Nirdhar Yog Prabodhini

Nirdhar Yog Prabodhini समाजाच्या आरोग्यकरिता झटणाऱ्या योग श

समाजाच्या आरोग्याकरिता झटणाऱ्या योग शिक्षकांचा समूह म्हणजे ‘निर्धार योग प्रबोधिनी’ म्हणून अल्पावधीतच संस्थेची ओळख झाली आहे. संस्था जळगाव शहर तसेच परिसरातील अनेकांना योगाचे ज्ञान देवून योग साधना करवून घेत आहेत. तसेच व्यक्तिगत शिकवणी वर्गाच्या माध्यमातून घराघरात योग पोहचविण्याचा प्रयत्न करित आहे. तर उपचारात्मक योगाच्या माध्यमातून अनेक मानसिक तथा शारीरिक व्याधीग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहे, कोरोना रुग्णांवर योगाच्या माध्यमातून यशस्वी उपचार करण्यात संस्था यशस्वी झाली आहे.
संस्थेने जळगाव मधील पाहिले योग महाविद्यालय म्हणून आदिनाथ योग विद्यालयाची स्थापना केली आहे. यात एमए योगशास्त्र आणि डिप्लोमा कोर्स चालविण्यात येतो.

चला शिकूया योगसूत्र.. 'पातंजल योगसूत्र' प्रथम बॅच...🥇📖योगदर्शन..🧘🏻‍♂️हठप्रदीपिका, घेरण्ड संहिता आणि श्रीमद्भगवद्गीता ग्र...
19/12/2025

चला शिकूया योगसूत्र..
'पातंजल योगसूत्र' प्रथम बॅच...🥇📖

योगदर्शन..🧘🏻‍♂️

हठप्रदीपिका, घेरण्ड संहिता आणि श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाच्या यशस्वी निरुपणानंतर पातंजल योगसूत्र ग्रंथाची प्रथम बॅच'

'एक- एक सूत्र मराठी मधून
नेट-जेआरएफ (NET-JRF), Ph.D, YCB (सर्व लेव्हल), एम.ए.,एम.एस्सी(योगशास्त्र), डिप्लोमा आदी विषयात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त तसेच मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या दिव्य ज्ञानाची लालसा असणाऱ्या साधकांसाठी उपयुक्त कोर्स.

दि. 20 डिसेंबर 2025 पासून
दररोज
रात्री 9.00 ते 10.00 वा.

मार्गदर्शक
प्रा.कृणाल दि. महाजन

*गुरुदक्षिणा*
1001/- रु. मात्र

*अधिक माहितीसाठी संपर्क*
9209250555

*तस्माद्योगी भवार्जुन।* 🕉️चला जाणून घेऊया ..भगवंतांनी अर्जुनाला योगी होण्याचा सल्ला का दिला ?*'हठप्रदीपिका आणि घेरंड संह...
22/09/2022

*तस्माद्योगी भवार्जुन।* 🕉️

चला जाणून घेऊया ..
भगवंतांनी अर्जुनाला योगी होण्याचा सल्ला का दिला ?

*'हठप्रदीपिका आणि घेरंड संहिता या ग्रंथांच्या यशस्वी निरुपणानंतर श्रीमद्भगवद्गीता पहिली बॅच'*

विजयादशमीच्या (दसरा) शुभ मुहूर्तापासून योगी साधकाच्या दृष्टीने *‘श्रीमद्भगवद्गीता’* अध्ययन प्रारंभ होत आहे.
*श्लोक टू श्लोक* मराठी भाषेतून
(एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोक)
दिव्य ज्ञानाची लालसा असणाऱ्या साधकांसाठी उपयुक्त योगशास्त्रात एम.ए, एम.एस्सी, डिप्लोमा, Ph.D. आदी विषयात परीक्षा देणारे तसेच नेट परीक्षा क्वालिफाई होऊन प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या साधकांसाठी अत्यंत आवश्यक.
*मानवीय जीवनाला दिशा देणारे हे ज्ञान समजून घेण्यासाठी आपले स्वागत आहे.*

*प्रारंभ*
विजयादशमीचा शुभ मुहूर्त..
*दि.०५ ऑक्टोंबर २०२२ पासून*
*रोज - रात्री ८.३० ते ९.३० वा.*

*मार्गदर्शक*
योगाचार्य कृणाल महाजन
रिसर्च स्कॉलर (योग)

*गुरुदक्षिणा*
*१८०१/- रु. आहे मात्र*
प्रथम येणाऱ्या २० साधकांसाठी
*१५०१/-*

नंतर येणाऱ्या १० (३० पर्यंत) साधकांसाठी
*१७०१/-*

३० साधकानंतर येणाऱ्या सर्वांसाठी
*१८०१/-*
त्वरा करा आपली नोंदणी लवकरात लवकर करून घ्या आणि पैसे वाचवा..🙏🏻

*अधिक माहितीसाठी संपर्क*
9209250555

*जागतिक योग दिवस २०२२*🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️निर्धार योग प्रबोधिनीचे सचिव योगाचार्य श्री.कृणाल महाजन या...
14/06/2022

*जागतिक योग दिवस २०२२*
🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️

निर्धार योग प्रबोधिनीचे सचिव योगाचार्य श्री.कृणाल महाजन यांनी मुलाखत आकाशवाणीच्या *'लोकजागर'* या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.🎙️
सदर मुलाखत आकाशवाणीचे श्री.विजय भुयार यांनी घेतलेली आहे.

*प्रसारण* 📻
बुधवार, दि. १५ जून २०२२ रोजी
रात्री ९.०० वा.
आकाशवाणी जळगाव केंद्रावर.

आकाशवाणीचे जळगाव केंद्र ऐकण्यासाठी प्रसार भारतीचे अधिकृत ऍप खालील लिंकवर जाऊन डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews

त्यानंतर रेडीओवर क्लिक करून महाराष्ट्रातील केंद्रात जाऊन जळगाव केंद्र शोधावे.
जळगाव केंद्रावर क्लिक केले असता. आपल्याला नियोजित वेळी लोकजागर कार्यक्रमात योगाचे ज्ञान देणारी मुलाखत ऐकता येईल.🙏🏻

चला शिकूया ..🧘🏻‍♂️*'हठप्रदीपिका'**'यशस्वी पहिल्या बॅच नंतर दुसरी बॅच'* निर्धार योग प्रबोधिनीच्या माध्यमातून योगसाधकांसाठ...
20/05/2022

चला शिकूया ..🧘🏻‍♂️
*'हठप्रदीपिका'*

*'यशस्वी पहिल्या बॅच नंतर दुसरी बॅच'*

निर्धार योग प्रबोधिनीच्या माध्यमातून योगसाधकांसाठी तत्त्वज्ञानावर आधारित हठप्रदीपिका ग्रंथाचे अवलोकन करणारा ऑनलाईन कोर्स.

*श्लोक टू श्लोक* मराठी मधून
नेट-जेआरएफ (NET-JRF), Ph.D, YCB (सर्व लेव्हल), एम.ए.,एम.एस्सी(योगशास्त्र), डिप्लोमा आदी विषयात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त तसेच मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या दिव्य ज्ञानाची लालसा असणाऱ्या साधकांसाठी उपयुक्त कोर्स.

*दि.२२ मे २०२२ पासून*
*रोज - दू. ४ ते ५ वा.*

*मार्गदर्शक*
कृणाल दिलीप महाजन
रिसर्च स्कॉलर (योग)

*गुरुदक्षिणा*
५००/- रु. मात्र

*अधिक माहितीसाठी संपर्क*
9209250555

चला शिकूया ..🧘🏻‍♂️*'हठप्रदीपिका'*निर्धार योग प्रबोधिनीच्या माध्यमातून योगसाधकांसाठी तत्त्वज्ञानावर आधारित हठप्रदीपिका ग्...
15/04/2022

चला शिकूया ..🧘🏻‍♂️
*'हठप्रदीपिका'*

निर्धार योग प्रबोधिनीच्या माध्यमातून योगसाधकांसाठी तत्त्वज्ञानावर आधारित हठप्रदीपिका ग्रंथाचे अवलोकन करणारा ऑनलाईन कोर्स.

*श्लोक टू श्लोक* मराठी मधून
नेट-जेआरएफ (NET-JRF), Ph.D, YCB (सर्व लेव्हल), एम.ए.,एम.एस्सी(योगशास्त्र), डिप्लोमा आदी विषयात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त तसेच मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या दिव्य ज्ञानाची लालसा असणाऱ्या साधकांसाठी उपयुक्त कोर्स.

*दि.२१ एप्रिल २०२२ पासून*
*रोज - रात्री ९ ते १० वा.*

*मार्गदर्शक*
कृणाल दिलीप महाजन
रिसर्च स्कॉलर (योग)

*गुरुदक्षिणा*
५००/- रु. मात्र

*अधिक माहितीसाठी संपर्क*
9209250555

अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ, महाराष्ट्र*'श्रीमद्भगवद्गीता अध्याय सार'*हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ तिथीवर *'...
31/03/2022

अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ, महाराष्ट्र

*'श्रीमद्भगवद्गीता अध्याय सार'*

हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ तिथीवर *'श्रीमद्भगवद्गीता अध्याय सार'* याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
समस्त योगशिक्षक तथा भगवतप्रेमी यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा.

*प्रमुख वक्ते*
श्री.कृणाल दिलीप महाजन
रिसर्च स्कॉलर (योग)

शनिवार, दि.०२ एप्रिल २०२२ रोजी, सायंकाळी ०७ वा.

स्थळ : झूम मिटिंग
https://us02web.zoom.us/j/85185508483?pwd=aTF2aVVobXNqVGRNb2QzWHhiOWVIQT09

Meeting ID: 851 8550 8483
Passcode: 776647

*'विनीत'*
डॉ.मनोज निलपवार
प्रदेश अध्यक्ष
अ. भा. यो. महासंघ, महाराष्ट्र

18/03/2022

जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA.2 वेगाने प्रसारित होत आहे. तो भारतात येई पर्यंत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी 'योगसाधना' हा एकच पर्याय आहे..
'तस्माद्योगी भवार्जुना' म्हणत भगवान श्रीकृष्णांनी देखील अर्जुनाला अनेक दाखले देत योगी होण्याचा सल्ला दिला होता..
- आधुनिक योगी होण्यासाठी निर्धार योग प्रबोधिनी आपल्याला सादर निमंत्रित करीत आहे.
कृणाल महाजन
9209250555

*नेट पेपर-१ ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*📖🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️📖नमस्कार, *दिनांक २१ ते २९ मार्च २०२२* या कालावधी...
17/03/2022

*नेट पेपर-१ ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*
📖🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️📖
नमस्कार,
*दिनांक २१ ते २९ मार्च २०२२* या कालावधीत *ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.* सदर कार्यशाळा सर्व विषयाच्या नेट/सेट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि संशोधक यांच्यासाठी उपयुक्त आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यशाळेत नाव नोंदवून संधीचा लाभ घ्यावा..
*कार्यशाळेची वैशिष्ठे:-*
◆ तज्ञ मार्गदर्शक
◆ ऑनलाईन कार्यशाळा
◆ मर्यादित विद्यार्थी संख्या
◆ सराव परीक्षा
*नोंदणी प्रक्रिया:*
◆ कार्यशाळेसाठी १०००/- रु. प्रतिनोंदनी शुल्क राहील
◆ गुगल फॉर्म भरून शुल्क भरल्याची पावती दिलेल्या नंबरला पाठवावी
◆ एकदा भरलेला शुल्क परत दिला जाणार नाही.
◆ नोंदणी साठी अंतिम दिनांक : २१ मार्च २०२२.
◆ *नोंदणीसाठी लिंक:-*
https://forms.gle/JhzAf6jKgUJ95UnE7
----------------------------------------
◆ *शुल्क भरण्यासाठी गुगल पे / फोन पे क्रमांक* : ९२०९२५०५५५ / ९६०४००९९९७
----------------------------------------
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
◆ *श्री. कृणाल महाजन*
सचिव, निर्धार योग प्रबोधिनी, जळगांव
९२०९२५०५५५
◆ *श्री. हितेश ब्रिजवासी*
ग्रंथपाल
के.ए.के.पी संस्थेच वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगांव ९६०४००९९९७

निर्धार योग प्रबोधीनी कार्यशाळेतील सेट उत्तीर्ण झालेले विद्यार्थी / प्राध्यापकजानेवारी २०२२विषय : संस्कृत१. लिना पांडे :...
05/02/2022

निर्धार योग प्रबोधीनी कार्यशाळेतील
सेट उत्तीर्ण झालेले विद्यार्थी / प्राध्यापक
जानेवारी २०२२

विषय : संस्कृत
१. लिना पांडे :

विषय : मराठी
१. सौ. ज्योती बुवा
२. सौ. सीमा खडके

विषय : ग्रंथालय आणि माहितीशास्त्र
१. श्री. गणेश राठोड.
२. श्री. शशी पाटील.
३. कु. वैष्णवी अंबडे.
४. सौ. दीपाली येवले.
५. सौ. किशोरी मारटकर.
६. सौ. वैशाली उत्तमराव वाभळे (पवार).
७. सौ. अश्विनी शिंदे.
८. कु. नीलम चव्हाण.
९. कु. अर्चना कोरी.
१०. सौ. शोभा बाहेगांवकर
११. सौ. अश्विनी विनायक चिकाटे.
१२. श्री. संदीप केंद्रे

💐 सर्वांना हार्दीक शुभेच्छा आणि अभिनंदन...💐

महर्षी पतंजली शास्त्रोक्त आणि मंत्रोपचार युक्त शाळू मातीची मूर्ती..कृणाल महाजन यांच्या वैदिक योगा शॉपीमध्ये शाळू मातीची ...
20/01/2022

महर्षी पतंजली शास्त्रोक्त आणि मंत्रोपचार युक्त शाळू मातीची मूर्ती..

कृणाल महाजन यांच्या वैदिक योगा शॉपीमध्ये शाळू मातीची अत्यंत सुबक आणि सुंदर मूर्ती उपलब्ध आहे.
आपल्या योगा क्लास मध्ये ही मूर्ती स्थापन करून आपण महर्षी पतंजली यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करू शकतो.
शिवाय महर्षी पतंजली यांचे अधिष्ठान लाभले असता साधनेत गती प्राप्त होऊन साधकांना उच्चतम अनुभव प्राप्त होईल.

'प्रत्येक मूर्तीवर पतंजली स्रोताचे 108 आवर्तन करण्यात आले आहे'

किंमत
250/- मात्र

अधिक माहितीसाठी
9209250555
वैदिक योगा शॉपी
कृणाल महाजन, जळगाव

निर्धार योग प्रबोधिनीच्या ‘योगानुभूती – संचिताचा प्रवाह’ पुस्तकाचे प्रकाशननिर्धार योग प्रबोधिनी संचलित ध्वज प्रकाशनने सं...
29/12/2021

निर्धार योग प्रबोधिनीच्या ‘योगानुभूती – संचिताचा प्रवाह’ पुस्तकाचे प्रकाशन

निर्धार योग प्रबोधिनी संचलित ध्वज प्रकाशनने संपादित केलेले पहिले पुस्तक ‘योगानुभूती – संचिताचा प्रवाह’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे. सदर पुस्तकाचे प्रकाशन वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात संपन्न झाले. यावेळी अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ, महाराष्ट्राचा ‘महायोगोत्सव २०२१’ हा वार्षिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्यात संपूर्ण महाराष्ट्रातून ६०० योगशिक्षक सहभागी झाले होते.
संत जनार्दन स्वामी आश्रमाचे उत्तराधिकारी बालब्रम्हचारी श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर बालब्रम्हचारी भ्राता रामानंद महाराज, अ.भा.यो.महासंघाचे अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, उपाध्यक्ष राहुल येवला, मुख्य संपादक कृणाल महाजन, प्रकाशक ज्ञानेश्वर पाटील, डॉ. निलेश वानखडे, आश्रमाचे प्रशासकीय अधिकारी दिनेश भुतेकर उपस्थित होते.
योगानुभूती – संचिताचा प्रवाह’ या पुस्तकात योगविज्ञान शाखेतील महाराष्ट्रातील तब्बल २३ लेखकांचे रिसर्च आर्टिकल समाविष्ट करण्यात आले आहे. योगविज्ञान शाखेतील रिसर्च आर्टिकल असलेले हे पहिले पुस्तक आहे. रिसर्च आर्टिकल लिहिण्यासाठी लेखकांना प्रवृत्त करण्याहेतू ‘रिसर्च आर्टिकल कसे लिहावे’ याविषयावर कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले होते. ज्यात कृणाल महाजन यांनी PPT च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यातून २३ लेखकांनी प्रेरित होत अनुभवांती आर्टिकल लिहिले आहे.
सदर पुस्तकाचे संपादन जळगाव मधील कृणाल महाजन यांनी केले तर संपादकीय मंडळात नागपूर येथील बळवंत भोयर, नाशिक येथील राहुल येवला, पुण्यातील चंद्रज्योती दळवी, कल्याण येथील दिलीप गायकवाड आणि लातूर येथील संदीप पवार आदि तज्ञ मंडळींनी सहकार्य केले.

ऋतू बदलत आहे. त्यात वातावरण अस्थिर असून क्षणात बदलून त्याचे शरीरावर दुरोगामी परिणाम होतात. म्हणून ऋतूनुसार आहार, विहार आ...
25/11/2021

ऋतू बदलत आहे. त्यात वातावरण अस्थिर असून क्षणात बदलून त्याचे शरीरावर दुरोगामी परिणाम होतात. म्हणून ऋतूनुसार आहार, विहार आणि साधना अत्यावश्यक आहे .
यासाठी निर्धार योग प्रबोधिनी आपणास आवाहन करीत आहे की या बदलत्या ऋतूमध्ये अस्थिर वातावरणात स्वतःला स्थिर करा, 'साधनामस्त' अनुभवा'आणि निरोगी व्हा..
अधिक माहितीसाठी
कृणाल महाजन
9209250555

Address

Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nirdhar Yog Prabodhini posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nirdhar Yog Prabodhini:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category