10/01/2022
या एक वर्षाच्या चिमुकल्याने आज आमचा सगळ्यांचा जीव टांगणीला लावला होता.
घशात ही होमिओपॅथी गोळ्यांची बाटली घातली होती.
बाटली अडकून श्वास गुदमरला आणि हृदय बंद पडलं होतं.एका क्षणासाठी वाटलं होतं सगळं काही संपलं.
सी पी आर देऊन हृदय चालू केलं. पण कृत्रिम श्वास चालू करण्यासाठी स्वसनालिकेत पाइप टाकावी लागते. बाटली मुळे आणि श्वास मार्गाला आलेल्या सुजेमुळे ते सुद्धा शक्य होत नव्हतं. तशाच परिस्थितीत इंजेक्शन देऊन भुल दिली व अडकलेली ती बाटली एकदाची काढली तेंव्हा कुठं त्या बाळाचा आणि आमचा श्वास मोकळा झाला.
भूलतज्ज्ञ डॉ. स्वाती पाटील मॅडम, बालरोग तज्ज्ञ डॉ.शाम सागर सर आणि जनरल सर्जन डॉ. प्रवीण केसरकर सर सगळे अक्षरशः धावत आले आणि शक्य ते सर्व प्रयत्न पणाला लावून आलेल्या यमराजा ला परत पाठविले. हॉस्पिटल स्टाफ साधना,पूजा व कामाक्षी सर्वांनी अथक परिश्रम केले.
सर्वांचे शतशः आभार. सर्वांच्या अथक परिश्रमाने आज एक कोवळा जीव वाचविता आला याचं समाधान काही वेगळंच!
पण प्रत्येक वेळी आपण सगळे इतके नशीबवान ठरूच असं नाही. त्यामुळं आपल्या चिमुकल्यांवर लक्ष ठेवा आणि शक्य असेल तर अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या हाती लागणार नाहीत याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
- डॉ. मुकुंद जाधव.