Aarogyasparsh Chikitsalay

Aarogyasparsh Chikitsalay Health care is our Passion. It gives us tremendous joy, happiness & satisfaction.

We are introducing different activities for the involvement of people in their own health care, so in this way, we will surely achieve our mission.

To Create Healthy Society is our Mission
23/10/2023

To Create Healthy Society is our Mission

आपण आपल्या आरोग्याबाबत जागरूक आहात का? कृषि विभागाच्या वतीने दिनांक *२५ जून २०२२ ते १ जुलै २०२२ या* कालावधीत *"कृषि संजी...
26/06/2022

आपण आपल्या आरोग्याबाबत जागरूक आहात का?

कृषि विभागाच्या वतीने दिनांक *२५ जून २०२२ ते १ जुलै २०२२ या* कालावधीत *"कृषि संजीवनी सप्ताह"* आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये
*दिनांक - २६ जून २०२२.* हा दिवस *"पौष्टीक तृणधान्य दिन"* म्हणून साजरा करण्यात येत आहे.

या दिनाचे औचित्य साधून *आज रविवार दि. २६ जून २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता* "पौष्टिक तृणधान्य हा आशेचा किरण" या ऑनलाईन चर्चासत्र कार्यक्रमात आपल्याला

*१."खाद्य संस्कारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व"* या विषयावर
*मा.श्री.अभिजित राऊत, जिल्हाधिकारी* ,जळगाव हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.तसेच

*२."पारंपारिक पौष्टिक चविष्ट अन्न एक काळाची गरज"* या विषयावर *डॉ. अनंत पाटील, एमडी, आयुर्वेदिक व आहार तज्ञ. संचालक, आरोग्य स्पर्श क्लिनिक, जळगाव*

*३ "पौष्टिक तृणधान्य उपपदार्थ उपलब्धता व विपणन"* या विषयावर *मा. श्री. तात्यासाहेब फडतरे, पुणे, संचालक, समृद्धी ऍग्रो ग्रुप*

*४. "कृषी विभागाची पौष्टिक तृणधान्याची योजना"* या विषयावर *मा. श्री संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव*

*५.पौष्टिक तृणधान्य महाराष्ट्राची वाटचाल* " या विषयावर *मा.श्री विकास पाटील संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषि आयुक्तालय,पुणे*
आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.

पौष्टिक तृणधान्य दिनाचे महत्व लक्षात घेता या कार्यक्रमामध्ये सर्वांनी
https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM
या कृषि विभागाच्या यू ट्यूब लिंक वर क्लिक करून सहभागी व्हावे ही विनंती. 🙏

कृषि विभाग-महाराष्ट्र शासन, Agriculture Department,GoM

आरोग्यमंत्र            नाचणीचे पदार्थ नाचणीचा वापर आपण फार सीमित केला आहे. नाचणीची बिस्किटे सोडून इतरही अनेक पदार्थ आहेत...
01/03/2022

आरोग्यमंत्र

नाचणीचे पदार्थ

नाचणीचा वापर आपण फार सीमित केला आहे. नाचणीची बिस्किटे सोडून इतरही अनेक पदार्थ आहेत. जसे - नाचणीचे लाडू,डोसे,थालीपीठ. बिस्किटे ही कोरडी असतात. कोरडे पदार्थ खाऊन शरीराला स्निग्धता मिळत नाही. याकरिता ज्याप्रमाणे रव्याचे लाडू तयार केले जातात त्याप्रमाणे गाईचे तूप टाकून, साखर वापरून नाचणीचे लाडू करावेत. लोह, कॅल्शिमयमसोबत स्निग्धता मिळते. गर्भिणी स्त्रिया व लहान बालकांकरिता हे अतिशय उत्कृष्ट असे अन्न आहे. लहान मुले या लाडूंच्या रंगावरून यास चॉकलेट लाडू असेही म्हणतात. रोजच्या आहारात नाचणीची भाकरीसुध्दा फार छान होते. तंतुमय पदार्थ अधिक व शर्करा कमी असल्याने वजन वाढत नाही. मधुमेही रूग्णांना चालते शिवाय भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. याकरिता वृध्दांसाठी योग्य आहे. नाचणी किंचित मोड आणून दळल्याने त्यात व्हिटामिन ‘सी’ची मात्रा वाढते व त्यातील लोह शरीरात अधिक मात्रेत शोषले जाते. स्त्रियांमध्ये दर महिन्यास पाळीमुळे होणार्‍या रक्तस्त्रावाच्या परिणामस्वरूप हिमोग्लोबिन कमी होते. याकरिता स्त्रियांनी आहारात नाचणीचे पदार्थ ठेवावेत. तसेच उष्णतेमुळे त्रस्त रूग्णांनाही नाचणी उपयोगी ठरते. अधिक रक्तस्त्राव उत्पन्न करणार्‍या व्याधीत हा उत्तम असा शीत आहार आहे. नाचणीचे पीठ चपातीच्या कणकेत घालता येते. नाचणीचे पापड व नाचणीची खिची अतिशय चविष्ट व पौष्टिक आहेत. डोसे करताना त्या पिठात काही प्रमाणात नाचणीचे पीठ घातल्याने नाचणीचे डोसे खाता येतात. थालीपीठाच्या भाजणीत नाचणी टाकता येते. चला तर मग नाचणी खाऊया व खाऊ घालूया.

डॉ. अनंत पाटील
एम.डी.(आयु.)
9860066460
जळगाव व पुणे

 #मराठी_राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... #अभिजात_मराठी  #मराठी
27/02/2022

#मराठी_राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
#अभिजात_मराठी #मराठी

आरोग्यमंत्र                              घातक ज्ञान                        भाग-२विविध मासिकं व वृत्तपत्रांद्वारे प्रकाशि...
25/02/2022

आरोग्यमंत्र

घातक ज्ञान
भाग-२
विविध मासिकं व वृत्तपत्रांद्वारे प्रकाशित होणारे आरोग्य विशेषांक व पुरवण्यांद्वारे आजारांसंबंधीचे विवेचन करण्यात येत असते. विविध घातक आजार जसे कॅन्सर, कोलायटिस, मधुमेह इ. यांचे प्रकारांनुसार, कारणांनुसार, घातक उपद्रवांनुसार विस्तृत विवेचन या लेखांद्वारे छापून येत असते. रूग्णांचे प्रबोधन करणे वा आजारांपासून स्वत:ला दूर कसे ठेवता येईल याचे मार्गदर्शन करणे हा अतिशय उपयुक्त उपक्रम आहे. मात्र या आजारांची घातकता, परिणामकारकता यांचे विस्तृत विवेचन केल्याने अनेक अडचणी उत्पन्न होत असतात असे आढळून येते. समाजातील सर्व वर्ग, वयाचे लोक मानसिकरित्या सक्षम असतातच असे नाही. जेव्हा असे लोक अशी माहिती वाचतात तेव्हा त्यांच्या मनात अनेक शंका घर करू लागतात. मानसिक सत्त्वगुण बलवान नसल्याने हे आजार आपल्याला झाले तर नाहीत ना ही शंका ते सतत घेत असतात. हे लोक खूप तपासण्या करून घेतात, अनेक डॉक्टरांना दाखवतात. प्रत्येक डॉक्टरकडे असे रूग्ण येत असतात. खूप समजावून देखील त्यांचे समाधान होत नाही. अमुक-अमुक आजाराची ही लक्षणे मला होत आहेत असे ते सांगतात. ही वाचनात आलेली लक्षणे असतात. काही वेळा तर नकारात्मक ऊर्जा वाढून वाढून नसलेले त्राससुध्दा होऊ लागतात. डॉक्टरांना यासंबंधी समुपदेशनासाठी फार वेळ खर्च करावा लागतो. अर्धवट ज्ञानामुळे नसलेले आजार लागतात. हे घातक ज्ञान नाही तर काय? मन व शरीर यांचा अन्योन्य संबंध आहे. एक बिघडले की दुसरे बिघडते. मन जर सतत व्याधींचाच विचार करेल तर ती वास्तविकता बनून जीवनात येते.

डॉ. अनंत पाटील
एम.डी.(आयु.)
9860066460
जळगाव व पुणे

आरोग्यमंत्र               घातक ज्ञान अर्धेज्ञान हे अतिशय घातक असते असे म्हटले जाते. ते आरोग्याच्या बाबतीत तंतोतंत लागू प...
23/02/2022

आरोग्यमंत्र

घातक ज्ञान

अर्धेज्ञान हे अतिशय घातक असते असे म्हटले जाते. ते आरोग्याच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. सोशल मीडियावर आरोग्याच्या संबंधित बरेच लेख येत असतात. शिवाय काही पुस्तकेसुध्दा सतत वाचण्यात येत असल्याने स्वतःची काही मते वाचक तयार करत असतात. त्या मतांचा वापर ते आपल्या जीवनात करायचा प्रयत्न करत असतात. जसे सकाळी उठून पाणी भरपूर प्रमाणात प्यावे, रात्री झोपतांना दूध प्यावे, ऍसिडिटी झाल्यास दूध प्यावे, गुळ-शेंगदाणे प्रत्येकाने खावे, ताक थंड असते, जेवताना अजिबात पाणी पिऊ नये, रोज दुधी भोपळ्याचा रस पिल्याने वजन कमी होते, डायबेटीसच्या रूग्णांनी कारले ज्युस- निंबपाल्याचा रस-जांभळाच्या बियांचे चूर्ण खावे, डायबेटीसच्या रूग्णांंनी गुळ खावा, उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी भरपूर लसूण खावा, शौच साफ होत नसल्यास भरपूर कोमट पाणी प्यावे, रोज ज्यूस प्यावा, जेवण झाल्यावर फळे खावेत, बेड टी, पोट साफ होण्यासाठी हिरडा चूर्ण खावे, रात्री जेवन झाल्यावर वॉक करावा, जेवण करून जीम करावी, वजन वाढण्यासाठी प्रोटिन पावडर खावी अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती अजूनही सापडतील. या माहितीचा वापर आपल्या जीवनात करण्याअगोदर आपल्या डॉक्टरांकडून याची खात्री करून घ्यावी, अर्धवट माहितीच्या आधारावर अनुसरण करू नये. पुस्तके, पेपर, व्हॉटस्अप वाचून आरोग्यासंबंधी आपली मते बनवू नये व आपल्या आरोग्याशी खेळ करू नये.

डॉ. अनंत पाटील
एम.डी.(आयु.)
9860066460
जळगाव व पुणे

आरोग्यमंत्र            रात्री जेवणानंतर कधीही कुठलीही गोष्ट आचरणात आणतांना आपण ती का करत आहोत याचा विचार घेणे अत्यंत आवश...
19/02/2022

आरोग्यमंत्र

रात्री जेवणानंतर

कधीही कुठलीही गोष्ट आचरणात आणतांना आपण ती का करत आहोत याचा विचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियावर तर रोज नवनवीन माहिती येतच असते. आचरणात आणण्यापूर्वी त्याची शहानिशा करावी. सध्या रात्री जेवणानंतर चालण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. नाईट मॅरेथॉन हा सुध्दा त्यातलाच प्रकार. जेवण करून लोक रात्री कानात गाणे लावून तासभर फास्ट वॉक करतात. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक दिसतील. रात्री चालावे हे योग्यच आहे. मात्र ती शतपावली असावी. रात्री भोजनपश्‍चात घरासमोर २-३ चकरा माराव्यात एवढेच. सकाळी चालायला वेळ मिळत नाही म्हणून रात्री जेवणानंतर तासभर फास्ट वॉक करतात. काही तर जेवणानंतर रात्री झोपण्याआधी जिम करतात. रात्री जेवणानंतर व्यायाम करणे हे अनाकलनीय आहे. जेवणानंतर रक्तपुरवठा पचनसंस्थेकडे अधिक असतो. मात्र व्यायाम केल्याने तो मांसपेशीकडे अधिक होतो. व पचन व्यवस्थित होत नाही. मांसाहार करून, अंडे खाऊन काही व्यक्ती व्यायाम करतात. अशा लोकांना आमवातासारखे संधीविकार वा त्वचाविकार होऊ शकतात. शिवाय रात्री व्यायाम करणे हे शरीरास हलकेपणा आणण्यापेक्षा थकवाच अधिक आणते. दिवसभर काम करून शरीरास आलेला थकवा घालवण्यासाठी विश्रांतीची गरज असते. त्यावेळेत व्यायाम करणे म्हणजे मांसपेशींना अतिरिक्त कामाला लावणे नाही का? यामुळे मांसपेशीचे विकार होण्यास वेळ लागणार नाही. आजच्या काळात आढळून येणार्‍या चित्रविचित्र आजारांचे कारण हे चित्रविचित्र जीवनशैलीत आहे........
.डॉ. अनंत पाटील
एम.डी.(आयु)
९८६००६६४६०
जळगाव व पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा...!शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवाजी_महाराज  #शिवजयंती
19/02/2022

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा...!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
#शिवाजी_महाराज #शिवजयंती

अवयव दानाचे कार्य करूया... नव्या जीवनाची नवी उमेद देऊया.
14/02/2022

अवयव दानाचे कार्य करूया... नव्या जीवनाची नवी उमेद देऊया.

सध्या बर्‍याच मातांची एक च समस्या आहे, की आमची मुले नीट जेवण  करत नाहीत. त्यांनी जेवण करावे म्हणून त्या विविध पद्धतीने  ...
12/02/2022

सध्या बर्‍याच मातांची एक च समस्या आहे, की आमची मुले नीट जेवण करत नाहीत. त्यांनी जेवण करावे म्हणून त्या विविध पद्धतीने प्रयत्न करत असतात.
काही माता technology चा वापर करतात. मोबाईल वरील videos दाखवत खाऊ घालतात किंवा काही माता जेवण करशील तरच मोबाईल देते,अशी अट घालून जेवू घालतात. मुले जेवण करतात मोबाईलसाठी, भूक लागली म्हणून नव्हे.
अधिक काळ पर्यंत मोबाईल बघता यावा म्हणून ते खावयास अधिक काळ घेतात. अतिशय हळू जेवण करतात. तास तास भर जेवण चालते.
चावण्याकडे लक्ष नसल्याने अन्न नीट चावले जात नाही. मुखामधील पचनच नीट न झाल्याने पुढील पचनक्रिया देखील सुरळीत राहू शकत नाही. शिवाय मुले किती आहार घेत आहेत हे त्यांना कळत नाही. अधिक प्रमाणात आहार घेतला जातो. यामुळे देखील पचनक्रिया बिघडते. यामुळे कायम आजारी असतात. त्यांची व्याधी प्रतिकारशक्ती कमकुवत असते. मुले जेवत नसतील तर त्यांच्या आहार व पचन क्रियेवर कार्य करणे आवश्यक आहे.मोबाईल दाखवून बळजबरी खाऊ घालणे हा त्यावरचा पर्याय नव्हे.
अधिक माहिती जाणून घ्या.
डॉ. अनंत पाटील एम. डी (आयुर्वेद)
📲 ९८६००६६४६

कडधान्य पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात त्यामुळे उत्तम आरोग्य राखण्यासाठी उपयोग होतो.  #कडधान्य  #पोषण  #आरोग्य  #आयुर्वेद ...
10/02/2022

कडधान्य पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात त्यामुळे उत्तम आरोग्य राखण्यासाठी उपयोग होतो.
#कडधान्य #पोषण #आरोग्य #आयुर्वेद #निरोगी

मन: पूर्वक भोजन बरीच लोकं दुपारचे जेवण ऑफिसमध्ये करतात.संध्याकाळी आल्यावर सगळे कुटुंबीय एकत्र स्नेहभोजन घेऊ शकतात मात्र ...
10/02/2022

मन: पूर्वक भोजन

बरीच लोकं दुपारचे जेवण ऑफिसमध्ये करतात.संध्याकाळी आल्यावर सगळे कुटुंबीय एकत्र स्नेहभोजन घेऊ शकतात मात्र घरी आल्यावर बरीच मंडळी टीव्ही समोर बसतात.जेवण देखील टीव्ही समोर बसूनच केले जाते.न्यूज चॅनेल , घरगुती भांडणाच्या मालिका बघत जेवण खूप वेळ पर्यंत चालते.कधी कधी व्यावसायिक लोक घरी येवून देखील व्यावसायिक कामे करतात तर काही सॉफ्टवेअर मधील मंडळी रात्री उशिरापर्यंत वर्क फ्रॉम होम करत असतात ही मंडळी जेवताना फोनवर बोलत असतात.
यात चुकीचे काय?
जेवण करते समयी लक्ष इतर ठिकाणी असेल तर चर्वण क्रियेकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे सेवन करत असलेल्या आहाराकडे अर्थात त्याच्या चविकडे लक्ष नसते, परिणाम स्वरूप आहार सेवन केल्याचे समाधान मिळत नाही व अधिक आहार सेवन केला जाऊ शकतो.
शिवाय चर्वणाकडे लक्ष नसल्याने लाळ अन्नात योग्य पद्धतीने मिसळणार नाही.याचाच अर्थ असा की ,पचन क्रियेची सुरवातच योग्य होणार नाही.पचन संबंधी तक्रारी उत्पन्न होतील. अधिक भोजन केल्याने वजन वाढेल. शिवाय विषाद निर्माण होईल अशा स्वरूपातील गोष्टी टीव्ही वर जेवण करताना बघण्याने स्नेह भोजन कसे होणार??

Address

1, Samarth Colony, Near GK Force Motors, Agrawal-Kolhe Hospital Lane
Jalgaon
425001

Telephone

+919860066460

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarogyasparsh Chikitsalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aarogyasparsh Chikitsalay:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram