15/10/2021
गर्भसंस्कार
उत्तम बीज, योग्य माती व योग्य वातावरण हेच एक चांगले फळ निर्माण करू शकते. त्यानुसारच उत्तम संतती सुद्धा सुदृढ सुसंस्कारीत आई वडील व गर्भिणीचा आहार, विचार, विहार यावर अवलंबून असते. आधीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती, गर्भिणी घरातच जास्त असायची, घरातील कामे करत असे. घरातीलच खायला असे, त्यामुळे तिचा आहार, विहार, विचार हे आपोआपच योग्य होते. परंतू आता काळ बदलला, लाईफ स्टाईल बदलली, एकच मूल तेही वयाच्या ३० च्या जवळपास, गर्भिणी सतत कामात व्यग्र, बैठक जास्त, हलचाल कमी, खाण्यात जंक फूड जास्तं, त्यामुळे गरोदरपणात बीपी, शुगर, थायरॉईड, पाणी कमी होणे, झोप न लागणे ह्या समस्या त्रास देऊ लागतात. ह्या सगळ्याचा त्रास होऊ नये, अथवा झालाच तर त्याची तीव्रता कमी व्हावी हाच ह्या गर्भसंस्काराचा खरा उद्देश. ज्यामुळे गर्भ शारीरिक, मानसिक, व बौद्धिक दृष्ट्या उत्तम व्हावा यासाठी गर्भसंस्काराची आवश्यकता आहे.
गर्भसंस्कार वर्गात शरीराला आवश्यक असणाऱ्या हालचाली योग्य पद्धतीने करवून घेतल्या जातात त्यामुळे शरीर हलके राहते. प्रार्थनेने मन एकाग्र होते वा योगनिद्रेमुळे कमालीची शांतता मिळते. नॉर्मल डिलव्हरी होताना काय होते, त्याला किती वेळ लागतो, त्यावेळेस श्वसन कसे करावे, बाळाला स्तनपान कसे करावे, त्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी, कधी कधी डिलिवरी नंतर काहींना डिप्रेशन येते, ते येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे शिकता येते.
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा.