15/09/2020
*Ayurveda Immunity clinic*
रोगप्रतिकार शक्ती (Immunity) म्हणजे काय?
कोणत्याही व्याधींपासून शरीराला लांब ठेवण्याची प्रत्येकाची एक नैसर्गिक ताकद (Natural Tendency) असते, तिला व्याधीप्रतिकार शक्ती म्हणतात , किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास शेजारच्या व्यक्तीला झालेले दुखणे आपल्याला लगेच न होणे. यालाच आयुर्वेदात “ व्याधीक्षमता “ असे म्हणतात. थोडक्यात व्याधींना किंवा दुखण्यांना प्रतिकार करण्याची शरीराची असणारी स्वाभाविक ताकद ! आता प्रश्न पडेल कि प्रतिकार शक्ती जन्मजात असते कि ती नंतर वाढू शकते ?? आणि जर तिच्यात नंतर फरक पडत असेल तर कोणत्या कारणांनी ती कमी होते आणि वाढत असेल तर ती कशी वाढवायची ? हे सर्व प्रश्न अगदी बरोबर आहेत. यांची उत्तरे अशी ..
प्रतिकार शक्ती थोडया फार प्रमाणात आपल्या प्रकृतीवर अवलंबून असते. तसेच ती खाण्या-पिण्या-वागण्याच्या योग्य सवयींनी (Lifestyle Modification) वाढवता येते. या सर्व गोष्टी सातत्याने पाळाव्या लागता “स्वाभाविक व्याधिक्षमता(Innate Immunity) हा खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनण्यासाठीचा एक मार्ग आहे, जो आपल्या प्रत्येकापाशी आहे .
या उपचारांमुळे आपलं शरीर निरोगी राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत होईल. भारतीय पारंपारिक आरोग्य व्यवस्थेत "रोगप्रतिकार शक्ती" वाढविण्यासाठी, टिकवुन ठेवण्यासाठी असलेल्या उपाययोजनांचा उपयोग समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने राज्यभर "निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक्स" सुरु केले आहेत.
निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक च्या माध्यमातून आपली स्वत:ची व्याधी क्षमता निर्देशांक जाणून घेवू शकता. या निर्देशांकानुसार आपल्या शरीराची सद्य स्थिती काय आहे? व त्यानुसार स्वाभाविक व्याधिक्षमता वाढविण्यासाठी काय उपायोजना करण्याची आवश्यकता आहे याविषयी तज्ञ डॉक्टर समुपदेशन करतील. व्यक्तीसापेक्ष आहार, योगासने, दैनंदिन सवयी व जीवनमान व्यवस्थापन मार्गदर्शन केले जाईल.
भोर येथील डॉ. विजयालक्ष्मी पाठक यांचेकडे आपला इम्युनिटी स्कोअर जाणुन घेता येईल. तसेच आहार-विहार संबंधी मार्गदर्शन मिळेल.