15/09/2024
नित्या ऑर्थोपेडिक स्पाइन अँड ट्रॉमा सेंटर हॉस्पिटलमध्ये ८६ वर्षाच्या वृद्धे खुबा बदलण्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली.
या शस्त्रक्रियेमुळे या वयातही कसलाही आधार न घेता सक्षमपणे चालू शकणार आहे.
इचलकरंजी येथील चंपाबाई सकळे(वय ८६)पाय घसरून पडल्याने डाव्या बाजूचा खुबा पूर्णपणे निकामी झाला होता . सकले कुटुंबीयांना अनेकांनी वय जास्त आहे, गेल्या २५ वर्षांपासून एक मूत्रपिंड आणि दमा ऑपरेशन केले तर जीवास धोका निर्माण होऊ शकतो, या वयात यशस्वी शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. असा सल्ला दिला होता. मात्र चंपाबाई सकळे यांची इच्छाशक्ती कुटुंबाच्या पाठबळासोबत नित्या हॉस्पिटलचे डॉ अमरजित जगदाळे दिलेल्या विश्वासावर विश्वास ठेवून ८६ वयाच्या चंपाबाई सकळेयांनी नुकताच शस्त्रक्रिया करून घेतली. ४८ मिनिटाच्या अथक प्रयत्नांनंतर खूबाबदलण्याची यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केली.
अवघ्या दुसर्या दिवशी पेशंट यांनी शस्त्रक्रिया बद्दल समाधान व्यक्त केले. आज त्या पूर्वीप्रमाणे कुणाचाही आधार न घेता चालत आहेत.चंपाबाई सकळेकुटुंबीयांसह त्यांच्या अनेक नातेवाईकानी समाधान व्यक्त केले……