13/06/2023
C.P (forworded)
Hypertension - The silent killer
ब्लड प्रेशर वाढण्याचा त्रास असणे किंवा कधीकधी काही कारणाने ते वाढणे या गोष्टी आपण खूप साध्या समजतो. बीपी वाढलं? मग काय, सोपं आहे! बीपी ची एक गोळी सुरू करून टाकायची की काम झालं. परंतु हायपरटेन्शन हे अनेक आजारांचे मूळ आहे. Cardiovascular diseases चा ग्रुप, ज्यात हृदयाशी आणि रक्त वाहून नेणाऱ्या धमन्यांशी निगडित आजार गणले जातात, त्यात उच्च रक्तदाब सुद्धा गणला जातो! कारण साधा वाटणारा हा त्रास जर दुर्लक्षित राहिला तर अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देतो.
जागतिक डेटा सांगतो की पूर्ण जगात उच्च रक्तदाब असणाऱ्यांची संख्या आणि त्यामुळे हृदयरोग होणाऱ्यांची संख्या जलद गतीने वाढत आहे. आपली बदलेलेली जीवनशैली याला मुख्यत्वे कारणीभूत आहे. पुरेशी झोप नाही, दिवसभर कामात गुंतून राहणे, मेट्रो शहरातील कठीण प्रवास, खाण्याच्या पदार्थातील भेसळ, कामाचे वाढलेले तास आणि अशक्य जबाबदाऱ्या, कौटुंबिक तणाव, अशी अनेक कारणे रक्तदाब वाढण्यास जबाबदार आहेत.
नॉर्मल बीपी 120/80 असते. यातील 120 हे systolic BP म्हणजेच हृदय जेव्हा आकुंचन पावून झटक्यात प्रसारण पावते (म्हणजेच heart beat) तेव्हा या हालचालीमुळे रक्त धमनी मध्ये दबावाने पुढे ढकलले जाते. या वेळी जे रक्ताचे जे प्रेशर धमनी वर पडते ते म्हणजे systolic BP.
80 हे diastolic BP आहे. म्हणजेच दोन heart beat मध्ये जेव्हा हृदय क्षणिक विश्रांती घेते त्या वेळी आपोआप रक्ताचे धमनी वर पडणारे प्रेशर कमी होते.
हे दोन्ही आकडे प्रमाण मानले गेले आहेत. लहान मुलांमध्ये हेच प्रमाण 110/70 असू शकते. 130/90 हे रिडिंग हलक्या प्रमाणात उच्च रक्तदाबाची सुरुवात दर्शवते. याहून जास्त रिडिंग असेल तर तो खरोखरच उच्च रक्तदाब मानला जातो.
उच्च रक्तदाब कधी क्षणिक असतो तर कधी कायम राहतो. क्षणिक वाढणारा रक्तदाब काही विशिष्ठ कारणांनी वाढतो. जसे की अचानक टेन्शन येणे, खूप राग येणे, खूप रडू येणे, किंवा रात्रभर जागरण होणे. अशा वेळी वाढलेले बीपी काही काळाने पुन्हा नॉर्मल होते. याला रक्तदाबाचा आजार म्हणत नाहीत. मात्र असे सतत घडत राहिल्यास हा आजार होऊ शकतो. मला स्वतः ला रक्तदाबाचा आजार नाही. मात्र कधी काही कारणाने रात्रीची झोप लागलीच नाही, तर दुसऱ्या दिवशी बीपी वाढते. थोडा आराम केला की पुन्हा नॉर्मल होते. आराम म्हणजे केवळ शारीरिक आराम नव्हे! अशा प्रसंगी तणाव निर्माण करेल अशा गोष्टींपासून दूर राहणे, आवडीचे संगीत ऐकणे, हलकी फुलकी पुस्तके वाचणे किंवा टीव्हीवर काहीतरी विनोदी कार्यक्रम पाहणे असे सोपे उपाय सुद्धा खूप उपयोगी पडतात.
परंतु जेव्हा उच्च रक्तदाब कायम तसाच राहू लागतो तेव्हा मात्र तो मर्यादेत ठेवण्यासाठी गोळी सुरू करावी लागते.
कारण जर तो दुर्लक्षिला गेला तर मेंदू,हृदय, किडणी या अवयवांवर विपरीत परिणाम करतो. परिणामी ब्रेन स्ट्रोक, cardiac arrest, kidney failure असे आजार संभवतात.
Hypertension कमी करण्यासाठी जी diet therapy पूर्ण जगाने मान्य केली आहे ती म्हणजे DASH: Dietary Approach to Stop Hypertension
यात whole grains, भरपूर फळे आणि भाज्या, कमी मिठाचे पदार्थ, no processed food, low fat dairy products, योग्य प्रमाणात प्रोटीन्स, आठवड्यातून किमान पाच दिवस अर्धा तास aerobics/ cardio workout... यांचा समावेश होतो. तसेच वजन BMI range मध्ये ठेवणे अत्यंत आवश्यक असते. म्हणूनच खूप जास्त वजन असणाऱ्या पेशंट ना डॉक्टर वजन कमी करण्याचा सल्ला देतात.
उच्च रक्तदाब टाळण्यासाठी fast food, junk food यांचा वापर कटाक्षाने टाळावा. तसेच refined sugar, refined carbs जितके टाळता येतील तितके टाळावेत. अल्कोहोल चे प्रमाण कमीतकमी ठेवावे आणि smoking पूर्णपणे बंद करावे!
काही खास detox drinks, metabolism improvement, योग्य व्यायाम प्रकार, आहारात आणि एकूणच जीवनशैलीत बदल याद्वारे दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करणाऱ्या या silent killer ला दूर ठेवण्यात आपण यशस्वी होऊ शकतो.
लेख साभार🙏
दीप्ती मेस्त्री (certified आहारतज्ञ)