13/08/2021
#चरकजयंती
#नागपंचमी
योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेन।
योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां, पतंजलि प्रांजलिरानतोऽस्मि।। पातञ्जल-महाभाष्य-चरकप्रतिसंस्कृतै:।
मनोवाक्कायदोषाणां हन्त्रेऽहिपतये नम:।।
महर्षी पतंजली,महर्षी पाणिनी व महर्षी चरक ही भगवान शेषना(ग)रायणाचे अवतार आहेत. भगवान शेषना(ग)रायणांनी या अवतारात अनुक्रमे योगशास्त्राने मानसिक दोषांचा, संस्कृत भाषा शुद्धीने वाचेच्या दोषांचा आणि आयुर्वेद वैद्यकशास्त्राने शारीरिक दोषांचा नाश केला.
आज नागपंचमी या शेषना(ग)रायणांच्या पूजनाच्या दिवशी महर्षी चरक जयंती साजरी केली जाते. आयुर्वेदाचे आद्य प्रचारक म्हणून महर्षी चरक विश्वविख्यात आहेत.
अग्निवेश तंत्रावर महर्षी चरक यांनी प्रतिसंस्करण केले व आज हे अग्निवेश तंत्र चरकसंहिता नावाने प्रसिद्ध पावले आहे. चरकाचार्यांनी अष्टांग आयुर्वेदा सहित कायचिकित्सा प्रधान चिकित्सा सिद्धांतांचे वर्णन आपल्या ग्रंथात केले. हे चिकित्सेचे सिद्धांत त्रिकालाबाधित व शाश्वत स्वरूपाचे असल्याचे आजही प्रत्ययास येते. म्हणूनच 'चरकस्तु चिकित्सिते' असं म्हटले जाते.
'यदिहास्तितद्न्यत्र यन्नेहास्तिनत्तक्वचित' या न्यायाने चरकसंहितेमध्ये ऊहापोह केलेले आयुर्वेदाचे सिद्धांत इतर सर्व संहितांमध्ये आपणास पाहावयास मिळतात तर चरकसंहितेमध्ये नसलेले नवीन सिद्धांत क्वचितच इतर ठिकाणी लिहिल्याचे आढळते. त्यामुळे आयुर्वेदाच्या चिकित्सेचे समग्र ज्ञान भंडार चरक संहितेच्या अध्ययनाने प्राप्त होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आज नागपंचमी निमित्त आयुर्वेद क्षेत्रातील महान विभूती महर्षी चरक यांना सादर प्रणिपात करून सर्व आयुर्वेद स्नातक, हितचिंतक या सर्वांनी आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांतानुसार दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, आहार विहारादि नियम अनुसरुण 'स्वस्थस्य स्वास्थरक्षण' हा आयुर्वेदाचा आद्य नियम साकार करावा; व गरज भासल्यास व्याधी उत्पत्ती असताना आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतानुसार चिकित्सा करून व्याधीचा उपशम करावा.
महर्षी चरक जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
💐💐💐🙏🙏🙏
वै. शामसुंदर जोशी
एम.डी.आयुर्वेद