माधवबाग उरूण इस्लामपूर

माधवबाग उरूण इस्लामपूर Our mission is to blend state-of-the-art medical technology & research with a dedication to patient

31/01/2025
जागतिक हृदय दिनानिमित्त  निमित्त तरुण वयातील हार्ट अटॅक वाढतोय !!!आजकाल या न्यूज आपण फार ऐकतो , अगदी तरुण वयात हार्ट अटॅ...
29/09/2024

जागतिक हृदय दिनानिमित्त निमित्त
तरुण वयातील हार्ट अटॅक वाढतोय !!!

आजकाल या न्यूज आपण फार ऐकतो , अगदी तरुण वयात हार्ट अटॅक येत आहेत . कोल्हापुरात एका २८ वर्षाचा मुलाचा वाढदिवसा दिवशीच हार्ट अटॅक ने मृत्यू झाला !! धक्का बसला ना ? पण हो हे सत्य आहे , मग याची कारण काय असू शकतात.
सगळ्यात महत्वाचं "आहार "-
गेल्या आठवड्यात मी कोकणातील एका हॉटेल मध्ये नाश्ता करायला थांबलो होतो , एक साधारण १५ मिनिटाने त्या ठिकाणी १०-१२ शाळेतल्या मुली त्या हॉटेल मध्ये येऊन बसल्या साधारण १३-१६ वयोगटातील त्या मुली असतील , मला वाटलं कदाचित या मुली डब्बा खायला आल्या असतील पण आश्यर्य याच वाटलं कि १० मिनिटाने त्या प्रत्येक मुलीच्या पुढ्यात एक लाल कलर च्या चायनीझ फ्राईड राईस ची डिश होती आणि त्या आवडीने खात होत्या . आता हे फक्त एक उदाहरण आहे , अशीच परिस्थिती थोड्याफार फरकाने गावापासून शहरापर्यंत भारतात सगळीकडे आहे. फक्त पदार्थ बदलतात चायनीझ , पिझ्झा , बर्गर , कोल्ड्रिंक्स , तळलेले पदार्थ आणि बरेच काही . याचा अर्थ असा कि आपण लहान वयातच या मुलांमध्ये हृदयरोगाची बीजे अनावधानाने पेरत आहोत , आणि भरतीतील जी युवा पिढी आहे किंवा जी पुढे जाऊन युवा होतील याना या आजारांच्या विळख्यात अडकवत आहोत.
या ठिकाणी गरज आहे अवेरनेस ची आणि शिक्षणाची . प्रसार माध्यमातील वेग वेगळया खाद्यपदार्थाच्या जाहिरातीचे हे परिणाम असू शकतात. यासाठी शाळा तसेच पालक यांच्याकडून पोषक आहार आणि आहाराच्या सवयी याचे संस्कार आपल्या या पुढच्या पिढीना नक्कीच निरोगी ठेवू शकतात. घरी बनवलेला भाजी पोळी हाच सगळ्यात उत्तम आहार आहे हे जेव्हढ्या लवकर आपल्याला कळेल तेव्हडा चांगला आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा - " व्यायाम न करणे किंवा व्यायामाच्या चुकीच्या पद्धती "
आज काल तरुणाई मध्ये जिम च खूप फॅड आहे , चांगली शरीरयष्टी कमवण्यासाठी मुलं मुली जिम मध्ये जातात. खरं तर हि खूप चांगली गोष्ट आहे कि हि युवा पिढी "फीट इंडिया" च्या या मोहिमेत सहभागी आहे . पण मग जिम करूनही तरुणांमध्ये हार्ट अटॅक का येतात ? मग जिम आणि व्यायाम एकच आहेत का ? कि त्यामध्ये काय फरक आहे ? या मध्ये जर का आपण आयुर्वेद व्यायामाबद्दल काय सांगतो हे समजून घेतलं तर याच उत्तर नक्की सापडेल.
शरीर आयास जननं कर्म व्यायाम संज्ञीकम !
ज्या कार्याने शरीराला कष्ट पडतात त्याला व्यायाम म्हणतात अशी सोपी व्याख्या आयुर्वेदाने सांगितली आहे. पण फक्त एवढेच सांगितलंय काय ? नाही त्यासोबत आयुर्वेदाने व्यायाम कोणी करावा कोणी नाही ? किती करावा ? कधी करावा ? त्याचे फायदे काय ? आणि त्याने होणारे नुकसान काय ? हे पण सांगितलं आहे.
वात पित्तामयी बालो वृद्धो अजीर्ण तं त्यजेत !
ज्या व्यक्तीमध्ये वातपित्ताचे विकार आहेत , जी आजारी आहे ,लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि ज्याला अपचन झाले आहे अश्या व्यक्तींनी व्यायाम करू नये. या व्यतिरिक्त सर्वानी व्यायाम करताना खालील गोष्टीचा विचार करायला हवा.
वयो बल शरीराणी देशकाल अशनानी च ! समिक्ष्य कुर्यात व्यायामं अन्यथा रोगमापनुयात !
व्यक्तीच वय , त्याच बल , ती कोणत्या वातावरणात राहते , कोणत्या वेळी व्यायाम करते , आणि या सोबत आहार कायअसतो यावर व्यायामाचे फायदे असतात अन्यथा त्या व्यक्तीला व्यायामाच्या फायदा कमी आणि नुकसान जास्त होते म्हणजेच इतर आजारांची निर्मिती होते.
व्यायाम कधी आणि कसा करावा ?
सर्वेष्वृतुष्वहरहः पुम्भिरात्महितैषिभिः।
बलस्यार्थेन कर्तव्यो व्यायामो हन्त्यतोऽन्यथा!!
अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलीभी :स्निग्ध : भोजीभी : |शीतकाले वसंते च मंद मेव ततो अन्यदा !
तं कृत्वानु सुखं देहं मर्दयेच्च समंतता !!
आयुर्वेदाने हे खूप सरळ शब्दात सांगितलंय कि ज्याला योग्य आरोग्य हवं आहे त्याने प्रत्येक ऋतूमध्ये अर्ध शक्ती व्यायाम करावा अर्ध शक्ती व्यायाम म्हणजेच शरीराच्या शक्ती च्या निम्म्या शक्तीने व्यायाम करावा. म्हणून फक्त शरीरयष्टी कमवण्याच्या हेतूने अति व्यायाम केल्यास घातक असतो. आहारामध्ये स्निग्ध भोजन असावे , हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळा च्या सुरवातीला नियमितपणे व्यायाम करावा इतर ऋतूमध्ये हलके व्यायाम करावे. तसेच व्यायामानंतर हलक्या हाताने शरीराचा मसाज करून घ्यावा.
व्यायामाचे फायदे -
व्यायामाने शारीरिक आणि मानसिक स्थैर्य येते , व्याधी प्रतिकारक्षमता वाढते , पचन शक्ती वाढते , कार्य करण्याची टाकत वाढते , शरीर निरोगी राहते.cवृद्धत्व उशिरा येते.
अतिव्यायामाचे दुष्परिणाम :-
तृष्णा क्षय : प्रतमको रक्तपित्त श्रम : क्लम :!
अतिव्यायामात:कासो ज्वर : छर्दीश्च जायते !!
जे लोक अतिव्यायाम करतात त्यांना तहान लागणे , थकवा वाटणे , धाप लागणे , रक्तपित्त म्हणजेच ब्लीडींग डिसऑर्डर , खोकला , ताप , आणि उलटी या सारखे आजार उत्पन्न होतात .
व्यायाम हे शरीर निरोगी ठेवण्याचे जसे उत्तम साधन आहे तसेच अति व्यायाम हा शरीराचा नाश करण्यास देखील कारणीभूत आहे, त्यामुळे व्यायाम हा योग्य मार्गदर्शनाखाली केला गेला असावा ज्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होईल.
व्यायामामुळे हृदयाची कार्य क्षमता सुधारण्यास मदत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे VO२Max ,- हृद्यविकारामध्ये मृत्यू चा प्रेडिक्टर आहे , हा VO२Max योग्य व्यायामामुळे वाढण्यास मदत होते
सम दोष समाग्निश्च सम धातु मल क्रियाः | प्रसन्न आत्मेन्द्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते ||
शरीरातील सर्व दोष धातू अग्नी मल हे सामान्य अवस्थेत राहणे, त्यासोबत आत्मा मन आणि सर्व इंद्रिय हि प्रसन्न अवस्थेत असतील तर त्यालाच आपण स्वास्थ्य म्हणून शकतो. शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक आरोग्य म्हणजेच खरं स्वाथ्य आहे.

माधवबाग मध्ये याच आयुर्वेदाच्या आहार व्यायाम विचार आणि पंचकर्म या मूळ तत्वांचा विचार करून हृदयरोग, मधुमेह , उच्च रक्तदाब आणि इतर आजरावर उपचार केले जातात
डॉ सचिन पाटील
एम डी आयुर्वेद
९८२३३४७२४४

Heart attacks are on the rise at young ages!!!
Nowadays we hear this news a lot, heart attacks are happening at a very young age. A 28-year-old man died of a heart attack on his birthday in Kolhapur!! Wasn't it a shock? But yes this is true, then what could be the reason for this.
The most important " Non Healthy diet" –
Last week I stopped at a hotel in Konkan to have breakfast, after about 15 minutes a group of 10-12 girls from school came and sat in the hotel, age group of around 13-16 yrs old, I thought maybe these girls came to eat Tiffin . After 10 minutes each girl had a dish of red colored Chinese fried rice. Now this is just an example, the situation is similar everywhere in India from village to city with slight differences. Pizza, Burgers, Cold Drinks, Fried Foods items are the main culprits. This means that we are unwittingly planting the seeds of heart disease in these children at a young age, and trapping the young generation who are or will be the future of India, in the grip of these diseases.
Awareness and education is needed here. This may be the result of different food advertising in the media. For this reason, the culture of nutritious food and eating habits from schools and parents can definitely keep our next generation healthy. The sooner we learn that home-made healthy food is the best diet, the better.
Another important point - " The way of exercise".
Nowadays going to gym is very common among youth, boys and girls go to gym to get good physical strength. In fact it is a very good thing that this young generation is participating in this campaign of "Fit India Healthy India ". But then why do heart attacks occur in young people even after doing gym? So is gym and exercise the same thing? What is the difference between them? If we understand what Ayurveda says about exercise, then answer for above said question will be found.
शरीर आयास जननं कर्म व्यायाम संज्ञीकम !
A simple definition of Ayurveda is that the work that causes the body to utilize strength is called exercise. But that's all that has been said? No, who should do exercise and who should not ? How much to do? When to do it? What are its benefits? And what is the damage? This has also been said.
वात पित्तामयी बालो वृद्धो अजीर्ण तं त्यजेत !
People who have diseases of Vata and Pitta , who are sick, children, old people and who have indigestion should not exercise. Apart from this, everyone should consider the following while exercising.
The benefits of exercise depend on the person's age, individuals strength, the environment he lives in, the time he exercises, and also what is the diet. Otherwise the benefit of exercise is less for the person and the harm is more i.e. the formation of other diseases.
When and how to exercise?
सर्वेष्वृतुष्वहरहः पुम्भिरात्महितैषिभिः।
बलस्यार्थेन कर्तव्यो व्यायामो हन्त्यतोऽन्यथा!!
अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलीभी :स्निग्ध : भोजीभी : | शीतकाले वसंते च मंद मेव ततो अन्यदा !
तं कृत्वानु सुखं देहं मर्दयेच्च समंतता !!
Ayurveda says in very simple words that one who wants good health should do Ardha Shakti i.e half of body strength, exercise in every season in the morning on empty stomach. Therefore, excessive exercise for the sole purpose of gaining body is harmful. One should do regular exercise in winter and early summer, light exercise in other seasons. After exercise gentle massage is necessary to gain more benefits out of exercise.
Benefits of exercise
Exercise brings physical and mental stability, improves immunity and fighting spirits against diseases, helps to improve digestion.
Exercise helps to improve work efficiency and most Important its keep your heart healthy. Exercise help to improves Vo2Max which is one of the death Predictor in Cardiovascular disease.
Effects of Excessive Exercise:
तृष्णा क्षय : प्रतमको रक्तपित्त श्रम : क्लम :!अतिव्यायामात:कासो ज्वर : छर्दीश्च जायते !!
People who over exercise develop thirst, fatigue, shortness of breath, bleeding disorders, cough, fever, and vomiting.
So here we need to understand that exercise is best way to keep your heart and body healthy but it should be under guidance and in a proper way or else it will create harm to our body.
Healthy Diet and proper Exercise( physical as well as Mental) play a Pivotal role in health of each individual.
सम दोष समाग्निश्च सम धातु मल क्रियाः | प्रसन्न आत्मेन्द्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते ||
A healthy person is defined as someone whose doshas must be in equilibrium, the digestive fire is in a balanced state and the tissues and wastes working in a normal, balanced state. The sensory and motor organs, sense organs, mind, and Soul must be also in a pleasant state. Such a person is, who is balanced in all those areas, is called a healthy person or Swastha.
In Madhavbaug we are using same basic principle of Ayurveda to treat heart diseases and its risk factors to make HeartDisease free India.
Dr Sachin Patil MD Ayurveda 9823347244
Health

03/07/2024

माधवबाग उरून इस्लामपूर तर्फे डॉक्टर डे निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर दि . १ जुलै २०२४ ते ८ जुलै २०२४ सकाळी ९ ते ६
01/07/2024

माधवबाग उरून इस्लामपूर तर्फे डॉक्टर डे निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर
दि . १ जुलै २०२४ ते ८ जुलै २०२४ सकाळी ९ ते ६

09/06/2020

#रक्षाकवच_धुप

🔰 #धुपण म्हणजे काय ??

✓थोडक्यात सांगायचं झालं तर विविध औषधी गुणधर्म असलेली द्रव्य उदा वेखंड, मोहरी , गुग्गुळ , या सारखी औषधी द्रव्ये एकत्र करून कोळस्यावर जाळून धूर करणे , यालाच शास्त्रीय भाषेत धूप असे म्हणतात , विविध उपयोगानुसार ते वेगवेगळे असतात.

🔰 #धुपण का करावे ?

✓शक्यतो धुपण हे उत्तम आरोग्य साठी संगीतले जाते. श्वासातून आत जाणारे जंतू , विषाणू जे डोळ्यांनी दिसत नाही त्यांचा नाश करण्यासाठी , तसेच एखादी खोली किंवा वातावरण निर्जंतुक करण्यासाठी ही याचा उपयोग केला जातो.
पूर्वी सुतीका ( #बाळंतीण व #बाळ ) यांच्या खाटेखाली हा धूप लावायचे याने , बाळंतिणीच्या #जखमा भराव्यात तसेच बाळाची नाळ सुखावी तसेच त्या ठिकाणी कोणताही जंतू संसर्ग होऊ नये , तसेच त्या खोलीतील सर्व #जंतू नाहीसे होऊन ती रुम निर्जंतुक व्हावी असा उद्देश होता.

🔰सध्या कोरोना ला आळा घालण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो का ?

✓आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती साबणाने हात धुते, ऑफिस ला जाऊन आल्यानंतर घरी आल्यावर प्रत्येक गोष्ट #निर्जंतुक केली जाते , तरीपण १००% निर्जंतुकीकरण साध्य होत नाही. तेच जर आपण सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे घरी धूपन केले तर नक्कीच सर्व जंतू नाहीसे होतील , याचा नक्कीच फायदा सर्वांना होईल, पूर्वी होम हवन याच हेतूने केले जायचे .

🔰रासायनिक अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर पेक्ष्या याचा चांगला उपयोग होऊ शकतो का ?

✓नक्कीच! कारण, हे धूप हजारो वर्षांपूर्वी वापरून पाहिले गेले आहेत , म्हणूनच त्याचा उपयोग आणि वर्णन संहितेत सापडते, या व्यतिरिक्त जे काही रासायनिक #जंतुनाशक आहेत त्याचे काही दुष्परिणाम आहेत ज्यामध्ये #त्वचा विकार , #श्वसनाचे विकार, #डोळ्यांचे विकार पासून गंभीर आजार उदभवू शकतात . मात्र या धुपणाचे असे कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाहीत.

𝗙𝗼𝗿 𝗔𝗱𝘃𝗮𝗻𝗰𝗲 𝗕𝗼𝗼𝗸𝗶𝗻𝗴 𝗖𝗼𝗺𝗺𝗲𝗻𝘁 !

05/06/2020

*कोरोना संबंधी सामान्य प्रश्न आणि त्याची उत्तरे*

*१) कोरोना आजार म्हणजे नक्की काय आहे ?*
कोरोनाव्हायरस व्हायरसचे एक मोठे कुटुंब आहे ज्यामुळे प्राणी किंवा मानवांमध्ये आजार उद्भवू शकतात. मानवांमध्ये, अनेक कोरोनाव्हायरस सामान्य सर्दीपासून मिडल ईस्ट RESPIRATORY सिन्ड्रोम (एमईआरएस) आणि SARS (एसएआरएस) सारख्या गंभीर रोगांमधे श्वसन संक्रमण होण्यास कारणीभूत असतात. सर्वात अलीकडे सापडलेल्या कोरोनाव्हायरसमुळे रोग कोविड -१९ होतो.

*२) कोविड १९ म्हणजे काय ?*
कोविड -१ ९ हा नुकताच सापडलेल्या कोरोनाव्हायरसमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. हा नवीन विषाणू आणि आजार डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहानमध्ये उद्रेक होण्यापूर्वी अज्ञात होता. कोविड -१९ हा सध्या जगभरातील सर्व देशात पसरला आहे .

*३ ) कोविड -१ ९ची सामान्य लक्षणे काय आहेत ?*

कोविड -१९ची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, कोरडे खोकला आणि थकवा.

इतर लक्षणे नाक चोंदणे , डोकेदुखी, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह, घसा खवखवणे, अतिसार, चव किंवा गंध कमी होणे किंवा त्वचेवर पुरळ किंवा बोटांचा रंग बदलणे . ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही लोकांना संसर्ग होतो परंतु त्यांच्यात अगदी सौम्य लक्षणे असतात.

बहुतेक लोक (सुमारे 80%) इस्पितळात उपचार न घेता या आजारापासून बरे होतात.
कोविड -१९ च्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक 5 पैकी 1 व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदय आणि फुफ्फुसांच्या समस्या, मधुमेह किंवा कर्करोग सारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या ज्यांना गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो. तथापि, कोणीही कोविड -१९ या आजाराला बळी पडू शकतो आणि गंभीर आजारी होऊ शकतो. ज्या सर्व वयोगटातील लोक ताप आणि / किंवा खोकला संबंधित श्वासोच्छ्वास, श्वास लागणे, छातीत दुखणे / दबाव किंवा भाषण कमी होणे किंवा हालचाली गमावत आहेत अशा लोकांना तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.

*४) त्याचा प्रादुर्भाव कसा होतो ?*

ज्यांना व्हायरस ची बाधा झालेली आहे अश्या लोकांकडून त्यांच्याकडून कोविड -१ ९ आजार पसरू शकते. हा रोग प्रामुख्याने नाकातून किंवा तोंडातून लहान थेंबांद्वारे व्यक्तीकडे पसरतो, जेव्हा कोविड -१९ संक्रमित व्यक्ती खोकते शिंकतो किंवा बोलतो तेव्हा त्या व्यक्तीच्या श्वासातून हे विषाणू बहर पडत आणि संपर्कात आलेल्या इतर व्यकितचत्या शरीरात श्वासामार्गे पसरतात . म्हणूनच इतरांपासून कमीतकमी 1 मीटर दूर रहाणे महत्वाचे आहे. हे थेंब टेबल्स, दरवाजायच्या काड्या आणि हँड्रेल्स सारख्या व्यक्तीच्या सभोवतालच्या वस्तू आणि पृष्ठभागावर येऊ शकतात. लोक या वस्तू किंवा पृष्ठभागास स्पर्श करून, नंतर त्यांचे डोळे, नाक किंवा तोंड स्पर्श करून संक्रमित होऊ शकतात. म्हणूनच आपले हात साबणाने आणि पाण्याने नियमितपणे धुणे किंवा अल्कोहोल-आधारित हाताने चोळणे स्वच्छ करणे महत्वाचे आहे.

*५)कोविड १९ हा आजार इतर व्हायरल आजार पासून कसा वेगळा आहे ?*

कारण याचा रोगांच्या तुलनेत खूप जास्त होतोय , काही रुग्नांमधेय याचे गंभीर परिणाम दिसून येतात .

*६) इतर आजारांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण किती आहे ?*
तस पाहिलं तर इतर आजारांच्या तुलनेत , या आजाराचा मृत्युमुखी पडण्याचा रेट हा फरार कमी आहे ३.५%इतका आहे जो इतर आजार
इबोला ४० टक्के .बर्ड फ्लू ५२ टक्के ,निपहं ७७ टक्के , SARS ९ टक्के , स्वाईन फ्लू ६ टक्के इतके आहे ,
या पेक्षाही पुढे जाऊन आपण विचार केला तर २०१७ सालची आकडेवारी हे सांगते कि त्या वर्षी भारतात दार रोज विविध आजारांनी मृत्युमुखी पाडण्याचे प्रमाण
खालील प्रमाणे आहे
IHD ४२२०
डायबेटीस ५१०
COPD २६२८
अस्थमा ६९८
स्ट्रोक ७९४
दॆर्हिया १९७०
श्वासांचे विकार १३९०
टीबी १०४५

*७) इतर च्यारलं आजारांची टट्रीटमेंट काय असते ?*
बऱ्याचवेळा व्हायरल आजार आपोआप बरे होतात , कोणत्याही औषधाची गरज लागत नाही , काही आजारावर लसी उपलभड आहेत सध्या कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध नाही

*८) दिलेली औषध कशी काम करतात?*

सध्या आजाराच्या लक्षणं नुसार उपचार केले जात आहेत त्या मध्ये एन्टीबीओटीक ,अँटी व्हायरल , VIT सी आणि अँटी मलेरियल औषदाचा वापर सुरु आहे

*९) या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी किंवा उपाययोजना करायला हव्यात ?*

हात स्वछ धुणे
शारीरिक स्वछता
मास्क चा वापर
सोशल डिस्टनिंग

नियमितपणे आपले हात अल्कोहोल-आधारित हाताने चोळा किंवा साबणाने आणि पाण्याने धुवा. का? आपले हात साबणाने आणि पाण्याने धुण्यामुळे किंवा अल्कोहोल-आधारित हाताने घासण्याने आपल्या हातात असलेले विषाणू नष्ट होतात.

डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. का? हात बर्याच पृष्ठभागास स्पर्श करतात आणि व्हायरस उचलू शकतात. एकदा दूषित झाल्यास हातांनी विषाणूचे डोळे, नाक किंवा तोंडात संक्रमण केले. तिथून, व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करुन आपल्याला संक्रमित करू शकतो.

*१०) कोविड -१ of चा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरू शकतो का ?*
हो गर्दीच्या ठिकाणी मास्क वापर एकटे असताना नको

*११) विविध पृष्ठभागांवर व्हायरस किती काळ जिवन्त राहतो ?*
प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टील ७२ तास
कॉपर ४ तास
कार्डबोर्ड २४ तास

*१२) हात २० सेकंद साबणाने का धुवावेत ?*
कारण जर आपल्या हातावर हे विषाणू असतील तर हात कव्हर करायला तेव्हडा वेळ लागतो , दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे जिवाणू किंवा विषाणू असतात ते साधारण १५ ते ३० सेकंड हात धुतले तर नष्ट होतात , आणि सर्वात म्हहत्वाची गोष्ट म्ह्म्णजे जेव्हा हात साबणाने धुतो त्यावेळेस जे विषाणू सध्या पाण्यात विरघळत नाहीत ते साबणाच्या पाण्यात विरघळून नष्ट होतात . साबांतील सरफॅक्टंट मुले विषाणूचा बाह्य पडदा नष्ट होण्यास मदत होते

*१३) N ९५ रोखतो मास्क म्हणजेकाय?*
अति सूक्ष्म विषाणूंना आत प्रवेश करण्यास रोखतो

*१४) यावर मात करण्यासाठी काय करू शकतो ?*

सगळ्यात महत्वाचे संसर्गजन्य आजार असल्यामुळे कमीत कमी 1 मीटर चे अंतर ठेवा, संक्रमित ठिकाणी जाणे टाळा ,

*१५) डायबेटीस ब्लडप्रेशर रुगणांनी कशी काळजी घ्यावी ?*
सगळ्यात महत्वाचे म्हणजे घाबरून जाऊ नका , जर आपण योग्य ती काळजी घेतली योगा , प्राणायाम , अनुलोम विलोम आणि वैद्याच्या सल्ल्यानुसार जर काही व्यायाम प्रकार अमलात आणली तर आपण नक्कीच मात करू शकतो . कारण कोरोना मधुमेह ब्लड प्रेशर च्या रुग्णांना शोधत फिरत नाही

*१६) प्रतिकार क्षमता कोविड 19 पासून कशी वाचवू शकेल , ?*
ज्यांची प्रतिकार शक्ती जास्त असते त्या व्यक्तीच्या शरीरात या आजारविरोधात लढणाऱ्या अँटी बॉडी तयार होतात आणि त्यामुळे तो व्हायरस निकामी होतो

*१७) तूम्हि लोकांना काय आवाहन कराल ??*
योग्य आहार , त्यामध्ये मीठ साखर आणि फॅट सारख्या गोष्टीचा कमी वापर , फळ पालेभाज्या , डाळी , या पदार्थांचे जास्त प्रमाण ठेवून , आहार गरजेपुरताच घेतला तर आपण यावर मात करू शकतो .

योग्य आहार
योग्य व्यायाम
योग्य विचार
आणि शारीरिक स्वच्छता
मानसिक आरोग्य चांगले राखणे
आणि सोशल डिस्टनसिंग
या पंचसूत्रीचे पालन केल्यास
आपण कोरोनावर मात करू शकतो

साभार : डॉ सचिन रामकृष्ण पाटील
एम डी आयर्वेद
९८२३३४७२४४

Address

Aakanksha Nivas , Behind Bus Stand Opposite Peter England Showroom Urun Islampur
Islampur
415409

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when माधवबाग उरूण इस्लामपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share