Sane Guruji Emergency & Multispeciality Hospital in Tribal Area- Kinwat

  • Home
  • India
  • Kinwat
  • Sane Guruji Emergency & Multispeciality Hospital in Tribal Area- Kinwat

Sane Guruji Emergency & Multispeciality Hospital in Tribal Area- Kinwat Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sane Guruji Emergency & Multispeciality Hospital in Tribal Area- Kinwat, Hospital, Kinwat.

किनवट दुर्गम भागातील डॉ. अशोक बेलखोडे यांनी केल्यात १ लाख कुटुंब कल्याणाच्या शस्त्रक्रियाकिनवट: महाराष्ट्राच्या एका कोप-...
27/03/2024

किनवट दुर्गम भागातील डॉ. अशोक बेलखोडे यांनी केल्यात १ लाख कुटुंब कल्याणाच्या शस्त्रक्रिया

किनवट: महाराष्ट्राच्या एका कोप-यात आदिवासी एक बहूल तालुका विकासापासून दूर परीसर अंतराने मोठया शहरापासून दूर तसाचा विकासापासून दूर तसेच आरोग्य सुविधांपासून दूर व वंचीत म्हणुन ओळखला जातो. अशा दुर्गम व दुर्लक्षीत अविकसीत, पूर्वी नक्षलग्रस्त म्हणुन कुप्रसिध्द असलेल्या एकंदरीत अवघड अशा ठिकाणी डॉ. अशोक बेलखोडे यांनी (MS General Surgeon) मागील 30 वर्षापासून भारत जोडो युवा अकादमी, संचलित साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून निस्वार्थपणे अविरत आरोग्य सेवा देत आहेत.
डॉ. अशोक बेलखोडे मुळचे नागपूर जिल्हयातील कोतेवाडा या गावाचे रहिवासी, औरंगाबाद येथून MBBS व पुढे वैद्यकिय क्षेत्रातील MS पर्यंतचे उच्च शिक्षण घेउन तज्ञ डॉक्टर बनून आपल्या आरोग्य सेवा व कौशल्य केवळ वंचितासाठी उपयोगी पडाव्या या उदात्त हेतूने त्यांनी किनवट हे आपल्या आयुष्यभराचे कार्यक्षेत्र मानले. जेष्ठ समाजसेवक आदरनिय कर्मयोगी बाबा आमटे यांना ते आपले प्रेरणास्थान मानतात. तर लोकही त्यांना अलिकडे बाबांचे “मानसपुत्र” म्हणुन ओळखतात. डॉ. अशोक बेलखोडे यांनी बाबा आमटे यांना मरेपर्यंत किनवटलाच राहील असा शब्द देउन 1993 साली किनवटला आले व तेव्हापासून त्यांच्या अनेकविध सेवांचा महायज्ञ सुरु आहे.
अशा या निश्नांत व नि:स्वार्थ काम करणा-या जेष्ठ डॉक्टरने राष्ट्रीय कुटुंब कल्याण लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यक्रमात मोलाचा हातभार लावला असून आतापर्यंत त्यांनी 01 लाखावर शस्त्रक्रिया केल्याचा टप्पा ओलांडला आहे. नुकतेच दिनांक 23 मार्च 2024 रोजी औरंगाबाद तालुक्यातील गोलवट प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजीत केलेल्या भव्य कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीरात हा 01 लाखाचा टप्पा गाठला आणि ओलांडला देखील.
आज घडीला 100124 पर्यंत शस्त्रक्रिया डॉ. अशोक बेलखोडे यांच्या हातून झाल्या आहेत. त्यात जवळपास 36 हजार हया टाक्याच्या पारंपारीक शस्त्रक्रिया व उरलेल्या सर्व बिन टाक्याच्या म्हणजे दुर्बिणीद्वारे केलेल्या लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया आहेत. या सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना 2 लाख 25 हजार पेक्षा जास्त किलो मिटरचा प्रवास करावा लागला. या सर्व शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्रात, फारशा सुविधा उपलब्ध नसतांनाही पार पाडल्या आहेत. अगदी तळागाळातील ग्रामीण भागातील, वाडी वस्त्यावरील महिला/स्त्रीयांनी त्यांचा लाभ घेतला आहे. ख-या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्राला या अंत्यत महत्वाच्या व तज्ञांच्या सेवा डॉ. अशोक बेलखोडे यांच्या रुपाने मिळाला आहे. या 1 लाख स्त्रीयामध्ये अंत्यत अवघड आणि गुंतागुंतीच्या अशा सिझेरियन झालेल्या स्त्री लाभार्थी 9358 आहेत. त्यात फक्त लेप्रोस्कोपीनेच शक्य असणा-या (टाक्याची शस्त्रक्रिया शक्य नसलेल्या) 1500 स्त्रियांचा समोवश आहे. असे हे महान कार्य डॉ. अशोक बेलखोडे यांच्या हातुन घडले आहे.
आपण कधी आकडयांचा व संख्येचा विचार केला नाही उलट आपल्या हातुन चांगले काम घडत आहे. स्त्रीयाचे गरोदरपण व बाळंतपणाचा त्रास यातून त्यांची मुक्तता करीत आहे, ही भावना त्यामागे आहे असे प्रांजळ मत डॉ. अशोक बेलखोडे यांनी नम्रपणे व्यक्त केले आहे. एका दिवसात 100 शास्त्रक्रिया 132 वेळा, 200 शस्त्रक्रिया 36 वेळा, 300 शस्त्रक्रिया 08 वेळा तर अगदी पुर्ण 24 तासात एकूण 400 शस्त्रक्रिया 02 वेळा एवढे परीश्रम त्यांनी घेतले आहे. तर कधी 40, 42 कधी 50 किंवा त्यापेक्षाही जास्त लाभार्थ्यांची शस्त्रक्रिया एका दिवसाला त्यांनी केली असून आतापर्यंत साधारणपणे डॉ. साहेब 40 वेळा 90 वर आउट झाले आहेत. अशा प्रकारे अनेक शिबिरातून शास्त्रक्रिया केल्या आहेत.
मराठवाडयातील नांदेड जिल्हयातील 28 हजार शस्त्रक्रियेसोबत हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि परभणी व विदर्भातील वाशिम, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती जिल्हयातील मेळघाट भागातील चिखलदरा व धारणीचाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर शेजारच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद, उटनूर इत्यादी ठिकाणी जाऊन अनेकदा डॅक्टारानी या शस्त्रक्रिया केल्यात.
ह्या शस्त्रक्रिया करणे, आपल्या आनंदाचा भाग असून त्या आपण खुप मन लावुन करतो, त्यामुळे आपल्या हातुन सेवा घडते असे सांगत यामध्ये पुरुषाचा नगण्य सहभाग असणे, सीझर झालेल्या स्त्रीलाही पुढे करुन पुन्हा एकदा जोखीम पत्कारणे व पुरुषानी बाजूला राहणे, तसेच एवढेच काय आजारी अगदी हृदयरोग असलेल्या पत्नीच्या पतीने काही झाले तरी मी शस्त्रक्रिया करणार नाही असे म्हनणे, तसेच लवकर लग्न, लवकर बाळंतपण व 20 – 21 व्या वर्षी मुले बंद करण्याची शस्त्रक्रिया करणा-या स्त्रीयाची संख्या 50 टक्के पेक्षा जास्त इत्यादी बाबी आपले मन हेलावुन सोडते, अशी खंत डॉ. अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केली. सीझर झालेल्या स्त्रीयाच्या बाबतीत पतीने मुले बंद होण्याचे शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पुरुषांना करीत, गरज पडल्यास शासनाने त्यासाठी स्वतंत्र कायदा करावा असे त्यांनी सूचित केले.
दिनांक 23 मार्च 2024 रोजी गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथे शिबीरातील 42 व्या क्रंमाकावर असलेल्या सौ. आशा रामचंद्र साळूंखे 25 वर्ष राहणार गोलटगाव या महिलेची शस्त्रक्रिया करुन 01 लाखाचा पल्ला पूर्ण केला. विशेष म्हणजे त्या स्त्रीने एका अपत्यावर आपली शस्त्रक्रिया करुन घेतली. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. डॉ. लांजेवार यांनी शेकडो नातेवाईकांच्या व आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थित सत्कार करुन हा क्षण साजरा केला. आज पर्यंत हा आकडा 01 लाख 124 वर पोहोचला असून जमेल तोपर्यंत या शस्त्रक्रिया आपण करत राहू असे मनोगत डॉ. अशोक बेलखोडे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
या शस्त्रक्रिया क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा अलीकडच्या काळात अनेक अवघड अशा केसेसना झाला आहे. सिझेरियन झालेल्या लाभार्थी बरोबर लठ्ठपणा आहे म्हणून अनेक सर्जननेही नाकारलेल्या अतिलठ्ठ स्त्रियांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. साठ, सत्तर, ऐंशी किलोग्रॅम वजन असलेल्या स्त्रिया नेहमीच्याच झालेल्या आहेत. ब्यानव, अठ्यानाव, एवढेच काय शंभर पेक्षाही जास्त वजनाच्या अनेक स्त्रियांवर डॉ. अशोक यांनी शस्त्रक्रिया केली आहे. वैजापूर तालुक्यातील शिरूर या गावी अगदी एकशे नऊ किलोग्रॅम वजनाच्या एका स्त्रीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्याचे डॉ. आवर्जून सांगतात. अश्या स्त्रियांच्या पतीने पुढे होऊन स्वतः शस्त्रक्रिया का करू नये असा प्रति प्रश्नही ते करतात.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातून 1987 साली Master of Surgery (MS) शल्यचिकित्सक ही पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडले. तेथूनच त्यांच्या वैद्यकिय कारकीर्दीला सुरुवात झाली. पुढे नवी मुंबई, वर्धा, कोकणातील देवरुख, छत्रपती संभाजीनगर येथील पाचोड, जिकठान प्राथमिक आरोग्य केंद्र व पुढे मागील 30 वर्षापासून किनवट या आदिवासी भागात वास्तव्यास राहून विविध भागात फिरुन हया शस्त्रक्रिया केल्या व औरंगाबाद परिसरामध्येच हा 01 लाखाचा पल्ला गाठल्याबद्दल डॉ. अशोक बेलखोडे यांनी सांगितले. त्यावेळेस ते अतिशय भावुक झाले होते. त्यांच्या विद्यार्थी दशेतील हॅलो या वैद्यकिय विद्यार्थांच्या चळळीत आपण सक्रिय असतांना या परीसरात वैद्यकिय सेवेचे कार्य करतांना समाजसेवेची बिजे रुजली गेली त्यात याच गोलटगावला त्या काळात भेट दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगीतले. त्यावेळी कृषी रत्न, कृषीभूषण विजय अण्णा बोराडे, बॅरीस्टर जवाहर गांधी, डॉ.शशीकांत अहंकारी व गोलगावचे प्रगतीशिल शेतकरी सुदाम आप्पा सांळुके, पांडूरंग आण्णा सोळुंके इत्यादी मंडळी सोबत होती. या आठवणींना उजाळा त्यांना दिला.
या सर्व प्रवासात सर्जरी विभागातील त्यांचे गुरु डॉ. कांचन, डॉ. साठे मॅडम, डॉ. मलिक, डॉ बोरगावकर, डॉ. स्वामी, पुण्याचे डॉ. दाणी तसेच आरोग्य प्रशासनातील डॉ. कर्नाटकी, डॉ. सांळखे, डॉ. पी. पी. डोके, डॉ. डी. आर. डोके, डॉ. भांगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठाकूर, डॉ. सुरडकर, नांदेडचे डॉ. ना. रा. शिंदे, डॉ. कठारे, डॉ. बंदीअल्ली, डॉ. पेरगुलवार, डॉ. मेकाने, डॉ. बालाजी शिंदे, डॉ. सलमा हिराणी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर अशा अनेक जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अभार मानले.
नांदेड शिवाय हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, बुलढाणा, परभणी, लातूर, जालना, संभाजीनगर, इत्यादी ठिकाणचे जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, इतर वैद्यकिय अधिकारी यांचेही त्यांनी मनापासून आभार मानले.
विशेष म्हणजे सर्व शस्त्रक्रिया करुन घेणा-या सर्व स्त्रीया, त्यांचे पती, पुरुष, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मन वळवून माझ्यापर्यंत आनणारे मतप्रर्वतक, आशावर्कर, अंगणवाडीताई, सर्व स्त्री व पुरुष आरोग्य कर्मचारी, त्यांचेही या यशात मोठा वाटा असल्याचे डॉ. अशोक बेलखोडे यांनी नमूद केले.
भारत जोडो युवा अकादमी संस्थेतील माधव बावगे, डॉ. सविता शेटे, धर्मराज हल्लाळे, डॉ. शारदा कदम, प्रा. राम राठोड, अनिकेत लोहिया,डॉ. क्रांती रायमाने व इतर सहकारी सदस्य यांचे आभार मानले.
या सर्व शास्त्रक्रिया करतांना सदैव सहकारी म्हणुन असलेले मेहेरसिंग चव्हाण, आता अलीकडे श्री. नथ्थू भडांगे, परमेश्वर कदम, दम्मण्णा काका, वंदनाताई, सतत माझ्यासोबत राहणारी माझी आई स्वर्गीय शांताबाई, माझे काका भैयाजी बेलखोडे, वडील बंधु मुरलीधर बेलखोडे व सर्व बेलखोडे कुटुंबिय, कु. आश्विनी, कु. तेजस्वीनी, साने गुरुजी रुग्णालयातील सहकारी तसेच अहोरात्र प्रवास करुन सुखरुप घरी आनणारा माझा वाहन चालक श्री. अजिंक्य कयापाक यासह पूर्वीचे सर्व वाहनचालक, साने गुरुजी रुग्णालय परीवारातील सर्व सदस्य यांचेही त्यांनी मनापासून अभार मानले.
हा कार्यक्रम अधिकाधिक लोकाभिमूख व्हावा, त्याची गूणवत्ता वाढावी इत्यादी बाबतीत अनेक सूचना डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले व हा विषय वेगळया वेळी चर्चा करू असे ते म्हणाले. या अथक प्रवासात येणा-या अनंत अडचणी व त्यांनी त्यांचा केलेला सामना बाजूला ठेवून केलेली सेवा खरोखर वाखानण्यासारखी आहे. त्याबद्दल विचारले असता अडचणीचा पाढा काय वाचायचा असे सांगत त्यावर मात करावी असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
या शस्त्रक्रिया पार पाडल्याबद्दल लोकमत परिवार, महाराष्ट्र टाईम्स व ह इतर पत्रकार मित्रांनी हा पल्ला गाठल्याबरोबर डॉ. अशोक बेलखोडे यांची दखल घेउन अभिनंदन केले व आनंदात सहभागी झाले, त्यांचा उत्साह वाढवला व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शूभेच्या दिल्यात.
तसेच किनवट शहरातील व परीसरातील प्रतिष्ठीत नागरीक व मित्र परीवारांने डॉ. अशोक बेलखोडे यांचे अभिनंदन केले.

शंब्दाकन: डॉ. शिवाजी गायकवाड
27 मार्च 2024 किनवट

धन्यवाद
10/01/2023

धन्यवाद

02/01/2023
श्री. ……………………………..   दिनांक : 23 जुलै 2022 …………..प्रिय सुहृद, सस्नेह नमस्कार!आपण आमच्या किनवटच्या कामाबद्दल माहिती वाचू...
24/07/2022

श्री. …………………………….. दिनांक : 23 जुलै 2022
…………..
प्रिय सुहृद, सस्नेह नमस्कार!

आपण आमच्या किनवटच्या कामाबद्दल माहिती वाचून आम्ही हाती घेतलेल्या नवीन, भव्य, महत्वाकांक्षी अशा किनवट या आदिवासी भागातील भारत जोडो युवा अकादमी या संस्थेच्या “साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल” प्रकल्पाच्या उभारणीसाठी मनापासून आपण शुभेच्छांसह दान दिले.
दिनांक 12 जानेवारी 2020 रोजी सुप्रसिध्द समाजसेवक डॉ. सौ. मंदा वहिणी व डॉ. प्रकाश भाऊ यांच्या हस्ते भुमीपुजन केले आणि करोना काळातही आलेल्या असंख्य आव्हानांचा सामना करीत रूग्णालयाचे बांधकाम शेवटच्या टप्यात आलेले आहे. 12 हजार 750 चौरस फुटाच्या या बांधकामाचा आता शेवटचा स्लॅब सुरू आहे. 5-6 कोटीच्या या प्रकल्पाची अंदाजीत रक्कम ही आता कोरोना काळानंतर भरमसाठ वाढलेल्या बांधकाम साहित्याचा खर्च जवळपास 6-7 कोटी रुपयांवर गेला आहे.
आम्ही आपणांसारख्या दानशूरांच्या मदतीने जवळपास तीन कोटींचा निधी उभा केला आहे, प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी अजुनही प्रयत्न सुरूच आहेत. यात आपण उचललेला वाटा अत्यंत मोलाचा असा आहे. आपण सर्व मिळून हा प्रकल्प निश्चितच पुर्णत्वाला नेऊ असा विश्वास आहे. आपण व आपल्या परिचयातील दानशूरांना किनवटचा हा प्रकल्प साद घालतो आहे. आपली छोटीशी मदतही आम्हासाठी तितकीच महत्वपुर्ण व मौल्यवान आहे.
संस्थेला मिळणाऱ्या सर्व देणग्या 80 G व 12 A नुसार कर सवलतीस पात्र आहेत.

A/C Name--- BHARAT JODO YUVA ACADEMY
Bank---- State Bank Of India, Branch--- Kinwat, Dist-Nanded
A/C No.--- 11538748205 IFSC----------SBIN0020057


आपण एकदा किनवटच्या आमच्या प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट द्यावी असे मनापासुन वाटते, आपणांस आग्रहाचे निमंत्रण.
कृपया आपण केलेल्या मदतीचे विवरण 9822312214 या क्रमांकावर पाठवावी. जेणे करून आम्हाला योग्य नोंदी ठेवता येतील. धन्यवाद..!
आपला

डॉ. अशोक बेलखोडे
अध्यक्ष, भारत जोडो युवा अकादमी

*शिक्षण तज्ञ, आदरणीय प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले माजी कुलगुरू महोदयांनी भारत जोडो युवा अकादमीच्या साने गुरूजी कला महाविद्...
07/03/2022

*शिक्षण तज्ञ, आदरणीय प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले माजी कुलगुरू महोदयांनी भारत जोडो युवा अकादमीच्या साने गुरूजी कला महाविद्यालय, ईस्लापूर ता. किनवट जि. नांदेड च्या ग्रंथालयास एक हजार पुस्तकांची भेट दिली.*

डॉ. नागनाथ कोतापल्ले सर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे कुलगुरू,
अखिल भारतीय साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष,
जेष्ठ साहित्यीक, लेखक, समिक्षक,
असंख्य कार्यकर्त्यांचे पाठबळ, आधारवड, गुरू
अख्खे आयुष्य “कार्यकर्ता” म्हणुन जगणारे हे व्यक्तिमत्व.

साधारण महिण्याभरापुर्वी प्रा. डॉ. रामप्रसाद तौर सरांमार्फत निरोप आला – आपल्या कडील सर्व पुस्तके किनवट आदिवासी भागातील डॉ. बेलखोडे यांच्या साने गुरूजी महाविद्यालयास देऊत. हा धक्का नव्हता पण खूप खूप पराकोटीचा आनंद होता. सर व सरांसारख्या अनेकांनी माझ्या आयुष्यात – आमच्या कार्यात अनेक प्रकारे मदत केलेली आहे. पण या बाबतीत पुर्ण हयात पुस्तकांसाठी, पुस्तकांसोबत घालविणाऱ्या माणसाने आपल्या आयुष्याची कमाई “दान” म्हणुन द्यावी ही फार मोठी घटना आहे. असेच एकदा मिलींद महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे पालक प्रा. ल.बा. रायमाने काकांनी केले होते. त्यांचेकडील 1952 पासूनचे “साधनाचे” अंक त्यांनी याच महाविद्यालयासाठी घेऊन जा असा सातत्याने आग्रह करीत भेट म्हणुन दिलेत व साने गुरूजी महाविद्यालयाचे ग्रंथालय साने गुरूजींनी सुरू केलेल्या साधनाने समृध्द झाले.

तोच अनुभव आता येत होता. आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालय मोठे होणार व त्यात गुणवत्तापूर्ण अशा अनेक पुस्तकांची भर पडणार हा आनंद स्वस्थ बसू देत नव्हता.

दिनांक 02 मार्चला पुणे येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळ पुणेच्या साने गुरूजी रूग्णालयातर्फे डॉ. दादा गुजर यांच्या नावे असलेला पुरस्कार स्विकारण्यासाठी पुण्यास जाणे झाले आणि पुण्याच्या अगदी पश्चिमेकडे असलेल्या पिंपळे सौदागर स्थित कोतापल्ले सरांच्या घरी भेट घेण्याचे ठरले.

सर मात्र आता थकलेले वाटू लागले, मध्ये थोडे आजारीही होते. वयाचा तगादा तो असणारच. त्यांच्या “घर भर” असणाऱ्या पुस्तकांकडे पाहून “समृध्दीची उंची कशी असू शकते” याचा प्रत्यय आला. जिकडे तिकडे म्हणजे अगदी कपाटात, कपाटाबाहेर, पलंगावर ,पलंगाखाली आणि आम्हाला सहजगत्या नेता यावेत म्हणुन बाहेर काढून ठेवलेली हजार एक पुस्तके असे जिकडे तिकडे पुस्तकांचे साम्राज्य. मॅडमही तशा थकलेल्या दोघांनीही आमची आस्थेवाईकपणे विचारपूस करून गप्पा मारल्या. माझ्या सोबत अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, प्रा. डॉ. शारदा कदम (बहिर्जी महाविद्यालय, वसमत दोघेही भारत जोडो युवा अकादमीचे – सचिव, सहसचिव) सोबत नव्यानेच पीएच.डी. आवार्ड झालेल्या डॉ. सुवर्णा खोडवे, पुणे (ह्या पुणे विद्यापीठात कोतापल्ले सरांच्या विद्यार्थीनी ) इत्यादी होतो. पुस्तके गाडीत भरेपर्यंत सरांनी मनमोकळ्या गप्पा केल्या तोपर्यंत गाडीत पुस्तके भरल्या गेली अर्थात जेवढी गाडीत घेता आली तेवढीच घेतली. सोबत सरांनी एक पत्रही दिले, “पुस्तके भेट देत आहो” असे वगैरे ठिकच आहे पण “ही पुस्तके वाचून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील माणुसपण विकसीत व्हावे” या सदिच्छेसह ही पुस्तके देत आहे. हे वाक्य खूप महत्वाचे वाटले. या शुभेच्छांसहच भावी पिढीकडून असलेल्या अपेक्षाही त्यांनी लपवुन ठेवल्या नाहीत.

निरोप घेऊन फोटो सेशन करून निघतांनाच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय कौतिकराव ठाले सर व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रसिध्द कवियत्री अनुराधाताई पाटील या दोघांचीही भेट झाली आणि या भेटीने कोतापल्ले सरांच्या आजच्या भेटीचा आनंद शिगेला पोहोचला परतीच्या प्रवासात माझ्या विद्यार्थी दशेपासून व सरांच्या औरंगाबाद विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण मंडळाच्या प्रमुख असल्यापासूनच्या तर त्यांनी दिलेल्या किनवट भेटीपर्यंत, दिलेल्या व्याख्यानापर्यंत सर्व आठवणींचा प्रवाह सोबत होता.

सरांनी जवळपास हजार पुस्तके (927) भारत जोडो युवा अकादमीच्या साने गुरूजी कला महाविद्यालय, ईस्लापूरला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्याचा प्रयत्न केला आहे किती घ्यायचे ते आता आपल्या हातात आहे.
किनवट परिसरातील साहित्यप्रेमी व विद्यार्थ्यांच्या वतीने सरांचे मन:पुर्वक आभार व त्यांना दिर्घायुरोग्य मिळो यासाठी आभाळभर शुभेच्छा.

Please Extend your Helping Hand to construct this Hospital in Tribal Area ....
04/01/2022

Please Extend your Helping Hand to construct this Hospital in Tribal Area ....

Construction of Sane Guruji Emergency & Multispeciality Hospital in Tribal Area- Kinwat is in progress....We appeal you ...
27/11/2021

Construction of Sane Guruji Emergency & Multispeciality Hospital in Tribal Area- Kinwat is in progress....
We appeal you all to contribute...
as per your wish & will.....

Dr Ashok kinwat 9822312214

18/10/2021
सौ. मुक्ता मिलींद भुजबळे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!सौ. मुक्ता Computer Engineer, सध्या मु.पो. ठाणे; ॲङ मिलीं...
21/08/2021

सौ. मुक्ता मिलींद भुजबळे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सौ. मुक्ता Computer Engineer, सध्या मु.पो. ठाणे; ॲङ मिलींद भुजबळे, कंपनी अर्थ सल्लागार यांच्या सुविद्य पत्नी मुळ पुर्ण नाव मुक्ता सुमनताई मनोहरराव मदनकर. मु. कोतेवाडा पो. गुमगाव ता. हिंगणा जि. नागपूर. अत्यंत गरीब परिस्थीतीत शिक्षण घेऊन कॉम्पुटर इंजीनीयर पर्यंतचा तिचा अथक, अमर्याद शैक्षणिक प्रवास परिवारातील व परिसरातील अनेकांना प्रेरणा देणारा आहे. माहेरी अत्यंत कष्टाळू, शांत स्वभावाचे लहानश्या सरकारी नोकरीत समाधान मानणारे पांडूरंग भक्त मनोहरराव आणि थोडी शिक्षीत पण काटकसरीत घर चालविणारी आई सुमनबाई यांचे संस्कार लाभलेली हीच मुक्ता. पुढे इंजीनियर बनुन आता आयटी क्षेत्रात काम करते आहे.

मुक्ताची आई म्हणजे सुमनताई ही कोतेवाडाच्याच बेलखोडे कुटुंबातली – सुमन शांताबाई वामनराव बेलखोडे. मुले लहान असतांनाच म्हणजे अगदी तिच्या वयाच्या अठ्ठावीस – तिसाव्या वर्षी अगदी भाऊबीजेच्या दिवशी तिचे अपघाती निधन झाले. रस्यायावर असलेल्या गतीरोधकामुळे दुचाकीवरून त्या पडल्यात व डोक्याला मार लागला. त्यामुळे मुक्ताचे मातृछत्र अगदी लहानपणीच हिरावल्या गेले. वडील मनोहररावांनी मात्र सर्व मुला-मुलींचा सांभाळ केला, त्यांना शिकविले, स्वत:च्या पायावर उभे केले.

वर्ध्याचे पर्यावरणतज्ञ व वृक्ष लागवड व संवर्धन यात अनेकांच्या ओठावर असलेले नाव म्हणजे मुरलीधर बेलखोडे (अध्यक्ष, निसर्ग सेवा समिती) आणि किनवटचे जेष्ठ समाजसेवक व साने गुरूजी रूग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे आणि भावडांची मुक्ता ही भाची. (सुमनताईंची मुलगी) मुक्ता व मिलींद यांनी दोन तिन महिण्यापुर्वीच किनवटच्या प्रकल्पाला भेट दिली होती.

किनवटला बांधकाम सुरू असलेल्या भारत जोडो युवा अकादमीच्या साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या बांधकामावर त्यांनी भेट देऊन आनंद व्यक्त केला. रूग्णालय परिसरात नियोजीत नातेवाईकालय (रूग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा)उभारण्याच्या प्रक्रियेला पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी केला.

साने गुरूजी रूग्णालय परिवारातर्फे सौ. मुक्ता मिलींद भुजबळे यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…!

साने गुरूजी रूग्णालय परिवारातील सर्वात लहान सदस्या कु. तेजस्वीनी वंदना ज्ञानेश्वर उईके हिचा आज वाढदिवस एम.आय.डी.सी. येथी...
21/08/2021

साने गुरूजी रूग्णालय परिवारातील सर्वात लहान सदस्या कु. तेजस्वीनी वंदना ज्ञानेश्वर उईके हिचा आज वाढदिवस एम.आय.डी.सी. येथील बांधकाम सुरू असलेल्या साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या परिसरात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.

साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या 12000 स्के.फु.चे पहिल्या टप्याचे बांधकाम पुर्ण झाल्याचे निमीत्ताने ...
18/08/2021

साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या 12000 स्के.फु.चे पहिल्या टप्याचे बांधकाम पुर्ण झाल्याचे निमीत्ताने तसेच वृक्षमित्र श्री. मुरलीधर बेलखोडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतनाच्या निमीत्ताने साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल एम.आय.डी.सी. या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी मा. आमदार भिमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, तहसिलदार श्री. उत्तम कागणे, माजी नगराध्यक्ष, इसाखान सरदार खान, के.मुर्ती, वनपरीक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, विनायक खैरनार, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, अजय नेम्मानीवार, नगरसेवक अजय चाडावार, मुख्याद्यापक कैसर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

17/08/2021

pls have a look

Address

Kinwat

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sane Guruji Emergency & Multispeciality Hospital in Tribal Area- Kinwat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sane Guruji Emergency & Multispeciality Hospital in Tribal Area- Kinwat:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category