04/04/2023
Extd. 25-12-1999
Do For Nation Die for Nation
Non. Government Organization Jeevan-Mukti Seva Sanstha National Calamities Disaster Management Team
WHITE ARMY
चैत्र पोर्णिमा जोतिबा यात्रा ०५ एप्रिल २०२३
जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मी च्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जोतिबा यात्रेनिमीत्त भाविकांसाठी विविध सामाजिक सुविधा
कोल्हापूर - राष्ट्रीय पातळीवर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत काम करणा-या जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मी वतीने चैत्र पोर्णिमा यात्रा बादी रत्नागिरी येथे दिनांक ०५ एप्रिल २०१३ रोजी होणा-या जोतिबा यात्रेवेळी येणान्या भाविकांना तसेच प्रशासनाला मदत करण्यासाठी व्हाईट आर्मी तर्फे विविध सामाजिक उपक्रम व आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत दि. ०३.०४.२०२३ ते ०७.०४.२०२३ या कालावधीत संस्थेने गेली १६ वर्षे जोतिबा डॉगर येथे खालील सुविधा यात्रेकरूंना देण्यात येणार आहे.
जीवनमुक्ती व्हाईट आर्मी हॉस्पीटल प्रत्येक वर्षा प्रमाणे संस्थेमार्फत २४ तास आणि ४/५ दिवस येणा-या भाविकांना सुसज्ज अशा वातानुकूलीत हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध उपचार करण्यात येणार आहेत. गेल्या सोळा वर्षापासून ३९,२०० भाविकांना याचा लाभ झाला आहे. या सुसज्ज हॉस्पीटलमध्ये ६ बेट असणार असून सर्व प्रकारच्या औषध उपचाराची सोय करण्यात आली आहे. तसेच किरकोळ टाके घालण्यासाठी ऑपरेशन सेंटर सेंटर व्यवस्था करणेत आली आहे.
डॉक्टर सेवा जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मी च्या वतीने जोतिया भाविकांसाठी हॉस्पिटल उमे करण्यात आले आहे. सलग ५ दिवस सुरु राहणा-या या हॉस्पिटलमध्ये तीन शिपट चौविस (२४) तास काम चालू राहणार आहे. यामध्ये अॅस्टर आधार हॉस्पीटलचे एक वैद्यकिय पथक औषधे व अॅम्ब्यूलन्ससह यात्राकाळात दिवसभर मदत करणार आहे तसेच जनरल प्रॅक्टीसनर्स असोसिएशन, होमिओपॅथीक डॉक्टरांची निहा संघटना, KMA, निमा करवीर, कोल्हापूर मुस्लिम डॉक्टर्स असो., केडीजीपीए असोसिएशन असे १०० डॉक्टरांची टिम काम करणार आहे. या डॉक्टर पथकाचे नेतृत्व डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. राजेश सातपूते, डॉ. शिवराज देसाई, डॉ. हरिष नांगरे, डॉ. दिपक पोवार, डॉ. अरुण धुमाळे व डॉ. बदरुद्दीन मणेर, डॉ. हर्षवर्धन जगताप हे करणार आहेत.
रेस्क्यू टिम संस्थेच्या वतीने मंदिराच्या जवळ रेस्क्यु टिम वायरलेस सेट सहित तैनात करण्यात येणार आहे. प्रामुख्याने या टिमव्दारे भाविकांना रांगेत मंदिरात प्रवेश देणे, भाविकांना सुलभ व जलद दर्शन, मदतकार्य, मार्गदर्शन, दर्शनरांग व्यवस्था, गर्दिवर नियंत्रण तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेणे.
आपत्कालिन कक्ष (कंट्रोल रूम) अचानक येणाया आपत्तीचा सामना करण्यासाठी एक विशेष अशी आपत्कालिन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यात्रेच्या कालावधीत ही टिम संपूर्ण देवस्थान, यमाईदेवी मंदिर, सेंट्रल प्लाझा याठिकाणी कार्यरत राहणार आहे. याचा समन्वय पोलीस नियंत्रण कक्ष व देवस्थान समिती सोबत असणार आहे.
हार्ट ब्रिगेड यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आणि हृदय रोग असणा यांना दिलासा म्हणून हार्ट बिग्रेड ची सोय करण्यात आली आहे. यासाठी विशेष डॉक्टरांची टिम तयार करण्यात आली आहे. तसेच ऑक्सीजन सिलेंडर प्राणवायूद्ध व्यवस्था करण्यात आली आहे
रूग्णवाहिका - यात्रेमध्ये होणा.या गोंधळ लक्षात घेवून अचानक मोठी घटना घडली तर योग्य त्या सोईसाठी व्हाईट आर्मी संचलित करवीर निवासिनी अंबाबाई इक्कदार श्री पुजक मुडळाची अॅम्युलन्स, व्हाईट आर्मी इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन यात्रे दरम्यान मदतीसाठी तैनात केली आहे. यामधून पेशंटना तात्पूरता उपचार घेवून सी. पी.आर. हॉस्पीटल कोल्हापूर येथे अॅडमिट करता येईल याची व्यवस्था केली आहे.
शोध मोहिम - यात्रेकाळात गर्दीमुळे लहान बालके, वयोवृध हरविण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणीही व्यक्ती अथवा लहान मुले हरवले तर ते शोधण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या मदतीने विशेष पथक तयारी करण्यात आले आहे. हरविलेल्या व्यक्तींनी अथवा मुलांनी संस्थेच्या आपत्कालीन कक्ष (कंट्रोल रूम) शी संपर्क करावयाचा आहे. तसेच पालकांनी सुध्दा त्वरीत हरवल्याची नोंद करावी. याचा समन्वय पोलीस नियंत्रण कक्ष व देवस्थान समिती सोबत असणार आहे..
विश्रांती गृह / हिरकणी कक्ष चार दिवस चालणा. या या यात्रेत संस्थेच्या वतहीने अशक्त भाविकांना विश्रांती गृह उभारण्यात आले आहे. दमछाक होत असलेल्या रुग्णांची सुध्दा यामध्ये सोय केली आहे. तसेच याठिकाणी हिरकणी कक्ष देखील गरोदर मातांसाठी गैरसोय होते म्हणून हिरकणी कक्षाची सोय केली आह
पत्रकार परिषदेला व्हाईट आर्मीचे अध्यक्ष श्री अशोक रोकडे, अष्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ.शिवराज देसाई, जीपीए अध्यक्ष डॉ राजेश सातपुते , सचिव डॉ. हरीश नांगरे, डॉ. दीपक पोवार उपस्थित होते
जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मी कोल्हापूर.
जीवन मुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मी, कोल्हापूर. आपत्ती व्यवस्थापन कार्यालय
१६५८ 'C' वार्ड, गंजी गल्ली, छ. शिवाजी चौक, कोल्हापूर. मो. ९८५००७९८०१ ९२७२०९०९०९.
Email:-ashokwhitearmy@gmail.com, www.jeevanmukti.org