03/12/2022
*सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. शरद सावंत हे अपरांत हॉस्पिटल येथे व्हेरीकोज व्हेन्स शिबिरातील रुग्ण तपासणी करिता येणार*
*डॉ. शरद सावंत हे शुक्रवार दि. ०९/१२/२०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १ वाजेपर्यंत* अपरांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित व्हेरिकोज व्हेन्स शिबिरातील रुग्ण तपासणी करिता उपलब्ध असणार आहेत.
आपल्या पायात अशुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी त्वचेच्या खाली मुख्यत: दोन मोठय़ा रक्तवाहिन्या (शिरा) असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणाने रक्त जमा होते आणि त्यामुळे त्या शिरा फुगतात. या त्रासाला *व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins) असे म्हणतात.*
पाय सुजणे, पाय दुखणे, पायामध्ये असहजता निर्माण होणे, असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे, पायाच्या पोटऱ्या दुखणे ही प्रमुख लक्षणे आहेत. अनेकदा पाय फार दुखतोय् असे आपल्याला जाणवते. पण फार थकलो असे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ही कारणे घेऊन डॉक्टरांकडे जाणाऱ्या बऱ्याच लोकांना व्हेरिकोज् व्हेन्सचा त्रास असल्याचे आढळून येते. याशिवाय *नसा निळ्या फुगलेल्या दिसतात, क्वचित पाय देखील काळवंडलेला असतो. विशेषतः घोट्याच्या वरचा भाग काळवंडलेला असतो. कधी कधी अल्सर अथवा जखम निर्माण होते व ती भरून निघत नाही*.
या सर्व बाबींचा विचार करून जर आपणास देखील असा त्रास जाणवत असेल तर *अपरांत हॉस्पिटलच्या व्हेरिकोज व्हेन्स तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा*
*डॉ. शरद सावंत यांनी*
_M.S (Gen.Surgery)_, _M.Ch (Plastic Surgery),_ _D.N.B( Plastic Surgery), A.F.I.H_
या पदव्या प्राप्त केल्या आहेत.
डॉ. शरद सावंत यांचा *प्लास्टिक सर्जरी,रक्त वाहिन्यांच्या संदर्भातील आजार,व्हेरिकोज व्हेन्स (लेसर उपचार), भाजलेल्या रुग्णांवर उपचार , डायबेटिज मुळे बऱ्या न होणाऱ्या जखमा या वरील उपचार, दुभंगलेले ओठ टाळू यावरील शस्त्रक्रिया, जन्मजात आलेले अपंगत्व,शरीरावरील असलेल्या (कॅन्सरच्या) गाठी या वर उपचार, गुप्त इंद्रियांवरील उपचार, हेअर ट्रान्सप्लांट*.
यामध्ये देखील खास हातखंडा आहे.
*अधिक माहिती व नावनोंदणी करिता खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*
☎️ ७९९८८९८९८९
७९९८७३७३७३
७२४९८६०१३६
८३८०८६०१३६