16/01/2023
मी शिकलेली, सुस्थितीतील, शहरात रहाणारी,
आयुष्यात सगळी सुख उपभोगली.
मग आता काय करायचं?
इव्हेंट.
मौज मजा गम्मत ...
चला, किटी पार्टी करु.
आपली संस्कृतीही जपायला हवी ना ..... मग संक्रात-हळदीकुंकू करू.
हे एका शहरी संपन्न स्थितीतील बाईचे मनोगत.
तिला माहितीये, की ती हे सगळे गंमत म्हणून करतीये.
पण ...
ह्याचे पडसाद निम्न वर्गात उमटतात.
खेड्यांतून, गावांतून हे असे संवाद ऐकू येतात ...
.. बघ, ती एवढी शिकली-सवरलेली बाई हे करते,
आणि तुला काय ग धाड भरली ?
.. अग, त्या शहरातल्या बायका करतात.
मग आपण पण केले पाहिजे.
असे करणे म्हणजेच आपण शिकलेल्या.
बरोबरच असणार ते.
आणि मग सुरू होतात ... हळदीकुंकू सोहळे.
फुटकळ २-५-१० ₹ चे काहीतरी वाण.
पूर्वीच्या काळी,
प्रत्येकाच्या शेतात उगवलेलं सगळं
सुगडात भरून वाण म्हणून एकमेकींना दिला जायचं.
त्या सुगडातील एकूणएक गोष्ट खाल्ली जायची.
बोरं, ऊस, शेंगा, गाजर, रेवडी, आणि बरेच काही.
आता काय करतोय ?
नुसता दिखावा.
पैठण्या, पाटल्या, नथ, मेकअप. आणि फोटो.
आणि पौष्टिक अन्न ?
ह्या सुगीच्या दिवसात उगवलेले धान्य, भाजीपाला ?
तो कुठंय ?
परत हळदी कुंकू शब्द वापरून,
विधवा, कुमारी, घटस्फोटिता ह्यांना आम्ही बोलवतो,
वगैरे वगैरेचे नगारे बडवयचे,
पण त्या किती ऑकवर्ड होतात, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष.
पूर्वजांना किती डोकं होतू,
ऋतुनुसार सण साजरे करायचे.
आणि आता काय करतोय आम्ही ?
मज्जा मज्जा मज्जा.
परत तुम्हाला नाही करायचे तर तुम्ही नका करू.
वगैरे अर्धवट ज्ञान आम्हालाच.
#आधारित