20/09/2025
एआयआयएफए (आयफा) तर्फे येथे आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात राज्य सरकारच्या उद्योग विभागाने ९ कंपन्यांशी ८० हजार ९६२ कोटी रूपयांचे सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले. या करारामुळे राज्यात ४० हजारहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा आदी जिल्ह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या गुंतवणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.