍲🙏

🥘 आता आपण प्रत्यक्ष भात बनवण्याची कृती म्हणजे 'ऑपरेशन राईस'ला सुरुवात करूया. ‘अष्टांगहृदय’ या ग्रंथात चांगल्या भाताचे गुणवर्णन पुढीलप्रकारे केले आहे.

सुधौत: प्रस्रुत: स्विन्नोऽत्यक्तोष्मा च ओदनो लघुः I
यश्चाग्नेय औषध क्वाथसाधितो भृष्टतण्डुल: II

🥘 सुधौत म्हणजे व्यवस्थित धवून घेतलेला, प्रस्रुत म्हणजे पेज काढून घेतलेला, पूर्ण शिजलेला आणि खाताना गरम असलेला भात पचायला हलका असतो. त्याचबरोबर पचनाला मदत करणाऱ्या औषधांनी सिद्ध केलेला आणि भाजून घेतलेल्या तांदळाचा भात पचायला हलका असतो. आता यातील प्रत्येक मुद्द्याचा विचार करू.

🥘 सुधौत – भात शिजवण्यापूर्वी तांदूळ दोन वेळा व्यवस्थित धुवून घेणे आवश्यक आहे. असा धुतलेला तांदूळ १५ ते २० मिनिट तसाच ठेवल्यास भात लवकर शिजतो.

🥘 प्रस्रुत, स्विन्न – याचा अर्थ पेज काढून घेतलेला आणि पूर्ण शिजलेला. आयुर्वेदातल्या ‘भावप्रकाश’ या ग्रंथात भात शिजवण्याची प्रक्रिया सविस्तर वर्णन केली आहे. कोणताही पदार्थ चांगला शिजण्याकरिता त्याला सर्व बाजूने समान उष्णता मिळणे आवश्यक असते. हे काम मातीच्या भांड्यात उत्तम प्रकारे होते. हल्ली चीनी मातीपासून बनवलेली भांडी मिळतात त्यामध्ये भात बनवल्यास ते सर्वात उत्तम. हे शक्य नसेल तर बुडाशी जाड असलेले पितळेचे पातेले वापरावे.

🥘 भात शिजवण्यासाठी प्रथम तांदळाच्या पाच पट पाणी घेऊन ते उकळू द्यावे. त्यानंतर अगोदर धुवून ठेवलेला तांदूळ त्यात घालावा. थोडा वेळ भात शिजू द्यावा. तांदळापासून भात करत असताना त्यातील स्टार्चमध्ये ‘जिलेटिनायझेशन’ नावाची प्रक्रिया घडते आणि या जिलेटिनायझेशनमुळे भाताचा GI वाढतो. त्यामुळे भात जितका अधिक शिजेल तितका त्याचा GI जास्त. आयुर्वेदाने सांगितलेल्या पद्धतीत पाणी अगोदर उकळून घेतलेलं असल्याने भात लवकर शिजतो. ‘शितावरून भाताची परीक्षा’ करून झाली की जास्तीचे पाणी म्हणजे पेज बाजूला काढून घ्यावी आणि भात झाकून ठेवावा. आत कोंडून राहिलेल्या वाफेमुळे भाताची शितं मोकळी होतात. बाजूला काढून ठेवलेली पेजेत जास्तीचे स्टार्च बाहेर पडून जाते. त्यामुळे भाताचा चिवटपणा कमी होतो म्हणजेच त्याचा GI कमी होतो. ही पेज घरातल्या लहान मुलांना द्यायला हरकत नाही. गेल्या २५ – ३० वर्षात आपण भात शिजवायला कुकर वापरायला लागलो त्यामुळे पेज वेगळे काढण्याची पद्धत बंद झाली आणि त्यामुळे डायबेटीसचे पेशंट वाढायला सुरुवात झाली. कुकरमध्ये भात लवकर शिजतो पण पचायला जड होतो.

🥘 भाताची कफ निर्माण करण्याची प्रवृत्ती कमी करण्याचा अजून एक उपाय आहे; तो म्हणजे पचनाला मदत करणाऱ्या औषधांसोबत भात शिजवणे. यासाठी मिरे, दालचिनी, हळद यासारख्या मसाल्याच्या पदार्थांचा वापर होतो. यातही भात खाऊन पोट जड होते त्यासाठी मिरे, छातीत कफ साठतो त्यांच्यासाठी दालचिनी आणि ज्यांच्या घरात डायबेटीसची हिस्ट्री आहे त्यांनी हळकुंड घालून भात करावा. दक्षिण भारतात अनेक राज्यात भात हेच दोन्ही वेळचा आहार असतो म्हणून तिथे इडलीतही मिरे घालण्याची प्रथा दिसते ती यामुळेच.

🥘 अशा पद्धतीने केलेला भात हा गरम असतानाच खाल्ला पाहिजे असे आयुर्वेद सांगतो. जे लोक तांदूळ निवडताना आणि भात शिजवताना आयुर्वेदाचा ‘दहा कलमी’ कार्यक्रम पाळतील त्यांनी डायबेटीसला घाबरण्याची आजिबात गरज नाही.

लेखक्- वैद्य सुविनय दामले!

व्हाट्सअप्प वरून साभार.....🙏

*छातीतलं दुखन्याला हलक्यात घेऊ नका!!!*✅✅✅✅भारत २०२१ पर्यंत सर्वाधिक हृदयरुग्ण असलेला देश होईल, असं भाकीत जागतिक आरोग्य स...
05/01/2021

*छातीतलं दुखन्याला हलक्यात घेऊ नका!!!*
✅✅✅✅

भारत २०२१ पर्यंत सर्वाधिक हृदयरुग्ण असलेला देश होईल, असं भाकीत जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवलं आहे. त्यात २५ ते ३०वर्ष वय असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील १२.५ टक्‍के मृत्यू हे हृदयाच्या कार्यात बिघाड झाल्याने होतात. ⁉️⁉️

एकंदरीत हृदयरोगामुळे मृत्यूचं प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत असल्याचं सातत्याने होणाऱ्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. दरवर्षी जगातील पावणेदोन कोटी नागरिक हृदयाच्या आजाराने दगावतात. एड्‌स, टीबी, मलेरिया, मधुमेह, सर्व प्रकारचे कर्करोग आणि श्‍वासरोगामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या कैकपटीने जास्त आहे.

देशातील एकूण हृदयरुग्णांपैकी ३५ टक्‍के रुग्ण हे ४५ पेक्षा कमी वयाचे आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. यात तरुणांची संख्याही वाढत आहे.

सामान्य जीवनासाठी धोकादायक ठरत असलेल्या हृदयविकारची कारणं अनेक आहेत. विद्यार्थ्यांमधील पहिलं कारण आहे, तरुण पिढीवर चारही बाजूने येणारं दडपण. त्यात भर पडते लहानपणापासूनच असणारं पुस्तकांचं ओझं, महाविद्यालयातील प्रवेश, परीक्षेचा ताण यांची. त्यानंतर करिअरविषयी वाढणाऱ्या चिंता, ध्येयपूर्तीसाठीचा दबाव, पुढे जाण्याच्या स्पर्धेत मागे पडण्याची चिंता.
हृदयविकाराचे झटके येण्याच्या अनेक घटनांत हीच महत्त्वाची कारणं आढळून आली आहेत. धमन्यांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळेही हृदयविकार वाढतो. मात्र ही बाब अचानक होत नाही. तर धमन्यांमध्ये अडथळ्याची प्रक्रिया लहानपणापासूनच सुरू होते. वाढत्या वयाबरोबर ही प्रक्रिया अधिक वाढू लागते.

आनुवंशिकतेमुळेही भारतीयांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढत आहे. कारण भारतीयांमध्ये लो डेफिनेशन लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं.

*हृदय बंद पडतं म्हणजे काय?*
📍📍📍
हृदयाचे स्नायू खराब होणं, बिघडणं. म्हणजे हृदयाला रक्‍तपुरवठा करणाऱ्या रक्‍तवाहिन्या बंद होतात. त्यामुळे हृदयाकडे होणारी रक्‍ताभिसरणाची क्रिया थांबते. हृदयाचा रक्‍तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडते. जर हे रक्‍ताभिसरण सहा तासांपेक्षा जास्त वेळ बंद असेल तर हृदयाच्या भागात असणारे स्नायू मरतात. किंवा कायमचे खराब होतात.
याला हृदयक्रिया बंद पडणं (हार्ट अटॅक) असं म्हणतात. हृदयाच्या स्नायूंमध्ये असणारी रक्‍ताची गुठळी होणं किंवा रक्‍तातील गुठळीमुळे हृदयाच्या रक्‍तवाहिनीचे तोंड बंद होणं असंही म्हणतात. रक्‍तवाहिनीचं तोंड बंद झाल्याचा परिणाम हृदयाच्या थोडया भागांवर झाला असेल छोट्या प्रमाणातील हार्ट अटॅक येतो.

हृदयरोगाची लक्षणं झटका येण्याच्या अगोदरच दिसून येतात, परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण हृदयरोगी मात्र याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्याला हृदयाचा झटका आला आहे, हे ओळखणं फार कठीण असतं. त्यावेळी श्‍वास घ्यायला त्रास होतो. भरपूर घाम येतो. मळमळतं. चक्‍कर येते. उलट्या होतात.

शरीराला कंप सुटतो. ही हृदयाच्या झटक्‍याची सामान्य लक्षणं आहेत. कधीकधी छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात. या वेदना छाती किंवा पोटाच्या मध्यभागी वा पाठीच्या मणक्‍यात होतात. तिथून त्या मानेत किंवा डाव्या ताकडे जाऊ शकतात. या वेदना मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकतात. काही वेळा रुग्णाच्या शरीराचा रंग बदलतो. अचानक रक्‍तदाब कमी होऊन मृत्यूही येतो.

*प्रथमोपचार*
☑☑☑
प्रथमोचार हे रुग्णावर झटकन झाले पाहिजेत. आणि ते झाले तर रुग्णाचे जीव वाचतात. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवं झोपवावं. त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावेत. जर ऑक्‍सिजन सिलिंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरित ऑक्‍सिजन द्यावा. नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरब्रिटेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरित त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. पाण्यात ऍस्प्रीन ढवळून द्यावं.

*डॉक्‍टरांकडून केले जाणारे उपचार कोणते?*
✅✅✅
हृदयविकारावर झटकन वैद्यकीय उपचार आणि इस्पितळात भरती करणं गरजेचं असतं. हृदयाचा त्रास निर्माण झाल्याची काही मिनिटं, काही तास जरा संकटाचे असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधं दिली जातात. डॉक्‍टर रुग्णांची सूक्ष्म तपासणी करतात.
हृदयाची स्पंदनं मोजतात. रक्‍तदाब पाहतात. इलेक्‍ट्रोकार्डिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो. ईसीजीमुळे हृदयाच्या ठोक्‍यांचा अंदाज येतो. या ठोक्‍यांमध्ये काही असामान्य लय आहे का ते दिसते. हृदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचं नुकसान झालेलं असल्यास तेही लक्षात येतं.

मात्र, प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. हृदयाच्या मांसपेशींचं नुकसान झालेलं असल्यास ते रक्‍ताच्या परीक्षणात दिसून येतं.

छातीचा एक्‍सरेदेखील घेतला जातो. हृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कॅन चाचणी आहे. हृदयाच्या कार्याची माहिती मिळते. कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी अँजिओग्राम काढला जातो.

*हृदयाशी संबंधित आजार*

*- ऍनजायना पेक्‍टोरिस *-*📍 हृदयाला पुरेसा रक्‍तपुरवठा न झाल्यामुळे छातीत, पाठीत, मानेत, हातात किंवा यापैकी एखाद्या ठिकाणी वेदना होणं
*- आर्टिरिओ स्क्‍लेरॉसिस -* 📍
शुद्ध रक्‍तवाहिन्यांची/धमन्यांची लवचिकता कमी होत त्या कडक होणं
*- कार्डिऍक अरेस्ट -* 📍
हृदयक्रिया बंद पडणं

*- कॉरोनरी हार्ट डिसाज्‌ -* 📍
हृदयाला रक्‍तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा येणं किंव्या त्या चिंचोळ्या होणं
*- व्हॉल्व्यूलर हार्ट डिसीज्‌ -*📍 हृदयातील झडपेचा आजार

*- मायोकार्डियल इनफाक्‍शन -* हृदयाच्या ठोक्‍यांमधील अनियमितता

छातीत दुखतं ही कल्पनाही घाबरून सोडते. छातीचं दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असं जणू समीकरणच बनत आहे. मग सुरू होतो विविध तपासण्यांचा भडिमार. अँजिओग्राफी, अँजिओप्लॅस्टी आणि वेळ आली तर बायपास सर्जरीही. या उपचार पद्धतींबरोबर त्यांचे वाढते अवाढव्य खर्च या विचाराने रुग्ण नि त्याच्या संबंधित व्यक्‍तींचं आयुष्य विस्कळीत होतं.
साभार- डॉ. जयदीप महाजन

संकलन:फार्मासिस्ट हृषीकेश गोखरे
ब्रम्हपुरी, चंद्रपूर

काय गंमत आहे पहा...आम्ही मार्केटींगला कसे भुलतो आणि फसतो याचं हे साधं उदाहरण आहे हे...“An apple a day keeps doctor away....
22/10/2020

काय गंमत आहे पहा...
आम्ही मार्केटींगला कसे भुलतो आणि फसतो याचं हे साधं उदाहरण आहे हे...
“An apple a day keeps doctor away..“
असं सांगीतलं की आम्ही मन लावून सफरचंद खातो. डॉक्टरही तेच सांगतात. कारण तेही तेच शिकले आहेत. कारण आरोग्यविज्ञान युरोपीय.
अतिथंड हवामान आणि तेथे उपलब्ध फळे याचाच त्यांनी विचार केला.
याउलट भारतीय ऊष्णकटीबंधीय प्रदेशात असणारी जी देशी फळे आहेत, त्यात दहापटी पेक्षा जास्त गुण आढळतात.
Google wikipedia check करून पाहू शकता. एक सिताफळ हे प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स साठी दहापट सफरचंदाचे
तर खनीजांसाठी चौपट सफरचंदाचे काम करते.
पण डॉक्टर आम्हाला हे सांगणार नाहीत आणि सहज उपलब्धतेमुळे आम्हाला त्याचे महत्व पटणार नाही.
"अतिपरिचयात् अवज्ञा.."
म्हणतात ते हेच.
हीच गोष्ट आवळा आणि किवी फळाची..
पेरूची ही तीच गत..पेरूसुद्धा सफरचंदापेक्षा कितीतरी पट परीपुर्ण आहे.
परंतु सफरचंदाला मार्केटींग स्कील्सने स्टेटस दिलंय. आणि आम्ही डोक्यावर घेतलंय.
तेंव्हा आजारी माणसाला भेटायला जाताना आवर्जून ही देशी फळे घेवून जा..
आणि आपणही सुरूवात करा.
जांभूळाचे महत्व शुगरवाल्याना आता कुठे पटू लागलय.
थोडा वेळ लागेल इतकंच....
(सोबत तुलनात्मक तक्ता आहे)
प्रा. प्रशांत गुरव.
उस्मानाबाद.

Address

Chandankheda
Bhandak
MAHARASTRA

Telephone

9922333901

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साईंकृपा मेडिकल अण्ड जनरल स्टोर्स चंदनखेड़ा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share