19/11/2025
WORLD COPD DAY
COPD (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज) हा फुफ्फुसांचा गंभीर, प्रगतीशील आणि पूर्णपणे बरा न होणारा आजार आहे. योग्य वेळी निदान व उपचार केल्यास आजारावर चांगले नियंत्रण ठेवता येते आणि जीवनमान सुधारू शकते.
मुख्य कारणे
✖️तंबाखू सेवन (धूम्रपान)
✖️चूलधुराचे प्रदूषण
✖️धूळ, रासायनिक धूर, कारखान्यातील प्रदूषण
✖️वारंवार होणारे श्वसनाचे इन्फेक्शन
लक्षणे
🛑सततचा खोकला
🛑कफाची निर्मिती
🛑श्वास घेण्यास त्रास / दम लागणे
🛑घरघर / छातीत घट्टपणा
प्रतिबंध
✅तंबाखू/धूम्रपान पूर्णपणे बंद करा
✅घरातील चूलधुरापासून संरक्षण
✅स्वच्छ व प्रदूषणमुक्त वातावरण
✅नियमित व्यायाम
✅पौष्टिक आहार
उपचार महत्वाचे का?
COPD पूर्णपणे बरा नसला तरी वेळेवर निदान, इनहेलर्सचा योग्य वापर, औषधोपचार आणि जीवनशैलीतील सुधारणा यांच्या मदतीने आजार नियंत्रणात ठेवता येतो.
COPD ची लक्षणे दिसल्यास विलंब न लावता डॉक्टरांचा सल्ला घ्या.