14/01/2020
मागील आठवड्यात माझ्याकडे 29 वर्ष वयाचा तरुण रुग्ण आला होता. त्याला.....
छातीत दुखणे,
छातीत धडधडणे,
जीव घाबरणे,
तोंड कोरडे पडणे,
हातापायाला मुंग्या येणे,
अंगावर शहारे येणे.
या लक्षणाबरोबर आपल्याला हार्ट अॅटॅक येतो की काय याची भीती वाटत होती, काहीतरी विचित्र घडत आहे असे वाटत होते. असा त्रास 2-3 महिन्यापासून होत होता. ECG, 2DEcho व ह्दयासंबधित आजाराच्या सर्व तपासण्या करून झाल्या. सर्व रिपोर्ट Normal होते. त्यामुळे रुग्णांस थोडासा दिलासा मिळाला. पण 3-4 दिवसानंतर पुन्हा त्रास होऊ लागला...पुन्हा तपासण्या केल्या... पुन्हा रिपोर्ट Normal...
परत 3-4 दिवस आराम.
नाशिकमध्ये 3-4 ह्रदयरोग तज्ज्ञांना दाखवून झाले मग पुण्याच्या स्पेशालिस्ट तज्ज्ञांना दाखवले...पुन्हा एकदा सर्व तपासण्या करून झाल्या...सर्व रिपोर्ट Normal... 3-4 दिवस आराम...परत त्रास सुरु.
यात 2-3 महिन्याचा कालावधी निघून गेला पण त्रास कमी होत नव्हता. सरतेशेवटी त्याच्या आजाराचे निदान Panic Anxiety असे करण्यात आले.
मानसिक समस्यांवर उपचार करणाऱ्या आयुर्वेद मनोविकार तज्ज्ञांचा शोध घेत तो माझ्याकडे आला होता. नेहमीप्रमाणे मी त्याच्या आजाराविषयी माहिती घेऊन उपचार पद्धतींची चर्चा केली.
रिलॅक्सेशन थेरेपी, सत्वावजय चिकित्सा (मनोबल वाढवण्यास उपयुक्त आयुर्वेद चिकित्सा) व रसायन औषधींच्या साहाय्याने 4-5 दिवसात रुग्णास चांगला आराम मिळाला. रुग्ण 5 व्या दिवशी एवढचं म्हटला की 2 महिन्यापुर्वीच आपली भेट झाली असती तर वेळ आणि पैसा दोन्हीही वाचले असते.
त्यासाठीच सर्व तपासण्या करुनही रिपोर्ट Normal येत असतील तर आपल्याला मानसिक / मनोकायिक आजार असावा असा विचार करुन मनोविकार तज्ज्ञांना वेळीच भेटलेले बरे. ....