14/02/2026
सभेत विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, वसतिगृहातील स्वच्छता सवयी तसेच शिस्तबद्ध दिनचर्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात स्वच्छता राखल्याने आरोग्य चांगले राहते व शिस्त अंगीकारल्याने व्यक्तिमत्त्व विकासास मदत होते, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच शाळेतील नियमांचे पालन, वेळेचे महत्त्व व सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला.