30/07/2024
🙏जय गुरुदेव 🙏
म्हणतात नं " #संघशक्ती_युगे_युगे" याचा प्रत्यय आपल्या #धुळेIC ला आला.
पूज्य गुरुदेव यांच्या कृपेनें
दिनांक २५ ते २८ जुलै दरम्यान, कांकरीया भवन, नगावंबारी,देवपूर धुळे च्या प्रशस्त हॉल, मध्ये साधारण ५६ पार्टीसिपंट्स चा (दिव्य समाज निर्माण) हा ऊर्जा,सेवावृत्ती, व समर्पणाचा भाव असलेला कोर्स (प्रोग्राम) अत्यंत क्रियाशील, व उत्साही प्रशिक्षिका #सौ_सीमादिदी लांबा यांच्या सानिध्यात अत्यंत उत्सहात पार पडला, सर्व प्रक्रिया व शारीरिक आसने, #पद्मसाधना, ध्यान, पार्टीसिपंट्स कडून लिलया शिकवण्याची व करून घेण्याची सीमादिदींची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.
कोर्स दरम्यान रविवारी सकाळी ११.३० ला स्थानिक प्रशिक्षकां बरोबर सीमादीदींनी सवांद साधला, खेळीमेळीच्या, हास्यविनोदात, अनुभवच्या, ज्ञानाच्या, गप्पागोष्टी, व पुढील वर्षाच्या वाटचाली चा संकल्प या मिटिंग मध्ये घेण्यात आला.
आगामी १३ आगस्ट पासून शहराच्या विविध भागात होणाऱ्या #आनंदउत्सव_हॅप्पीनेस_प्रोग्राम साठी पार्टीसिपंट्स नी काही तासाच्या सेवेत तब्बल ४५ च्या आसपास रजिस्ट्रेशन्स आणले, सायंकाळी सुमधुर सत्संग, सुग्रास भोजन, व या कोर्स दरम्यान सेवा देणाऱ्या साधकांचा सन्मानाबरोबरच, शहरातील असंख्य साधकांच्या साक्षीने या अविस्मरणीय कोर्स चा समारोप झाला. . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे गमक, २० ते २५ दिवसांपासून घेतलेल्या अथक प्रयत्न, व सेवेत आहे. सर्व आदरणीय साधक व धुळे जिल्हा समन्वयक श्री संतोष महाले , गायत्री भावसार ,अशोक दुसाने , रंजना मयूर , चेतना बडगुजर , स्वाती गिरासे , दिलीप कुटे , सचिन लोंढे या Perfect प्रशिक्षकांच्या सेवेने व इतर सर्व जेष्ठ श्रेष्ठ प्रशिक्षक यांच्या योग्य मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वी झाला. .
जय गुरुदेव 🙏
Dhule Team.......🎉