Pranada Ayurved

Pranada Ayurved By our wellness center we treating all metabolic disorders. We are working in this health and well

शरीराच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी..!पंचकर्म – बस्ती शिबिर(फक्त पहिल्या 25 पेशंट साठी)▫️शिबिर कालावधी: 4 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट...
31/07/2025

शरीराच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी..!
पंचकर्म – बस्ती शिबिर
(फक्त पहिल्या 25 पेशंट साठी)

▫️शिबिर कालावधी: 4 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2025
▫️स्थळ: प्राणदा आयुर्वेद, पंचवटी टॉवर शेजारी, मोठ्या पुलाजवळ, आग्रा रोड, देवपूर, धुळे

👉🏻 हे शिबिर कोणासाठी उपयुक्त ?
✓ ज्यांना निरोगी राहायचे आहे त्या सर्वांसाठी
✓ मलावरोध, शौचास अडचण
✓ ऍसिडिटी, अपचन, फुगणे
✓ संधिवात, सांधेदुखी, मणक्याचे विकार
✓ मासिक पाळीच्या तक्रारी
✓ अस्थमा (दमा)
✓ वारंवार होणारा मुतखडा
✓ सर्व प्रकारचे वाताचे विकार

👉🏻 शिबिरातील उपचार:
- संपूर्ण शरीर अभ्यंग (मालिश) – पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत
- स्वेदन (वाफ देणे)
- बस्ती (औषधी तेल आणि काढ्याचा एनिमा)
- नस्य (नाकाद्वारे औषधी तेल)

▫️ रोज किती वेळ लागेल: साधारण 1 ते 1.25 तास

▫️पेशंटसाठी मिळणाऱ्या सुविधा:
✅ प्रशिक्षित (ट्रेंड) स्टाफ
✅ प्रत्येक वेळी नवीन sterilised कॅथेटर
✅ प्रत्येक वेळी स्वच्छ, नवीन बेडशीट
✅ केरळीयन औषधी काढे आणि तेलांचा वापर
✅ मोफत वैद्यकीय तपासणी
✅ मोफत लाइफस्टाइल व आहार सल्ला (Lifestyle + Diet Plan)

▫️ चिकित्सा कालावधी
साधारणतः 3 ते 7 दिवस (प्रकृती अनुसार)

👉🏻 खर्च किती..?
3 दिवस – ₹2700
5 दिवस – ₹4500
7 दिवस – ₹6000

👉🏻 नाव नोंदणीसाठी संपर्क करा:
7620240975 / 9689440775

💡 “प्राणाभिसंवितः कायं धर्मार्थकाममोक्षाणाम् उपस्थापनमिच्छन् चिकित्सकः पुत्रवत् रोगिणं पश्येत्”— चरक संहिता, सूत्रस्थान ...
01/07/2025

💡 “प्राणाभिसंवितः कायं धर्मार्थकाममोक्षाणाम् उपस्थापनमिच्छन् चिकित्सकः पुत्रवत् रोगिणं पश्येत्”
— चरक संहिता, सूत्रस्थान १/५५

जो चिकित्सक जीवनाच्या चारही पुरुषार्थांचा आधार असलेले शरीर सुदृढ करायची इच्छा बाळगतो,
त्याने रुग्णाकडे पुत्रवत प्रेमाने आणि करुणेने पाहावे..!

आजचा दिवस आरोग्यसेवेत अखंडपणे कार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर आणि वैद्य बंधू-भगिनींच्या समर्पणाचा सन्मान करण्याचा!

आपण फक्त रोग नाही, तर एक संपूर्ण माणूस समजून उपचार करणारे आहोत...!

"डॉक्टर्स डे" च्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
🙏🏻💐😊🕉️

– डॉ. जितेश पाठक
Pranada Ayurved

पचनाच्या त्रासासाठी कायमचा उपाय हवा आहे का..?"पचन विकारांवरील मोफत तपासणी शिबिर"दिनांक - 1 व 2 जुलै 2025 (मंगळ व बुधवार)...
25/06/2025

पचनाच्या त्रासासाठी कायमचा उपाय हवा आहे का..?
"पचन विकारांवरील मोफत तपासणी शिबिर"

दिनांक - 1 व 2 जुलै 2025 (मंगळ व बुधवार)
वेळ - सकाळी 10 ते 1 आणि संध्या. 6 ते रात्री 8

ठिकाण - प्राणदा आयुर्वेद चिकित्सालय
मोठ्या पुलाजवळ, पंचवटी टॉवर शेजारी,
आग्रा रोड, देवपूर, धुळे. Mb- 7620240975

शिबिर कोणासाठी -
✓ वारंवार अ‍ॅसिडिटी होते?
✓ पोट गच्च राहते, शौच समाधानकारक होत नाही?
✓ कधी पातळ, कधी कडक, कधी चिकट शौच?
✓ भूक लागत नाही? वारंवार गॅसेस?
✓ IBS? Colitis?

🔸 तपासणी पूर्णतः मोफत
🔸 आयुर्वेदानुसार मोफत सल्ला व आहार मार्गदर्शन

📌 नोंद: कृपया मागील सर्व तपासण्या व रिपोर्ट्स सोबत आणावेत.

👉🏻 पहिल्या 40 रुग्णांसाठीच.
नाव नोंदणी साठी फोन करा -7620240975

डायबेटीसचे औषध घेत असाल तर हे नक्की वाचा!(आपल्या आरोग्याच्या हितासाठी 2 मिनिटं वेळ द्या.)डायबेटीस म्हणजे काय?रक्तात साखर...
16/05/2025

डायबेटीसचे औषध घेत असाल तर हे नक्की वाचा!
(आपल्या आरोग्याच्या हितासाठी 2 मिनिटं वेळ द्या.)

डायबेटीस म्हणजे काय?
रक्तात साखरेचे प्रमाण जास्त होणे – यालाच आपण डायबेटीस म्हणतो.
याचा थेट संबंध इन्सुलिन या हार्मोनशी असतो.

इन्सुलिन आणि डायबेटीस यांचा काय संबंध?
1. टाइप 1 डायबेटीस –
- शरीरात इन्सुलिन तयारच होत नाही किंवा फार कमी प्रमाणात तयार होते.
- हा प्रकार तुलनेने कमी लोकांमध्ये आढळतो, किंवा अनेक वर्षांनी काही रुग्णांमध्ये दिसून येतो.

2. टाइप 2 डायबेटीस –
- शरीर इन्सुलिन तयार करतं, पण ते योग्य प्रकारे कार्य करत नाही.
- शरीरात इन्सुलिन आधीच खूप प्रमाणात असतं, पण त्याचा परिणाम होत नाही.
- या प्रकारात इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झालेला असतो.
- 95% डायबेटीस रुग्ण हे टाइप 2 प्रकारात मोडतात.

👉🏻 आता लक्ष द्या – या टाइप 2 डायबेटीस रुग्णांना बहुतेक वेळा दिली जाणारी औषधे म्हणजे:
सुल्फोनिलयुरिया ग्रुपची औषधे
उदा: Glimepiride, Glipizide, Gliclazide, Glibenclamide

ही औषधे नेमकं काय करतात?
▫️ इन्सुलिन जबरदस्तीने वाढवतात
▫️ साखरेचं प्रमाण काहीही असो – शरीराला इन्सुलिन सोडायला भाग पाडतात
▫️ त्यामुळे साखर कमी होते – पण...

👉🏻 इथे सुरू होतं एक दुष्टचक्र:
1. इन्सुलिन वाढवलं जातं
2. साखर कमी होते
3. पुन्हा भूक लागते – कधी कधी नसतानाही खाणं होतं
4. खाल्लं की पुन्हा साखर वाढते
5. मग पुन्हा इन्सुलिन वाढवावं लागतं

परिणाम:
▪️ हा चक्रव्यूह सतत चालू राहतो
▪️ रुग्ण यात अडकतो
▪️ इन्सुलिनचं प्रमाण अधिक होतं, पण इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते
▪️ आणि रोग अधिक बळावतो

इतर दुष्परिणाम:
▫️ इन्सुलिन हे एनाबोलिक हार्मोन असल्यामुळे वजन वाढवते
▫️ म्हणजे साखर कमी होत असतानाही, वजन मात्र वाढतं
▫️ आणि त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स अजून वाढतो!

म्हणजे विचार करा –
ही औषधे तुम्हाला बरा करत आहेत का?
की केवळ कागदावर तुमची साखर ‘नॉर्मल’ दाखवत आहेत?

💡 टाइप 2 डायबेटीसमध्ये व्यायाम, योग्य आहार, जीवनशैली आणि आयुर्वेदिक चिकित्सा यामुळे डायबिटीस रिव्हर्स करणे शक्य आहे.

कन्सल्ट करा –
डॉ. जितेश पाठक
Lifestyle Disease Consultant
प्राणदा आयुर्वेद, धुळे
082750 07220

लिव्हर म्हटले की बहुतेक जण लगेच विचार करतात – “आम्ही दारू तर पितच नाही, मग आमचं लिव्हर कसं बिघडेल?” किंवा “हेपेटायटीस-B ...
19/04/2025

लिव्हर म्हटले की बहुतेक जण लगेच विचार करतात – “आम्ही दारू तर पितच नाही, मग आमचं लिव्हर कसं बिघडेल?” किंवा “हेपेटायटीस-B नाहीये ना, मग काही प्रॉब्लेम नाही.”

पण सत्य हे आहे की लिव्हर खराब होण्याची कारणं केवळ दारू आणि व्हायरल इन्फेक्शनपुरती मर्यादित नाहीत.

आजच्या काळात लिव्हरला सर्वात मोठा धोका आहे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमधून!

▫️सतत बसून राहणे (सिडेंटरी लाइफस्टाइल)
▫️अधिक प्रमाणात गोड, तेलकट आणि फास्ट फूडचं सेवन
▫️ तळलेले अन्नपदार्थ खाणे
▫️शिळं अन्न खाण्याची सवय

या सगळ्याचा परिणाम लिव्हरवर दारू इतकाच घातक होतो.

लिव्हर हे शरीरातील एक महत्त्वाचं आणि अबाधित कार्य करणारे अवयव आहे – डिटॉक्सिफिकेशन, मेटाबॉलिझम, पोषण शोषण अशा अनेक जबाबदाऱ्या लिव्हर पार पाडत असते.

म्हणूनच आजचा दिवस लिव्हरसाठी सजग होण्याचा दिवस ठरवूया.
आणि हे लक्षात ठेवा — आयुर्वेदिक उपचार आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचा अवलंब केल्यास लिव्हरचं आरोग्य दीर्घकाळ उत्तम राहू शकतं.

#प्राणदा_आयुर्वेद
082750 07220

Address

Agra Road, Near Big Bridge, Panchawati Corner, Deopur
Dhule
424002

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+918275577220

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pranada Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pranada Ayurved:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram