15/08/2025
जागर नशामुक्त अभियानांतर्गत, १५ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिस मुख्यालय, भंडारा येथे अस्तित्व व्यसनमुक्ती केंद्र, मुख्यालय भंडारा यांना “उत्कृष्ट व्यसनमुक्त जनजागरण समाजनिर्मिती पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाची बाब असून, समाजातील व्यसनमुक्त जनजागरणासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल आहे.
हा पुरस्कार पालकमंत्री मा. श्री संजयजी सावकारे, जिल्हाधिकारी मा. श्री सावन कुमार, पोलिस अधीक्षक मा. श्री नुरुल हसन, खासदार मा. श्री प्रशांतजी पडोळे, आमदार मा. श्री परिणय दादा फुके आणि आमदार मा. श्री राजू भाऊ कारेमोरे यांच्या हस्ते प्रदान झाला. आम्ही मनःपूर्वक आभार मानतो की, आपल्या सर्वांच्या प्रोत्साहन, विश्वास आणि सहकार्यामुळे आम्ही हा सन्मान मिळवू शकलो. हा पुरस्कार आम्हाला पुढील काळातही व्यसनमुक्त, निरोगी आणि जागरूक समाज निर्मितीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देतो.
#व्यसनमुक्तीकेंद्र #व्यसनमुक्तयुवकसंघ