25/12/2021
वाफ घेण्याची पद्धत . . .
सध्या कोरोना बरोबरच सर्दी, नाक गच्च होणे, छाती भरणे, डोके गच्च होणे अशा इतर आजारांचे ही भरपूर लक्षणे सर्वत्र आढळून येत आहेत. त्यासाठी प्रत्येक वेळी औषधांचा मारा उपयोगी ठरेल असे नाही. किती औषध घ्यायची यालाही नियम आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने वाफ घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काही शास्त्रीय नियम पाळून वाफ घेतल्यास, त्याची उपचारासाठी खूप चांगली मदत होते.
१) प्रथमतः वाफेचे मशीन जे ब्युटी पार्लर मध्ये फेशियलसाठी वापरतात. त्यामध्ये पूर्ण डोळ्या खालचा भाग, नाक, तोंड, हनुवटी पर्यंतचा भाग व्यापला जाईल अशा पद्धतीने वाफ देतात. असे वाफेचे मशीन घ्यावे. नंतर त्यात सांगितलेल्या पद्धतीने पाणी घालून व गरजेनुसार दोन ते पाच थेंब निलगिरी तेलाचे किंवा विक्स किंवा अमृतांजन टाकावे.
२) मशीन चालू करून वाफ येऊ द्यावी. डोळे मिटून येणारी वाफ नाक तोंड याद्वारे मोठ्याने आत बाहेर घ्यावे. सुरुवातीला 30 ते 40 सेकंद नंतर एक मिनिट पर्यंत घ्यावी.
३) मशीन बंद करून एक दोन मिनिट थांबावे परत वरील प्रमाणे एक मिनिट वाफ घ्यावी, असे गरजेनुसार पाच ते दहा वेळा करावे. ही झाली एक वेळेची वाफ. अशी आवर्तने पहाटे, सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान , संध्याकाळी पाच ते सहा आणि रात्री असे दिवसातून चार वेळा घ्यावेत. यामुळे घशातील कफ मोकळा होतो. घसा नाक स्वच्छ होतो.
अगदी लहान मुले, वयोवृद्ध, गरोदर स्त्रिया, डोळ्यांचे आजार असलेले व इतर चेहऱ्याचे आजार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखात्री अशाप्रकारे वाफ घ्यावी.
(*टिप - मशीन कोणत्याही मेडिकल दुकानात मिळते. नसेल तर घरी एका भांड्यात गरम पाणी करून,अशी वाफ घेता येईल.)
श्री.अशोक रोकडे,
व्हाईट आर्मी,
जैन बोर्डिंग कोविड सेंटर,
दसरा चौक, कोल्हापूर,
मो. नं. ९८५००७९८०१