Sharda Multispeciality Hospital & Research Institute Georai

  • Home
  • India
  • Gevrai
  • Sharda Multispeciality Hospital & Research Institute Georai

Sharda Multispeciality Hospital & Research Institute Georai Jagdamba Shikshan Prasarak Mandal, Beed

शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिरास जातेगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद​         शारदा मल्टीस्पेशालिटी ...
16/04/2026

शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मोफत आरोग्य शिबिरास जातेगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

​ शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गेवराई यांच्या वतीने यमादेवी माध्यमिक विद्यालय, जातेगाव येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो रुग्णांनी सहभाग नोंदवून मोफत तपासणी व उपचारांचा लाभ घेतला.

​ या शिबिराचे उद्घाटन जय भवानी सहकारी साखर कारखाना (गढी) चे संचालक मा. श्री. साहेबराव चव्हाण, माजी जि.प. सदस्य मा. श्री. साहेबराव पांढरे आणि जातेगावचे सरपंच श्री. रमेशराव चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी जय भवानी शिक्षण संस्थेचे सचिव तथा शिव शारदा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. जयसिंग पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.

​ जातेगाव व पंचक्रोशीतील गावांमधून या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग यांसह विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात आले. तसेच, रुग्णांची मोफत रक्ततपासणी करून त्यांना मोफत औषधोपचारही देण्यात आले.

​या वैद्यकीय शिबिरात हॉस्पिटलचे डॉ. अजयसिंह पंडित, दंतरोग तज्ज्ञ डॉ. धनश्री पंडित, डॉ. निखिल गव्हाणे, डॉ. आदित्य जरांगे, डॉ. प्रतीक्षा नरोटे, डॉ. गौरव टाक, डॉ. अंकिता चाळक, डॉ. विवेक सावंत, डॉ. पल्लवी काळे, डॉ. किरण जाधव या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले. तसेच श्रीमती मालवे सिस्टर व नर्सिंग स्टाफ, फार्मसी विभागाचे आनंद भगत, लॅब विभागाचे डॉ. शेंडगे, रिसेप्शन विभागाचे फारुकी यांच्या टीमसह हॉस्पिटलचे समन्वयक श्री. भोसले सर आणि सर्व कर्मचारी वर्गाने मोलाची भूमिका बजावली.

​याप्रसंगी जातेगावचे ग्रामस्थ श्री. शंकरराव पवार, माजी सरपंच श्री. सतीश चव्हाण, डॉ. रावसाहेब राठोड, पत्रकार दत्ताभाऊ वाघमारे, विशाल पांढरे, पत्रकार कालिदास काकडे, देवराव यमगर, अंकुश धोंडरे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

|| भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर || 🏥  #जातेगाव ​जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित 'शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड ...
15/04/2026

|| भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर || 🏥 #जातेगाव

​जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित 'शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्युट, गेवराई' यांच्या विद्यमाने नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीसाठी राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार केले जातील.

शिबिरातील प्रमुख सुविधा:

​दात आणि मुखरोग तपासणी, ​बालकांच्या आजारांची तपासणी, ​महिलांच्या आरोग्याची विशेष तपासणी, ​बी.पी. (रक्तदाब) आणि शुगर (मधुमेह) तपासणी, ​रक्त आणि लघवी तपासणी, ​मोफत गोळ्या आणि औषधांचे वाटप यासह ​अनेक आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन

​🗓️ शिबिराचा तपशील:
​दिनांक: गुरुवार, १६ एप्रिल २०२६
​वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत
​ठिकाण: जातेगाव

​नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य शिबिराचा परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

​📞 पूर्वनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: ०२४४७-२६२३३३, २६४३३३, २९९३३३

We're Hiring!​Sharda Multispeciality Hospital & Research Institute, Beed is urgently seeking experienced medical profess...
13/04/2026

We're Hiring!

​Sharda Multispeciality Hospital & Research Institute, Beed is urgently seeking experienced medical professionals to join our team:

​• Consultant Anaesthetic (MBBS, MD / DA)

* Consultant Orthopedic Surgeon (MS / DNB - Orthopedic)

* Consultant Gynaecologist (MS - OBGY / DGO)

​Note: Candidates must be registered with MMC. Experienced candidates preferred.

​Location: Takadgaon Road, Georai, Dist. Beed

​Send your resume to: hr@shardamultispeciality.com
​Contact: 7588850966 / 02447- 262333

🏥 गेवराईकरांसाठी आनंदाची बातमी! 🏥​आता दर्जेदार उपचारांसाठी मोठ्या शहरात जाण्याची अजिबात आवश्यकता नाही! अगदी कमी खर्चात आ...
06/04/2026

🏥 गेवराईकरांसाठी आनंदाची बातमी! 🏥

​आता दर्जेदार उपचारांसाठी मोठ्या शहरात जाण्याची अजिबात आवश्यकता नाही! अगदी कमी खर्चात आणि अत्याधुनिक सुविधांसह सर्व उपचार आता एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

​✨ शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल & रिसर्च इन्स्टिट्युट, गेवराई✨

​आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली खालील प्रमुख विभाग कार्यरत आहेत:

🔹 सर्व आजारांवर औषध उपचार सुविधा
🔹 प्रसुती व स्त्रीरोग उपचार विभाग
🔹 बालरोग विभाग
🔹 दंतरोग विभाग

​हॉस्पिटलची काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि सुविधा:

​१०० बेड क्षमतेचे सुसज्ज हॉस्पिटल, ​अत्याधुनिक I.C.U आणि M.I.C.U विभाग, ​२४x७ आपत्कालीन सेवा, मेडिकल आणि ॲम्बुलन्स (रुग्णवाहिका), ​सोनोग्राफी, एक्स-रे आणि सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या एकाच ठिकाणी, ​विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांची (ऑपरेशन) सुविधा

​📍 पत्ता: शारदा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल & रिसर्च इन्स्टिट्युट, ताकदगाव रोड, गेवराई, जि. बीड - ४३११२७

📞 संपर्क: 02447 - 262333, 264333, 299333

DrKiran Lahurao Jadhav Ajay PanditTatyasaheb BhosaleSham Nagnath Raut Mauli Balasaheb Gore Saurabh Pote निलेश पाटील Deep...
25/03/2026

DrKiran Lahurao Jadhav Ajay PanditTatyasaheb BhosaleSham Nagnath Raut Mauli Balasaheb Gore Saurabh Pote निलेश पाटील Deepak Nikalje Babu Wade Gogule Kashinath Ramkisan Kailas Sonwanene Sagar Pradhan Gokul Chormale Sandeep Madke

Ajay Pandit DrKiran Lahurao Jadhav Saurabh PoteSham Nagnath Raut निलेश पाटील सुनिल देशमुख Deepak Nikalje Mauli Balasaheb...
13/03/2026

Ajay Pandit DrKiran Lahurao Jadhav Saurabh PoteSham Nagnath Raut निलेश पाटील सुनिल देशमुख Deepak Nikalje Mauli Balasaheb Gore Gokul Chormale

We Are Hiring following positions, join our team..!
19/02/2026

We Are Hiring following positions, join our team..!

Address

Gevrai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharda Multispeciality Hospital & Research Institute Georai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share