18/09/2023
*काश्मीर मेडिकल मिशन Part 2*
मागील वर्षी झालेल्या मेडिकल प्रोजेक्ट मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर यावर्षी देखील दक्षिण काश्मीरमध्ये मेडिकल प्रोजेक्ट चे आयोजन करण्याचे निमंत्रण Govt of Jammu and Kashmir चे राज्यपाल महामहिम मा.मनोज सिन्हा यांच्या कडून आले... दिनांक 4 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2023 या कालावधी मध्ये या प्रोजेक्टचं आयोजन करण्यात आलं.
*अनंतनाग, पुलवामा, शोफियान व कुलगाम या चार जिल्हंया* च्या ठिकाणी या मेडिकल प्रोजेक्टचं नियोजन करण्यात आलं. जम्मू आणि कश्मीर सरकार तर्फे बरंचसं नियोजन करण्यात आलं तर रोटरी तर्फे आम्ही डॉक्टरांची टीम व काही volunteers सोबत या मेडिकल प्रोजेक्टमध्ये सहभागी झालो... डॉ. राजीव प्रधान (सोलापूर)व डॉ. गिरीश गुणे(पनवेल)यांच्या नेतृत्वाखाली आम्ही डॉक्टर्स काश्मीरमध्ये दाखल झालो... जम्मू आणि काश्मीर सरकार तर्फे आमच्या सर्व टीमची राहण्याची व खाण्याची सोय अतिशय उत्तम करण्यात आली होती.....
आम्हा डॉक्टरांची विभागणी चार टीम्स मध्ये करण्यात आली... आमची टीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय *अनंतनाग* येथे कार्यरत झाली.. शासकीय महाविद्यालय असल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज व स्टाफ वाईज हे रुग्णालय उत्कृष्टच होते... काश्मीरमधील वातावरणानुसार तेथील स्टाफ ची ड्युटी सकाळी दहा ते चार अशी बहुदा नियोजित केलेली होती, त्यामुळे आमचं काम सकाळी 10 नंतर सुरु व्हायचं व दुपारी चार पर्यंत संपायचं.
आमची राहण्याची सोय *ACHABAL या अनंतनाग* मधील एका भागामध्ये डाक बंगला (govt rest house) येथे करण्यात आली होती. शेजारीच तेथील प्रसिद्ध मुघल गार्डन होते... विविध रंगांच्या फुलांनी🌹, नटलेलं निसर्गाची अद्भुत देण असलेलं, खळखळणाऱ्या पाण्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे असं हे उद्यान होतं..
सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये थोड्याशा गोंधळानंतर आम्ही तेथील हॉस्पिटल स्टाफ व ऑपरेशन थेटर मध्ये बऱ्यापैकी स्थिरावलो होतो... OT चा स्टाफ अतिशय ट्रेंड असल्यामुळे ऑपरेशन करताना फारशा अडचणी जाणवल्या नाहीत , तरीदेखील, दुसऱ्या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थिती अनुरूप अड्जस्ट होणे, रिझल्ट मध्ये कुठलाही कॉम्प्रमाईज न होता तेथील रुग्णांना उत्कृष्ट दृष्टी देणे , याचे एक वेगळेच दडपण तिथे काम करताना होतं... काश्मीरमधील सर्वात संवेदनशील भागामध्ये आम्ही काम करत होतो सरकार तर्फे आमची व आमच्या टीमची सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जात होती.... बघता बघता दिवस निघत होते ,, दिवसेंदिवस ऑपरेशनचा आकडा वाढत चालला होता आणि आमच्या टीमची प्रसिद्धी ती देखील वाढत चालली होती .
*काश्मीर मधील जनतेने अतिशय भरभरून प्रेम या दहा दिवसात आम्हाला दिलं . बघता बघता ऑपरेशनचा आकडा बाराशेच्या वर गेला👍🏻👍🏻*
*ज्या कामासाठी साधारण चार ते सहा महिने लागले असते तेवढं काम आमच्या टीमने आठ ते नऊ दिवसात पूर्ण केलं*.... याचं कौतुक व नोंद तेथील सरकार व मीडियाने देखील घेतली... सर्वात जास्त शस्त्रक्रिया या मोतीबिंदूच्या करण्यात आल्या.. पाठोपाठ तिरळेपणा, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सरची ऑपरेशन, गर्भाशयाच्या पिशवीच्या ऑपरेशन, कान नाक घशाचे ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स, मणक्याचे ऑपरेशन , त्याचबरोबर फ्रॅक्चर्सचे देखील अनेक ऑपरेशन अतिशय यशस्वीरीत्या करण्यात आले... आमच्या टीम मध्ये सहभागी असलेल्या स्वयंसेवकांनी आम्हाला या दहा दिवसात अतिशय मोलाची साथ दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे...
या आठवड्यामध्ये खास जाणवलेली बाब म्हणजे येथे अस्वलाच्या हल्ल्याची (bear mauled injuries)अनेक रुग्ण या दरम्यान आम्हाला पाहायला मिळाले त्याचबरोबर त्यांचे ट्रीटमेंट देखील करण्यास आम्हाला संधी मिळाली....
*भारताच्या एकात्मतेसाठी आणि काश्मीरला मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक नवा संदेश या शिबिरा मार्फत जनतेस देण्याचा आमचा एक प्रयत्न व त्याला मिळालेली काश्मीरच्या जनतेकडून उदंड प्रतिसाद व भरभरून प्रेम याची शिदोरी गाठीशी बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो*...
आमच्या दहा दिवसाच्या वास्तव्यात जम्मू आणि काश्मीर सरकार व तेथील प्रशासन यांनी आमची घेतलेली काळजी तेथील जनतेने आमच्यावर दाखवलेला प्रेम व विश्वास हे कायम स्मरणात राहील... सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद... जय हिंद 🚩🙏🏻
Rtn Dr Rahul Phase, Karad..