24/03/2022
B/O रुबिना चुनावाला हे बाळ अमृत बालरुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर,जालना येथे 52 दिवसापासून ऍडमिट होते.
हेबाळ ऍडमिट करतेवेळी फक्त 630 ग्राम एवढ्या वजनाचे होते त्याच प्रमाणे फक्त 26-28 आठवड्यांचे Preterm- premature असे नवजात शिशु होते.
ऍडमिट करतेवेळी या बाळाची जगण्याची किंवा मरण्याची कुठलीही खात्री नव्हती तसेच प्री मॅच्युअर असल्याकारणाने श्वास घेण्यास त्रास, ऑक्सिजनची कमी भासत होती.
पालकांना डॉक्टरांना पूर्ण गॅरंटी देता येत नव्हती तरीही अमृत बालरुग्णालयातील डॉक्टर श्री संदीप सोनसळे सर त्याचप्रमाणे डॉक्टर श्री अमोल दह्याळकर सर यांनी ही जोखीम उचलली आणि पालकांकडे पैसे नसतानाही या बाळाला नीट करण्याची जबाबदारी घेतली.
तब्बल बावन्न दिवस हे बाळ अमृत बालरुग्णालयातील एन आय सी यु (NICU)मध्ये ऍडमिट होते.
याचे निदान- Preterm 26-28wks with ELBW with Severe HMD Gr IV with Sepsis with Neonatal Jaundice with Anemia with Ventilatory care with Neosurf surfactant given हे होते.
52 व्या दिवशी आज दिनांक 22/03/ 2022 रोजी या बाळाचे वजन सुमारे सोळाशे दहा (1610 gm)एवढे आहे तसेच हे बाळ सर्व प्रकारच्या धोक्यांपासून सुरक्षित आहे.
बाळाचा एवढा सुधार बघून त्याचप्रमाणे दोन्ही डॉक्टरांनी तसेच अमृत बालरुग्णालयातील सर्व स्टाफने घेतलेल्या मेहनतीला बघून तसेच अतिशय कमी फीज घेऊन बाळाला मृत्यूच्या मुखातून बाहेर काढलेले बघून पालक मात्र आनंदाने भारावून गेले.
या आनंदाने पालकांनी अमृत बालरुग्णालयातील डॉक्टर संदीप सोनसळे सर आणि डॉक्टर अमोल दह्याळकर सर तसेच नर्सिंग स्टाफ चा पुष्पहार आणि मिठाई देऊन सत्कार केला व आभार प्रकट केले.