जिल्हा शल्य चिकित्सक बीड

  • Home
  • India
  • Bhir
  • जिल्हा शल्य चिकित्सक बीड

जिल्हा शल्य चिकित्सक बीड Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जिल्हा शल्य चिकित्सक बीड, Hospital, Beed, Bhir.

District Hospital, Beed — the official page for sharing authentic updates on healthcare services, public health programee, initiatives, and important information for citizens.

HPV अत्यंत महत्त्वाची.... #जिल्हाप्रशासन  #आरोग्यसेवा  #पालकमंत्री  #विभाग  #आरोग्य  #जिल्हा
18/04/2026

HPV अत्यंत महत्त्वाची....
#जिल्हाप्रशासन #आरोग्यसेवा #पालकमंत्री #विभाग #आरोग्य #जिल्हा

14/04/2026

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बीड जिल्हा रुग्णालयात उत्साहात साजरी.
सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांची मोठी संख्या उपस्थित.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बीड जिल्हा प्रशासनासोबत जयंती साजरी. सर्व जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बीड जिल्हा प्रशासनासोबत जयंती साजरी. सर्व जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

जिल्हा रुग्णालय बीड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी मा. जिल्हा शल्य चिकित्सक ड...
14/04/2026

जिल्हा रुग्णालय बीड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ साळुंके साहेब मा. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण साहेब तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

13/04/2026

2025-26 वर्षभरातील जिल्हा रुग्णालयातील चांगल्या कामाची पावती......
जिल्हा रुग्णालय सर्व आरोग्य विभाग कर्मचारी टीम वर्क.
धन्यवाद.. पत्रकार बांधव..

जि. रू. बीड टीम वर्क 2025-2026.धन्यवाद... 🙏
13/04/2026

जि. रू. बीड टीम वर्क 2025-2026.
धन्यवाद... 🙏

जिल्हा रुग्णालय बीड येथे क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी मा. जिल्हा शल्य चिकित्सक ड...
11/04/2026

जिल्हा रुग्णालय बीड येथे क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ साळुंके साहेब मा. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण साहेब. डॉ. राऊत साहेब व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

*मा डॉ सुनील भोकरे सर आयुक्त शहरी आरोग्य अभियान यांनी दि.10-4-2826 रोजी जिल्हा रुग्णालय येथे भेट दिली व सर्व वैद्यकीय अध...
11/04/2026

*मा डॉ सुनील भोकरे सर आयुक्त शहरी आरोग्य अभियान यांनी दि.10-4-2826 रोजी जिल्हा रुग्णालय येथे भेट दिली व सर्व वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांचा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे शहरी आरोग्य अभियान, माझे गावं आरोग्य संपन्न गावं,HPV Vaccination,ART अशा विविध विषयांचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले यावेळी मा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ साळुंके साहेब, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंडाळ साहेब,मा.निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.तांदळे सर मा जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ सचिन शेकडे सर, सर्व वैद्यकीय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी ,वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते*

धन्यवाद. प्रवक्ता लोकशाहीचा.... #जिल्हाप्रशासन  #आरोग्यसेवा  #पालकमंत्री    #विभाग  #आरोग्य  #जिल्हा
09/04/2026

धन्यवाद.
प्रवक्ता लोकशाहीचा....
#जिल्हाप्रशासन #आरोग्यसेवा #पालकमंत्री #विभाग #आरोग्य #जिल्हा

[09/04, 10:47] Tv9: बीड जिल्हा रुग्णालयात वर्षभरात 5 लाख 33 हजार रुग्णांनी घेतले उपचार.तर 12 हजार झाल्या शस्त्रक्रिया. प...
09/04/2026

[09/04, 10:47] Tv9: बीड जिल्हा रुग्णालयात वर्षभरात 5 लाख 33 हजार रुग्णांनी घेतले उपचार.तर 12 हजार झाल्या शस्त्रक्रिया.

पुन्हा एकदा सिद्ध झाला जिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण सेवेवर -रुग्ण नातेवाईकांचा विश्वास.

महिलांच्या डिलिव्हरीत -सिजरींगंचे प्रमाण जास्तच ही चिंतेची बाब.
जि रुग्णालयात 4311मुल आणि 3856मुलीनी घेतला जन्म. मुलीपेक्षा मुलांची जास्त संख्या .
साप- विंचू -कुत्रा चावल्याने 5 हजार 400 जणांनी घेतले उपचार.

लॅब टेस्ट 6 लाख 71 हजार 880 जणांनी केल्या रक्ताच्या चाचण्या.

नैसर्गिक मृत्यू, अपघात, अटॅक, आत्महत्या, खून, हाणामाऱ्या अशा घटनेतील उपचारादरम्यान 552 जणांचा गेला जीव.

(ज्ञानोबा वायबसे बीड -
प्रवक्ता लोकशाहीचा प्रतिनिधी)
- बीड जिल्हा रुग्णालयात 2025-26या गेल्यावर्षभरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, RMO बाह्यरुग्ण विभागाचे प्रमुख डॉ लक्ष्मीकांत तांदळे, स्त्री रोग विभाग प्रमुख डॉक्टर शेख फरीदा मॅडम हे सध्या जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य आधिसेविका मेट्रन रमा गिरी, सहाय्यक मेट्रन संगीता महानवर शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा बेदरे, डॉक्टर फरीदा मॅडम, डॉ. संजय राऊत,डॉ. सुधीर राऊत, डॉ.सदाशिव राऊत, डॉ. प्रीतम लोध, डॉ. राठोड सर, डॉ नितीन जोगदंड, डॉ. परमेश्वर बडे, डॉ. किरण शिंदे, डॉ. विजय कट्टे, डॉ. जाजु सर,डॉ. पूनम लोध, डॉ. मेंगडे मॅडम, डॉ ईलीयास सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विविध वार्डात योग्य नियोजन करत आरोग्य सेवा दिली. तसेच जि. रू विभाग प्रमुख यांनी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर यशस्वी उपचार केले. सर्व तज्ञ यामध्ये प्रामुख्याने डॉ,अधिपरिचारिका, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक अशा सर्व कर्मचाऱ्यांनी आपली रुग्ण सेवा यशस्वी दिली.
31 मार्च 2025 ते 31 मार्च 2026 या गेल्या वर्षभरात बीड जिल्हा रुग्णालययात पाच लाखापेक्षा जास्त प्रमाणावर शहरासह, ग्रामीण भागातील रुग्णांनी योग्य ते उपचार घेतले.

बीड जिल्हा रुग्णालयात विभाग निहाय्य रुग्णांनी उपचार घेतलेली संख्या पुढील प्रमाणे ओपीडी -533103, आय पी डी -133259, नवीन ऍडमिशन -51488, छोट्या शस्त्रक्रिया -2434, मोठ्या शस्त्रक्रिया -9358, एक्स-रे विभाग -46276, सोनोग्राफी विभाग-43710, ईसीजी विभाग -21186, सिटीस्कॅन विभाग -12043, साप बाईट-364, विंचू बाईट -57, कुत्रा चावला -4943, लॅब टेस्ट रक्त चाचण्या-671880, रक्तपुरवठा विभागात-5668 रक्तपेशा जमा झाल्या. कशी आहे वर्षभरात डिलिव्हरी 8196, त्यापैकी 4567 सिजरिंग करण्यात आले. मोतीबिंदू डोळ्याच्या शस्त्रक्रिया 2606 यशस्वी करण्यात आल्या. बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी अपघात विभागात दाखल झालेल्यांची संख्या MLC -6462, अँजिओग्राफी -18 तसेच महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया-1194 इतक्या रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. तसेच इमर्जन्सी अपघात विभागात अटॅक, नैसर्गिक मृत्यू, वयोवृद्ध,आत्महत्या, खून, अपघात, उपचारा दरम्यान 552 जणांना आपला जीव गमावा लागला.
गत गेल्या वर्षभरात बीड जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर होण्याची संख्या येत आहे. उपडी विभागातील, दंत विभाग, स्त्री रोग विभाग, एक्स-रे,सर्जरी विभाग, कान नाक,त्वचा विभाग, सोनोग्राफी, एक्स-रे सिटीस्कॅन, लॅब टेस्ट, षध विभाग, अशा विभागात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची मोठी गर्दी असते..
तसेच आयपीडी विभागात महिला सर्जरी वॉर्ड, पुरुष सर्जरी वार्ड, जळीत वॉर्ड, सिजरिंग-डिलिव्हरी वार्ड,अतिदक्षता विभाग, नवजात बालक अतिदक्षता विभाग नेत्र विभाग अशा सर्वच विभागां मध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या वर्षभरात शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी रात्रंदिवस या आरोग्य सेवेला साथ दिली. तसेच सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग यांनी या संपूर्ण वर्षभराचे योग्य नियोजन करत जिल्हा रुग्णातील प्रत्येक वार्डाचे योग्य नियोजन करत सर्व रुग्णालयात आलेल्या रुग्णावर यशस्वी उपचार करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिलेलं आहे.
[09/04, 10:47] Tv9: चौकट...
*प्रथमच बीड जिल्हारुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी कॅथलॅबची उभारणी*

बीड जिल्हातील रुग्णांच्या हितासाठी पहिल्यांदाच बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी कॅथलॅबची उभारणी करण्यात आली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राज्यातला पहिला कोर्स बीडमध्ये जिल्हा रुग्णालय अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयात सुरू झाला. यामध्ये प्रामुख्याने पोस्ट बेसिक डिप्लोमा पिडीयाट्रिक नर्सिंग या कोर्सला मान्यता देण्यात आली व तो गेला गत वर्षात सुरू झाला. यामध्ये प्रामुख्याने 20 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत.

चौकट...
*विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सेवा*

रुग्णालयातील विविध तपासण्यांमध्येही मोठी वाढ दिसून आली आहे.
एक्स-रे : 46,276
सोनोग्राफी : 43,710
ईसीजी : 21,186
सिटीस्कॅन : 12,043
रक्त तपासण्या : 6,71,880
तसेच रक्तपेढीत 5,668 रक्तपिशव्या जमा झाल्या आहेत.

चौकट...
*साप-विंचू-कुत्रा चावल्याच्या घटना*

ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या लक्षात घेता साप, विंचू आणि कुत्रा चावल्याच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणावर उपचार करण्यात आले.
साप चावा : 364
विंचू चावा : 57
कुत्रा चावा : 4,943
एकूण : 5,400 रुग्णांनी उपचार घेतले

चौकट...
*प्रसूती आणि सिझेरियनचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय*

गेल्या वर्षभरात रुग्णालयात 8,196 प्रसूती झाल्या. त्यामध्ये
4,311 मुलांचे जन्म
3,856 मुलींचे जन्म
मात्र यापैकी 4,567 सिझेरियन प्रसूती झाल्याने सिझेरियनचे प्रमाण जास्त असल्याची बाब चिंताजनक मानली जात आहे.

चौकट...
*अपघात व अन्य घटनांमध्ये 552 मृत्यू*

अपघात, हृदयविकाराचे झटके, आत्महत्या, खून, हाणामाऱ्या आणि नैसर्गिक मृत्यू अशा विविध कारणांमुळे उपचारादरम्यान 552 रुग्णांचा मृत्यू झाला. अपघात विभागात 6,462 एमएलसी प्रकरणे नोंदवली गेली.

चौकट...
*सर्व विभागांमध्ये रुग्णांची सेवा*

ओपीडी, दंत, स्त्रीरोग, सर्जरी, कान-नाक-घसा, त्वचारोग, एक्स-रे, सिटीस्कॅन, लॅब टेस्ट आदी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. तसेच आयपीडीमध्ये महिला-पुरुष सर्जरी वॉर्ड, जळीत वॉर्ड, अतिदक्षता विभाग, नवजात शिशू विभाग यामध्येही रुग्णसंख्या मोठी आहे.

चौकट...
*वैद्यकीय अधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान*

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, RMO प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शेख फरीदा यांच्यासह अनेक तज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व आरोग्य कर्मचाऱ्यांनी वर्षभर रात्रंदिवस सेवा दिली.
मुख्य अधिसेविका रमा गिरी, सहाय्यक मेट्रन संगीता महानवर तसेच शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा बेदरे आणि विद्यार्थ्यांचेही योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

*आज दि. ७ एप्रिल २०२६ — जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय,गेवराई येथे नियोजित भेट देऊन नागरिकांमध्ये आ...
08/04/2026

*आज दि. ७ एप्रिल २०२६ — जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय,गेवराई येथे नियोजित भेट देऊन नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके सर, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ सर तसेच मा. निवासी वैद्यकीय अधिकारी (बा. सं.) डॉ. एल. आर. तांदळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.*
*यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी” अशी असून, या थीमच्या अनुषंगाने कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा यांचा योग्य समन्वय साधून निरोगी समाजाची निर्मिती कशी करता येईल, यावर उपस्थितांना माहिती देण्यात आली.*
*कार्यक्रमादरम्यान “माझे गाव – आरोग्य संपन्न गाव” या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला. या अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, ता.गेवराई येथे मानसिक आरोग्य कार्यक्रमाविषयी श्री.अंबादास जाधव ,डॉ. अशोक मते यांनी मानसिक आजार व उपाय यावर मार्गदर्शन केले तसेच टोल फ्री क्रमांक 144416 याविषयी माहिती दिली. यावेळी श्री.अविनाश महालिंगे यांनी फ्लोरोसिस आजाराविषयी माहिती दिली. तसेच श्री.सुरेश दामोधर यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यांच्या दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले.यावेळी माहिती पुस्तिका,पोस्टर, पोम्प्लेट वितरित करण्यात आले.या कार्यक्रमाला रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईक,तसेच श्रीमती प्रियंका भोंडवे ,शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.*

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय बीड येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नबीड, दि. ७ एप्रिल २०२६ — जागतिक आरोग्य दिनाच...
08/04/2026

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय बीड येथे जनजागृती कार्यक्रम संपन्न
बीड, दि. ७ एप्रिल २०२६ — जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालय बीड येथे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके सर, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ सर तसेच मा. निवासी वैद्यकीय अधिकारी (बा. सं.) डॉ. एल. आर. तांदळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी” अशी असून, या थीमच्या अनुषंगाने कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा यांचा योग्य समन्वय साधून निरोगी समाजाची निर्मिती कशी करता येईल, यावर उपस्थितांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान “माझे गाव – आरोग्य संपन्न गाव” या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला. या अंतर्गत स्वच्छता, पोषण, लसीकरण, व्यसनमुक्ती, नियमित आरोग्य तपासणी आणि मानसिक आरोग्य यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागात आरोग्यविषयक सवयी रुजवून निरोगी आणि सक्षम समाज घडविण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी तज्ञ डॉक्टरांनी जीवनशैलीतील बदल, संतुलित आहार, नियमित व्यायाम, तंबाखू व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व यावरही प्रकाश टाकला. तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना नागरिकांना समजावून सांगण्यात आल्या.
कार्यक्रमास डॉ अभिजित भालेकर, डॉ. अशोक मते, श्री. नागनाथ भडकुंबे, श्री. अंबादास जाधव, श्री. सुरेश दामोधर आणि श्री. अविनाश महालिंगे हे उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे आणि समाजात आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्याबाबत जनजागृती होऊन नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरणा मिळाली.

Address

Beed
Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा शल्य चिकित्सक बीड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category