27/09/2025
मूल येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा
मूल, २५ सप्टेंबर –
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त मूल तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला गांधी चौक, मूल येथे सर्व केमिस्ट व फार्मासिस्ट एकत्र येऊन फार्मासिस्ट ओथ (प्रार्थना) घेण्यात आली.
या वेळी औषध निरीक्षक मा. नालंदा उरकुडे मॅडम, सीडीसिएचे उपाध्यक्ष सचिनभाऊ चिंतावर, प्रशांतभाऊ जाजू, सहसचिव जयंता भाऊ दांडेकर, तालुका अध्यक्ष मनीष येलंटटीवार, सचिव आशुतोष सादमवार, तसेच उमेश चेपुरवार, नितीन राजा, नितीन राईचवार, विनोद दांडेकर, सुरेश सुरकर, प्रणीकेत मुत्यलवार, स्वप्नील मारकवार, प्रणय बांगरे, सोनू गिरडकर, प्रेषित कोथारे, प्रफुल कटारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. लाडे आणि डॉ. वसीम राजा शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या उपक्रमातून फार्मासिस्ट समाजात केवळ औषध वितरणाची जबाबदारी पार पाडत नाहीत, तर आरोग्यसेवेबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आहेत, याचा प्रत्यय उपस्थितांना आला.