18/10/2025
*आज (आश्विन कृ. १२ - १८ ऑक्टोबर) धनत्रयोदशी / धन्वंतरी जन्मोत्सव...*
धनत्रयोदशीचा दिवस हा दीपावलीचा दुसरा दिवस. या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदीचे दागिने खरेदी करणे विशेष शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते, समृद्धी येते आणि देवी महालक्ष्मी प्रसन्न होते, असे हिंदू धर्मशास्त्रात म्हटले आहे.
पौराणिक कथेनुसार, याच दिवशी देवांचे वैद्य मानले गेलेल्या भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्रमंथनादरम्यान झाला होता. भगवान धन्वंतरी यांनीच जगाच्या कल्याणासाठी अमृतसदृश औषधांचा शोध लावला होता. सध्याचे वैद्य आणि डॉक्टर हे भगवान धन्वंतरीचे शिष्य मानले जातात. कारण, ते योग्य प्रकारे रुग्णांवर औषधोपचार, शल्यक्रिया करतात. वास्तविक उत्तम आरोग्य ही माणसाची सर्वांत मोठी संपत्ती, धनच आहे. धनत्रयोदशीला ‘धन्वंतरीची पूजा, आराधना केल्याने उत्तम आरोग्याची प्राप्ती होते, असे मानले जाते.
धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जन्मोत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#धनत्रयोदशी #श्रीलक्ष्मी #धन्वंतरी_जन्मोत्सव #पूजन #शुभेच्छा