26/09/2025
नवरात्रीचे नऊ रंग 2025 – हिरवा
दिवस पाचवा रंग - हिरवा
नवरात्रीचे नऊ रंग 2025 मध्ये नवरात्रीच्या विशेष रंगांच्या यादीमधील पाचव्या क्रमांकाचा रंग आहे हिरवा. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी #देवी_स्कंदमातेची_पूजा केली जाते. तिला चार हात आहेत. त्यापैकी दोन हातात कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहे. तिला तीन डोळे आणि चमकदार रंग आहे. देवीने भगवान कार्तिकेय किंवा स्कंद आपल्या मांडीवर घेतले आहे, म्हणून तिला स्कंदमाता म्हणतात.
#नवरात्रोत्सव #नवरात्रीचे_नऊ_रंग_२०२५ #हिरवा #स्कंदमाता