श्री विश्वरसायन आयुर्वेद

  • Home
  • India
  • Chiplun
  • श्री विश्वरसायन आयुर्वेद

श्री विश्वरसायन आयुर्वेद Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री विश्वरसायन आयुर्वेद, Hospital, 415605, Chiplun.

29/06/2024
*क्रिकेट आणि आयुर्वेद*पांडव बारा वर्षे अज्ञातवासात गेलेले असताना बदला घेण्याचा राग त्यांच्या मनात जसा धुमसत होता तसाच गे...
16/11/2023

*क्रिकेट आणि आयुर्वेद*

पांडव बारा वर्षे अज्ञातवासात गेलेले असताना बदला घेण्याचा राग त्यांच्या मनात जसा धुमसत होता तसाच गेली चार वर्षे गुप्टीलने केलेला धोनीचा world cup runout बघून भारतीय क्रिकेटप्रेमींचा मनात सुद्धा धूमसत होता आणि पुन्हा एकदा भेट झाली सेमी फायनल मध्ये त्याच न्यूझीलंडची 2019 ते 2023 हातात आलेल्या वर्ल्ड कप चा स्वप्नं बघत.

पांडवांनी जसे बारा वर्षे शस्त्र हातात घेता येत नाहीत म्हणून आपली शस्त्र एका वृक्षावर संरक्षण करून ठेवले होते
तसे आम्ही पण आपली स्वप्ने मनाच्या एका खोबणीत बंद ठेवली होती

अर्जुनाने 12 वर्षाने परतल्यानंतर आपले गांडीव धनुष्य त्या वृक्षावरून काढले आणि सर्व कौरवांचा पराभव केला

योगायोगाने त्या वृक्षाचे नाव 'शमी' होते आणि चार वर्षांपूर्वी धोनी आउट झाल्यानंतर काचेवर डोकं ठेवून रडणारा आमचा अर्जुन (रोहित) आज ते शमी वृक्षाचे शस्त्र काढून न्यूझीलंड विरुद्ध लढला😄😄😄😄😄😄😄 आणि बदला पूर्ण केले

आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे दर मॅच मध्ये विकेट घेतल्यावर बॉलिंग कोचचे कौतुक करणारा शमी जणू खालील श्लोकच सांगतोय
"शमीफलम् गुरु स्वादु रुक्षोष्ण केशनाशनम्!!! "😜😜😜😜

अजून एक योगायोग पांडवानी अज्ञातवासाचे वर्ष 'विराट नगर' मध्ये काढले होते.
😜😜😜😄😄
- वैद्य अतिन औताडे🙏🏻🙏🏻🙏🏻

07/06/2023

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त १० दिवसाचे

वनस्पती व आयुर्वेदिक औषधी प्रदर्शन आणि आरोग्य माहिती शिबीर

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री विश्वरसायन आयुर्वेद चिकित्सालय

आपल्यासाठी घेऊन आले आहे वनस्पती व आयुर्वेदिक औषधी प्रदर्शन आणि आरोग्य माहिती शिबीर. हजारो वर्षापासून निसर्गात मिळणाऱ्या वनस्पतींचा वापर हा रोग निवारणासाठी, आयुष्य वाढविण्यासाठी, सौंदर्यप्रसाधन, मनुष्य जातीच्या सोयीसाठी केला गेला आहे.

आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या छोट्या मोठ्या वनस्पती ओळखता येत नाही व त्यांचे औषधी महत्व माहीत नसल्याने त्या काढून टाकल्या जातात. यामुळे बऱ्याच वनस्पती विलुप्त होत आहेत तसेच सहज थांबवता येणारे रोग अज्ञानामुळे फोफावत आहेत.

जवळपास तीन हजारहून अधिक वनस्पतीचे वर्णन / माहिती वेदशास्त्रात श्लोकामध्ये आढळते यात त्यांचा रंग, चव,

वीर्य, विपाक, स्वरुप, गुणधर्म सर्व विस्तृतपणे सांगितले आहे. हाच वारसा पुढील पिढीकडे नेण्यासाठी वैद्य अतिन औताडे

व वैद्या जॅस्मिन औताडे यांचे श्री विश्वरसायन आयुर्वेद चिकित्सालय यांच्या हरित अंकुर प्रकल्प अंतर्गत वनौषधी व आयुर्वेदिक पध्दतीने औषधे कशी तयार होतात व त्यात वनस्पतीचा कसा वापर केले जातो तसेच निरोगी रहाण्यासाठी कोणते पारंपारीक उपाय करयावेत हे दाखण्यासाठी एक छोटेसे मोफत प्रदर्शन..

* नवीन काय ? *

→ ज्योतिष्मती, महाबिल्व, आनिमंथ, पाटला, गुग्गुळ, कुचला यासारख्या विरळ होत चाललेल्या वनस्पती पाहण्याची संधी.

→ आयुर्वेदिक वनस्पती वाटप.

→ विविध प्रकारच्या चिकित्सेची ओळख.

विशेष काय ?

→ किटकभक्षी वनस्पती त्यांचे विविध प्रकार व प्रात्यक्षिक पहावयास मिळणार पन्नास पेक्षा जास्त वनस्पतींचे आध्यात्मिक, वैज्ञानिक, आयुर्वेदिक व निसर्ग शृखलेतील महत्व या विषयी वैद्य अनि

औताडे यांच्याकडून माहिती ऐकण्याची संधी. ⇒ आपल्या संस्कृतीत व आयुर्वेदात विविध धातूंचे पारंपारिक वैज्ञानिक महत्व व त्यांचा घरगुती वापर या विषयी माहिती.

→ वनस्पती पासून मिळणारे शुष्क द्रव्य व डिंक यांचे प्रकार आणि आरोग्यासाठीचे उपयोग.

* कोरफड, कॉफी, हळद, मंजिष्ठा, लवेंडर, गुलाब, कापूर, केसर, कडूलिंब, मुलतानी माती, त्रिफळा यांच्या पासून बनविलेले विविध तेलाचे साबण.

→ अभ्यंग, पादाभ्यंग, बस्ती, नस्य यासारख्या कर्मांची सखोल वैज्ञानिक माहिती.

* वनस्पतींची पौराणिक संदर्भ आणि इतिहासातील महत्व याची संपूर्ण माहिती.

• वयस्कर लोकांसाठी प्रदर्शनाच्या ठिकाणी पायऱ्यांवर स्वयंचलित खुर्ची उपलब्ध (automatic stair climbing

chair lift available)

सोमवार दि. ५ जून ते १४ जून २०२३

वेळ - सकाळी ११ ते रात्री ८.३० वा.

प्रवेश विनामूल्य

स्थळ - श्री विश्वरसायन आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म, चिपळूण. चाळकृष्ण कॉम्प्लेक्स, पहिला मजला सावंत ऑप्टिशियनच्यावर चिंचनाका

चिपळूण. मोबा. ७७७४०६२०६९ / ८६६९६६२०६९

विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल, चिपळूण मध्ये काल रानभाज्या महोत्सव संपन्न झाला.डाॅ. अतिन औताडे यांच्या हस्ते  उद्घाटन ह...
09/08/2022

विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल, चिपळूण मध्ये काल रानभाज्या महोत्सव संपन्न झाला.

डाॅ. अतिन औताडे यांच्या हस्ते उद्घाटन ही अतुल्य बाब ठरली. डाॅ. अतिन ह्यांचा प्रत्येक शब्द लाख मोलाचा होता. औषधी गुणांनी युक्त भाज्यांचं पावसाळ्या दरम्यान सेवन, सेवनाचं योग्य प्रमाण, भाज्यांचे औषधी गुणधर्म हे सारं अत्यंत रसपूर्ण ओघवत्या शैलीत, अनेक सोपी, सहज आणि गोष्ट स्वरूपात उदाहरणं देत समजावून सांगत डाॅ. अतिन ह्यांनी कोकणाचं निसर्ग संपन्नत वैभव उलगडलं. आणि एका क्षणात... आपण कोकणवासी निसर्ग वैभवानं आणि डाॅ. अतिन ह्यांच्या सारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वांमुळं कित्ती कित्ती श्रीमंत आहोत याचा प्रत्यय आला.
डाॅ. अतिन म्हणाले 'रानभाज्या' या शब्दातील 'रान' हा शब्द खूप महत्त्वाचा. कारण ह्या भाज्या त्या त्या ऋतूत, त्या त्या भौगोलिक प्रदेशात आपसुकच रूजतात. त्यांची लागवड केली जात नाही. अर्थात सध्या काही रानभाज्या व्यापारी तत्त्वावर पिकवल्या जात असल्या तरी, मूळतः स्वतः रूजून आलेल्या भाज्यांमध्ये पोषणमुल्ये जास्त असतात. निसर्ग आणि धरणीमाता आपल्याला भरभरून देते, आणि विशेष म्हणजे त्यांना आपली काळजी आहे म्हणून कोणत्या ऋतूत नेमकं काय द्यावं हेही ते जाणतात. आपल्याला निसर्गाची आणि धरणी मातेची ही साद ऐकता आली पाहिजे.
अनेक दर्दींनी रानभाज्या महोत्सवास भेट दिली. भाजी ओळखीची वाटली की अनेक रेसीपीज वर चर्चा सुरू व्हायची. विशेष म्हणजे पुरूषांकडूनही रानभाज्यांच्या रेसिपीज ऐकायला मिळाल्या.
भाजी अनोळखी असली की... "अच्छा ही आहे का ती भाजी, ऐकली होती, आज पहील्यांदाच पाहीली". (आम्ही शिक्षकांनी मनात म्हणावं की... चला आज हे आपणातील अनेकांचं रानभाज्यां विषयीचं प्रशिक्षण आहे) आमची आज्जी बनवायची ही भाजी असं सत्तरीची माणसं सांगतात ना ... तेव्हा असं वाटतं आम्ही मुळापासून खूप संपन्न होतो. खरं तर या भाज्यांच्या चवी जीभेवर रेंगाळतात. तो तो ऋतू आला कि वाट बघत असतो आम्ही ह्या भाज्यांची. अशा प्रतिक्रिया देणारी माणसं मला खरे खवैय्ये वाटतात. कारण नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळे पदार्थ, भाज्या, जेवणाच्या वेगळ्या पद्धती, गोड, मधुर,तिखट, आंबट, खारट या चवींसोबत कडू, तूरट, bland(lacking in taste) ह्या सगळ्या चवींचा आनंद घेणारे हे खरे खवय्ये असतात. खाण्याच्या बाबतीत चूझी असणारे मात्र ह्या आनंदाला मुकतात.
अर्थात कालचा रानभाज्या महोत्सव हा आमचा पहीलाच प्रयत्न. भविष्यात याचा आणखी विस्तार होईलच. पण रानभाज्यांचे प्रकार, औषधीगुण, महत्त्व, रेसीपीज वरील चर्चा हा अभ्यास मात्र नक्कीच अर्थपूर्ण आणि यशस्वी झाला असं म्हणता येईल.
- प्रा.सोनाली वराडे-खर्चे

आत्ता पर्यंत 30000 बियांचे मोफत वाटप!!5 जून पर्यावरण दिनानिमित्त सुरू झालेल्या 'श्री विश्वरसायन आयुर्वेद चिकित्सालय' चिं...
10/06/2022

आत्ता पर्यंत 30000 बियांचे मोफत वाटप!!
5 जून पर्यावरण दिनानिमित्त सुरू झालेल्या 'श्री विश्वरसायन आयुर्वेद चिकित्सालय' चिंचनाका चिपळूण येथील आयुर्वेदिक वनस्पती व औषध प्रदर्शन सप्ताहाला चिपळूणकरांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आहे.
आत्तापर्यंत 30000 आयुर्वेदिक बियांचे मोफत वाटप हरित अंकुर प्रकल्पातून करण्यात आले आहे.
साठहून अधिक औषधी वनस्पती व इतर आयुर्वेदिक औषधे,त्यांचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात भेट देणाऱ्या लोकांना पहायला मिळत आहे.
वैद्य अतिन औताडे व वैद्या जॅस्मिन औताडे यांच्याकडून या वनस्पतींची औषधांचे संपूर्ण माहिती भेट देणाऱ्या सर्व लोकांना दिली जाते.
आठ जून रोजी विज्ञान शिक्षक मंडळ व अगस्त फाउंडेशन लोटे यांच्यातर्फे साठ शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली याच त्याने सर्व आयुर्वेदिक वनस्पती ची माहिती घेतली तसेच क्लिष्ट आयुर्वेदिक औषधे कशी बनवली जातात याचे प्रात्यक्षिक देखील पाहिले हे प्रदर्शन 11 जून पर्यंत चालणार असून सकाळी 10 पासून रात्री आठ पर्यंत सर्वांसाठी खुले आहे
या प्रदर्शनात दुर्मिळ अशा आयुर्वेदिक वनस्पतींचा संग्रह आहे शिवाय त्यांची संपूर्ण पौराणिक माहिती आणि आयुर्वेदिक महत्व सांगितलेले आहे प्रदर्शनात येणाऱ्या प्रत्येकाला आयुर्वेदिक औषधांच्या शंभर बिया भेट म्हणून दिल्या जात आहेत तसेच त्या रुजवण्याचे योग्य मार्गदर्शन पुस्तिका दिली जात आहे.

04/06/2022
26/12/2021

Chyavanprash made from all fresh herbs available in gigantic biodiversity of kokan
(Available in trail pack of 200gm also)

Drugs like
Giloy (best immuno modulator)
Vasa (best medicine for cough)
Varahikand (best antioxidant, best anti cancerous drug in indian tribes )
Punarnava (improves heart function and kidney health)
Pippali ( best for sexual wellness)

And many more medicines are used fresh in this preparation

Benefits of chyavanprash

1.Supports regular elimination

2.Fosters healthy blood glucose and cholesterol levels

3.Supports fertility, healthy libido and builds overall sexual strength in both men and women

4.Enhances cognitive ability, improves memory

5.Delays ageing

6.Contains hypolipidemic,
Antihypertensive, antioxidant properties

7.Eliminates toxins from body

8.Nourishes mucous membrane and strengthens lungs naturally

9.Rejuvinates all tissues in body

10.Promotes muscle mass

11.Kindles digestion powder of the body

12.Supports optimal urinary health

Whatsapp order 8669662069
7774062069

पेशंट : डॉक्टर मला वात आहेडॉक्टर : पेटवा की मग!!!या विनोदाप्रमाणे वात याच्या विषयी गेली कित्येक वर्षे रुग्ण कडून तक्रारी...
12/06/2021

पेशंट : डॉक्टर मला वात आहे

डॉक्टर : पेटवा की मग!!!

या विनोदाप्रमाणे वात याच्या विषयी गेली कित्येक वर्षे रुग्ण कडून तक्रारी आणि वेग वेगळ्या शंका नेहमीच ऐकायला मिळत असतात

त्यात

"डॉक्टर वाताचा त्रास आहे"

"डॉक्टर, वातावरचे इंजेकॅशन द्या"

"पोटात वात आलाय"

"डॉक्टर, वातावरची गोळी आठवणीने द्या"

"वातावर काही रामबाण तेल औषध आहे का?"

अशा वेगवेगळ्या शंका
किंवा,

"वात वगैरे काही नसतं, ' *अंधश्रद्धा* ' आहे ती!!"

"दुखणे याला *गावठी* शब्द आहे तो!!! "

अशी काही उत्तरे सहज कानी येतात

*पण आयुर्वेदात सांगितलेला वात नक्की आहे तरी काय?*
खरच याला काही शास्त्रीय महत्व आहे की शास्त्र कुठे पोचलं आहे आणि आपण फक्त गावठी वात पकडून बसलो आहे?

आयुर्वेदातील *वात* ही संकल्पना संपूर्णपणे समजणं आयुर्वेदातील वैद्यांना सुद्धा अवघड गोष्ट आहे पण वात ही कोणतीही बाटलीत बंद करून दाखवत येईल अशी फक्त भौतिक गोष्ट नाही किंवा जसे रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या , प्लेटलेट कमी झाल्या तर जसे रक्त काढून मोजता येते अशी वस्तुनिष्ठ मोजमाप करणारी गोष्ट नाही

*प्राकृत वात* म्हणजे आपल्या शरीरात जी काही हालचाल असेल
मग ती खाल्लेला अन्न कण पुढे ढकलण्यापासून , रक्तातील पेशींच्या हालचाली, हाडातील calcium ची रक्तात हालचाल, ते मेंदूतून निघणाऱ्या विद्युत संकेताची गती या सर्व गोष्टी वातामुळे शक्य होतात अशी संकल्पना मांडली गेली आहे

थोडक्यात शरीरात जी काही *चल* अवस्था आहे ती वातामुळे आहे.

*वात ही फक्त संकल्पना आहे तर तिचं महत्व काय?*

436 × 36

40875 ÷ 56

9793766 + 4934

या प्रश्नांची उत्तरे वैदिक गणित वापरून तोंडी सोडवणाऱ्याची संख्या फार कमी आहे पण calculator app वापरून प्रत्येकाला उत्तर काढणे सहज शक्य आहे
हे calculator अँप म्हणजे जसा एक प्रोग्रॅम आहे ज्यात काही विशिष्ट नियम घालून क्लिष्ट गणिताचे झटक्यात उत्तर काढले जाते.

तसेच वात या विशिष्ट संकल्पनेने शरीरातील क्लिष्ट प्रक्रिया सहज कोणत्याही व्यक्तीला समजेल अशा पद्धतीने मांडण्यास व आजारपणाला कसे टाळता येईल हे कळण्यास सोप्पे जाते.

पण सोप्पी पद्धत सांगण्यास गेलं की इथेच लोकांना वाटू लागते हे सगळे *गावठी* उपाय आहेत

उदाहरणार्थ

5000 - 6000 वर्षा पूर्वी आयुर्वेदात सांगितले आहे की अतिव्यायाम केल्याने वात वाढतो आणि या वाढलेल्या वातामुळे हाडांची झीज जास्त होते तसेच शरीराचे क्षरण होते आणि राजयक्ष्मा सारखे फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता असते आणि हे सतत होत राहिल्यास म्हातारपण लवकर येते, त्यामुळे व्यायाम हा नेहमी अर्धशक्ती करावा याचा अर्थ शरीराची अर्धी ताकत लागेल इतकाच व्यायाम करावा असे आयुर्वेदात सांगितले जाते.

यालाच आधुनिक शास्त्रातून समजण्याचा प्रयत्न करू

जेव्हा केव्हा आपण व्यायाम करण्यास सुरू करतो प्रथम प्रत्येक स्नायूंमध्ये असलेली साखर (glucose) व साठवलेली साखर म्हणजेच 'ग्लायकोजेन' ऊर्जा मिळवण्यासाठी वापरले जाते हा साठा मर्यादित स्वरूपात असून साधारण हलक्या व्यायाम प्रकारात 45 मिनटं पुरतो
व्यायामाचे स्वरूप उग्र असेल तर 15-20 मिनिटे पुरतो.ग्लायकोजेन सोबत थोड्या प्रमाणात शरीरातील चरबीचा ही वापर ऊर्जा मिळवण्यास होतो जो आपल्यासाठी हितकारक असतो.पण ग्लायकोजेन संपल्यानंतर शरीरात नवीन ऊर्जा मिळावी म्हणून फक्त चरबी आणि स्नायू जाळून ऊर्जा मिळवली जाते ,
ज्यात शरीरात नुकसानकारक टाकाऊ पदार्थ तयार होतात जसे लॅक्टिक ऍसिड , ketone bodies ज्यामुळे छोट्या छोट्या पेशींना क्षोभ उत्पन्न होऊन सूज येऊ लागते. तसेच शरीराची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी हृदयाला जलद गतीने काम करावे लागते.त्यामुळे हृदयाच्या पेशींना देखील सूज येते आणि असे सतत होत राहिले तर हृदयाचा आकार नेहमीसाठी बदलण्याची शक्यता वाढते.
यामुळे हृदयाला सूज वाढू नये व शरीरात काही धोका निर्माण होऊन नये म्हणून शरीराकडून काही सूज कमी करणारी संप्रेरके सोडली जातात ज्याला आपण natural steroid ( शरीरात तयार होणारे स्टिरॉईड ) म्हणू शकतो.

याने सूज कमी येते पण हे संप्रेरक रक्ततील दोष कमी करण्यासाठी हाडातील calcium रक्तात आणते ज्याने हाडे ठिसूळ होतात.

शिवाय उग्र स्वरूपातील व्यायाम केल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती immune system पुढील 72 तासासाठी व्यवस्थित काम करत नाही , फुफ्फुसामध्ये सूज येऊन छोट्या जखमा तयार होतात आणि हवेतील रोग जंतू निकामी झालेल्या रोग्यप्रतिकरशक्तीचा फायदा घेऊन शरीरात प्रवेश करतात आणि TB, किंवा इतर फुफ्फुसाचे आजार होतात.
हा प्रकार सारखा होत राहिला तर शेवटी सर्व महत्वाच्या अवयवांना सूज येऊन ते निकामी होतात आणि शरीर वय वाढल्याप्रमाणे दिसू लागते हाडे नाजूक होऊन सांधे दुःखी सुरू होते.

अशाच प्रकारे बिघडलेल्या वातामुळे आमवात, संधिवात, वातरक्‍त, वातज गुल्म, पक्षाघात,हृदयाचे आजार,मेंदूचे आजार हे सर्व आजार होतात आणि याचे संपूर्ण वर्णन आणि ते टाळण्यासाठी काय करावे तसेच ते झाल्यास काय आणि कसे उपचार करावे हे व्यवस्थित पणे सांगितले आहे
पण आज काल कोणताही उपचार आयुर्वेदिक सांगून कोणत्याही तर्क संबंधाशिवाय सांगितला जातो ज्यामुळे आयुर्वेदाची प्रतिमा मालिन होत जातं आहे

क्रमशः
याच वाताच्या आजाराविषयी आपण पुढे काही सत्रात थोडी थोडी माहिती घेऊ.

अशाप्रकारची आयुर्वेद माहीत मिळवण्यासाठी ' *श्री विश्वरसायन आयुर्वेद* ' हे page follow करा अथवा
*औषधी वनस्पती 2,3,4,5* या पैकी एक whatsapp group join करा.

🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻पाऊस पडू लागला की सगळीकडे भरपूर उगवणारी वनस्पती म्हणजे ' *भुम्यामलकी* 'ज्याला आपण ' *भुईआवळा* ' पण म्हणतो.छोट...
06/06/2021

🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻पाऊस पडू लागला की सगळीकडे भरपूर उगवणारी वनस्पती म्हणजे
' *भुम्यामलकी* '
ज्याला आपण ' *भुईआवळा* ' पण म्हणतो.

छोटी छोटी 1 इंच पासून 1 फूटापर्यंत लांब रोपं पाऊस पडून गेला की रस्त्याकडेला,मोकळ्या मैदानावर,गॅलरीतील झाडाच्या कुंडीमध्ये उगवलेली मिळतात.
ही वनस्पती यकृतासाठी (liver) अतिशय उत्तम काम करते.

याचे शास्त्रीय नाव:-
*_Phyllanthus niruri_*
हे आहे
Phyllanthus 'पानावर फुले येणारी'

या झाडाचे वैशिष्ट्य असे आहे की याच्या पानावरच फुले येतात आणि त्यालाच फळे लागतात अशाप्रकारची रचना अजून काही वनस्पती मध्ये दिसते त्या सर्वांना याच नावाने संबोधले जाते.

*उपयोग*

1.कविळीमध्ये या वनस्पतीचा स्वच्छ धुवून रस काढला जातो आणि ताका सोबत दिला जातो.
2.मुका मार लागल्यास सुजेवर याचा पाला काळे मीठ सोबत कुटून लावला जातो.
3.पाळीच्या त्रासात अंगावरून जास्त जात असेल तर या झाडाचा पाला आणि अडुळसाची पाने याचा काढा करून उपाशी पोटी घेता येते
4.खोकला तसेच अस्थमाच्या त्रासात याचा ताजा रस खडी साखरे सह घेतल्यास आराम मिळतो
5.च्यवनप्राशमध्ये टाकल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती पैकी ही एक अतिमहत्वाची वनस्पती आहे.यामुळे कमीसाखरेत तयार केल्या जाणाऱ्या च्यवनप्राशला गोड-तुरट चव व रुची येण्यास ही मदत करते.
6. सतत तहान लागणे ,घशात जळजळणे,डोळ्यात जळजळ,थुंकीतून रक्त पडणे यात याचा काढा कामदुधा या गोळी सोबत घेल्यास आराम मिळतो.
-
वैद्य अतिन औताडे
8669662069
7774062069
🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻

*भीमसेन कपूर काय आहे?* 🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻बरेच दिवसापासून कापूर ,कापराचे झाड आणि पर्यावरण यावर वेगवेगळे वाद सुरू आहेत.पण यातील म...
25/05/2021

*भीमसेन कपूर काय आहे?* 🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻

बरेच दिवसापासून कापूर ,कापराचे झाड आणि पर्यावरण यावर वेगवेगळे वाद सुरू आहेत.
पण यातील मुख्य मुद्दा हा की भीमसेन कापूर हा खरच झाडापासून मिळवलेला कापूर आहे का? असेल तर कोणत्या झाडापासून?
आणि या कापराच्या झाडाचा औषधामध्ये खरच किती उपयोग आहे?

कापराचे झाड म्हणून ज्याला ओळखले जाते ते म्हणजे *_cinnamomum camphora_* .

आणि या झाडाला जो निर्यास येतो तो म्हणजे ' *कापूर* '
पण दुर्दैवाने किंवा आपल्याच (मनुष्याच्या) करणीने आज नैसर्गिक कापूर जितका शिल्लक आहे तो आपल्याला 1 वर्ष सुद्धा पूजेसाठी पुरणार नाही.

या झाडांमधून जो चिकट गोंद बाहेर येतो तो आहे 'नैसर्गिक कापूर'

या कापराचे आयुर्वेदात तीन प्रकार वर्णीत आहेत.

1) पक्व
2)अपक्व
3)चिनाक

*अपक्व*
हा पाण्यात बुडतो.
'अपक्व' म्हणजे जसा झाडावरून काढला तसा, जो अशुद्ध मानला जातो असा अशा स्वरूपात हा फक्त झाडावरून गोळा करणाऱ्या व्यक्तीलाच मिळू शकतो.
बाजारात मिळणे अशक्य.

*पक्व*

अशुद्ध कापूर शुद्ध करण्यासाठी उर्ध्वपातन यंत्रात (distillation unit) टाकला जातो आणि त्याचा अर्क काढला जातो.
झाडावर तयार होत असताना याला अनेक दिवस /वर्ष लागतात या काळात हा चिकट तसेच semi-solid असल्याने त्यात हवेतील धुळीचे कण, छोटे किडे, मातीचे कण अडकतात.
हे सर्व मोकळे होऊन शुद्ध कापूर उर्ध्वपातन यंत्रात मिळतो पण या प्रक्रियेत बराच कापूर हवेत विरून जातो.
म्हणून संपूर्ण पक्व झाडाचीच कत्तल केली जाते आणि त्याच्या लाकडाचे ओंडके बारीक करून त्यातून जास्तीत जास्त कापुर मिळवण्याचा प्रयत्न होतो.
पण हा कापूर शास्त्रीय दृष्ट्या 'निर्यास' नाही त्यामुळे याला ग्रंथात सांगितलेले सर्व औषधी गुण लागू होत नाहीत

*चिनाक*

हा म्हणजे पूर्णपणे कृत्रिम रित्या तयार केलेला कापूर
जो turpentine या घटकांपासून तयार केला जातो
जो आपण सर्व पूजापाठ आणि स्टीम मशीन मध्ये घालून वापरतो🙁😕
ज्याचे कोणतेही औषधी फायदे शास्त्रात वर्णीत नाहीत.

पण पक्व कापराचे पुन्हा कोणत्या भागातून काढला जातो किंवा कोणत्या प्रदेशात उत्पत्ती आहे त्यानुसार ईश्वस,हिम संजनक आणि पोटाश्रय असे प्रकार केले आहेत.

इतकेच नाही तर शुद्ध कापराचे कोणत्या भागातील वनस्पती आहे, त्याची काय चव आहे आणि पोटात गेल्यावर त्याच्यात काय बदल होतात, काय गुण येतात यानुसार आणखी14 प्रकार 500 - 600 वर्षापूर्वीच वर्णन केलेले आहे.

मग हा भीमसेनी कापूर आला कुठून?

*cinnamomum camphora* ही वनस्पती भारतातील नाही ही चीन, तैवान,जपान इथे मिळते.
भारतीय हवामान तिला मानवणे म्हणजे आपल्या बॉलीवूडच्या सेलिब्रिटीना मे महिन्यात विदर्भातील शेतात राखणीला जुंपल्यासारखे होईल.
आणि या झाडाला भारतात भरभरून निर्यास येणं म्हणजे याच सलेब्रिटीनी शेतच झाडाखाली झुणकाभाकर खाऊन आपला संसार थाटला अस होईल.

त्यामुळे यासारखीच आणि एक वनस्पती जी भारत,म्यानमार,सिंगापूर,मलेशिया या भागात मिळते जिचे वैज्ञानिक नाव
_*Dryobalanops aromatica*_ आहे हिला भारतात *कर्पूर* किंवा *कर्पूरम्* नावाने ओळखले जाते.

या पासून काढलेला निर्यास म्हणजे ' *भीमसेनी कापूर* ' असा काही ठिकाणी उल्लेख मिळतो.
पण दुर्दैव / आपल्याच हव्यासापोटी ही वनस्पती सुद्धा विलुप्त होत आहे.
याचा निर्यास हा उडनशील तेल किंवा घन स्वरूपात मिळतो.

दोन्ही झाडाचा निर्यास हा घन स्वरूपात 2 प्रकारात असतो एक पिवळसर पांढरा जो उत्तम दर्जाचा मनाला जातो कारण त्यात उडनशील तेल असते आणि पूर्ण पांढरा ज्यात इतर तेलाचे प्रमाण कमी असते.

मग भीमसेनी कापूर कुठून मिळवला जातो ?

बाजारात मिळणारा भीमसेनी कापुर हा कृत्रिम रित्या बनवला जाणारा कापूर आणि थोड्या प्रमाणात उडनशील तेल(??आहे की नाही शंका?) याच्या पासून बनवला जातो म्हणजे तसा हा ही कृत्रिमच असतो.
पण ही भेसळ (काळाची गरज) गेल्या 100 वर्षांपासून चालत असावी,
म्हणून काही पारंपरिक औषधी बाड मध्ये
वैद्यांनी स्वप्रयोगातून नियोजित केलेल्या कल्पात याचे वर्णन आढळते जे इतर काही वनस्पतीचे चूर्ण त्यांचे उडनशील तेल आणि अग्नी संस्कारातून देशी कापरापासून बनवला जातो कसे ते खाली चित्रात देत आहे.
- वैद्य अतिन औताडे
🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻

अशाच प्रकारची आयुर्वेदिक झाडाची माहीत मिळवण्यासाठी *श्री विश्वरसायन आयुर्वेद वनस्पती माहीती* या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये साहभागी व्हा किंवा फेसबूक वर
*श्री विश्वरसायन आयुर्वेद* page ला follow करा.

Address

415605
Chiplun
415605

Telephone

+917774062069

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री विश्वरसायन आयुर्वेद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to श्री विश्वरसायन आयुर्वेद:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category