Krystal Scan kolhapur

Krystal Scan kolhapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krystal Scan kolhapur, Hospital, Kolhapur.

कोल्हापुरातील सर्वात विश्वासार्ह डायग्नोस्टिक सेंटर अशी ख्याती मिळविलेल्या ‘क्रिस्टल स्कॅन’ लवकरच नवीन जागेत स्थलांतरीत ...
06/12/2025

कोल्हापुरातील सर्वात विश्वासार्ह डायग्नोस्टिक सेंटर अशी ख्याती मिळविलेल्या ‘क्रिस्टल स्कॅन’
लवकरच नवीन जागेत स्थलांतरीत होत आहे. विख्यात रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिजित मगदूम, डॉ. हृदयनाथ कोगेकर, डॉ. साकेत माने आणि सेवाभावी कर्मचाऱ्यांच्या बळावर आम्ही नव्या जागेत सर्व प्रकारची सोनोग्राफी, सिटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे, फिटल इमेजिंग याबरोबरच ‘एमआरआय’ अशा सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत.

नवीन पत्ता : रॉयल मिराज आर्केड, क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २, रेल्वे स्टेशनसमोर, कोल्हापूर.

क्रिस्टल स्कॅन, कोल्हापूर
सि. स. क्र. १२३७/क, अप्पर ग्राउंड फ्लोअर शॉप,
मिसाळ प्राईड, शाहू मिल ते इंडियन ऑईल पेट्रोल पंप रोड,
बागल चौक, कोल्हापूर – ४१६००८
मो. 86864 66464

आज (मार्गशीर्ष पौर्णिमा - ४ डिसेंबर) श्री दत्त जन्मोत्सव...मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत...
04/12/2025

आज (मार्गशीर्ष पौर्णिमा - ४ डिसेंबर) श्री दत्त जन्मोत्सव...

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्तात्रेयांचा जन्मोत्सव साजरा होतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती वाढल्या होत्या. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी विविध रूपांत दत्तात्रेयांना अवतार घ्यावा लागला. त्यानंतर आसुरी शक्ती नष्ट झाल्या.

दत्तात्रेय हा शब्द ‘दत्त’ व ‘आत्रेय’ या शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि ‘आत्रेय’ म्हणजे अत्री ऋषी व माता अनसूयेचा पुत्र. श्री दत्तात्रेय हे श्री ब्रह्मा, विष्णू आणि शंकरांचे एकत्रित रुप आहे. आजच्या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्तात्रेयांची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्री दत्तात्रेयांना मनोभावे वंदन... त्यांची कृपा सर्वांवर राहो, हीच प्रार्थना...
‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’

#श्रीदत्तप्रभू #श्रीदत्त_जन्मोत्सव #अत्री_ऋषी #माता_अनसूया #गुरुचरित्र #नमन

19th November, International Men’s Day !International Men’s Day, observed every year on 19th November, celebrates men’s ...
19/11/2025

19th November, International Men’s Day !

International Men’s Day, observed every year on 19th November, celebrates men’s valuable roles in families, communities, and society. It encourages open conversations about men’s health, emotional well-being, and the unique challenges they often face, including stress, expectations, and mental health struggles. This day honors fathers, sons, brothers, and mentors while promoting positive masculinity and true gender balance for a healthier, more supportive world.

कोल्हापुरातील सर्वात विश्वासार्ह डायग्नोस्टिक सेंटर अशी ख्याती मिळविलेल्या ‘क्रिस्टल स्कॅन’ने आपल्या ५ व्या वर्धापनदिनान...
13/11/2025

कोल्हापुरातील सर्वात विश्वासार्ह डायग्नोस्टिक सेंटर अशी ख्याती मिळविलेल्या ‘क्रिस्टल स्कॅन’ने आपल्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष सवलत योजना जाहीर केली. रुग्णांना सिटी स्कॅनच्या तपासणी शुल्कात ५०० ते १००० रु. इतकी सवलत देणाऱ्या योजनेची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर होती.

मात्र, आता रुग्णांच्या आग्रहानुसार या योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. ही सवलत योजना आता १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

रुग्णांनी या योजनेचा फायदा घ्यावा.

क्रिस्टल स्कॅन, कोल्हापूर
सि. स. क्र. १२३७/क, अप्पर ग्राउंड फ्लोअर शॉप,
मिसाळ प्राईड, शाहू मिल ते इंडियन ऑईल पेट्रोल पंप रोड,
बागल चौक, कोल्हापूर – ४१६००८
मो. 86864 66464

05/11/2025

बऱ्याचदा अज्ञान आणि बेपर्वाईमुळे रुग्ण सोनोग्राफीचा निर्णय घेण्याबाबत अनास्था दाखवतात. मात्र, याचा दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. याबाबत काही ‘केस’चा दाखला देत ‘क्रिस्टल स्कॅन’मधील विख्यात रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिजित मगदूम यांनी उपयुक्त माहिती सांगून मार्गदर्शन केले आहे.

क्रिस्टल स्कॅन, कोल्हापूर
सि. स. क्र. १२३७/क, अप्पर ग्राउंड फ्लोअर शॉप,
मिसाळ प्राईड, शाहू मिल ते इंडियन ऑईल पेट्रोल पंप रोड,
बागल चौक, कोल्हापूर – ४१६००८
मो. 86864 66464

कोल्हापुरातील सर्वात विश्वासार्ह डायग्नोस्टिक सेंटर अशी ख्याती मिळविलेल्या ‘क्रिस्टल स्कॅन’ने आपल्या ५ व्या वर्धापनदिनान...
25/10/2025

कोल्हापुरातील सर्वात विश्वासार्ह डायग्नोस्टिक सेंटर अशी ख्याती मिळविलेल्या ‘क्रिस्टल स्कॅन’ने आपल्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. आता रुग्णांना सिटी स्कॅनच्या तपासणी शुल्कात ५०० ते १००० रु. इतकी सवलत मिळणार आहे. ही सवलत योजना १५ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

रुग्ण फोनवरून अपॉइंटमेंट घेऊ शकतात. या योजनेचा फायदा घ्या.
क्रिस्टल स्कॅन, कोल्हापूर
सि. स. क्र. १२३७/क, अप्पर ग्राउंड फ्लोअर शॉप,
मिसाळ प्राईड, शाहू मिल ते इंडियन ऑईल पेट्रोल पंप रोड,
बागल चौक, कोल्हापूर – ४१६००८
मो. 86864 66464

आज (कार्तिक शुद्ध प्रतिपदा – २२ ऑक्टोबर) बलिप्रतिपदा /दिवाळी पाडवा...दीपावलीच्या पावन पर्वातील आजचा कार्तिक शुद्ध प्रतिप...
22/10/2025

आज (कार्तिक शुद्ध प्रतिपदा – २२ ऑक्टोबर) बलिप्रतिपदा /दिवाळी पाडवा...

दीपावलीच्या पावन पर्वातील आजचा कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा ‘बलिप्रतिपदा’ आणि ‘दिवाळी पाडवा’ म्हणून साजरा केला जातो. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ याच दिवशी होतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूने वामन रूप धारण करून राजा बळीला पाताळात पाठवले होते. बळीराजाच्या औदार्याने प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला दरवर्षी पृथ्वीला भेट देण्याची परवानगी दिली. त्यामुळे या दिवशी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना केली जाते.

बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. या दिवशी व्यापारी नव्या वह्यांचे पूजन करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात. सोने, चांदी, हिरे, वाहन खरेदी, नवीन व्यवसायाची सुरुवात आणि नवीन गृहप्रवेशासाठी हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. घरोघरी सकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेटवस्तू देतो. अशा प्रकारे अत्यंत उत्साहात हा सण साजरा केला जातो.

सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा...

#पाडवा #बलिप्रतिपदा #शुभेच्छा #शुभमुहूर्त

आज २० ऑक्टोबर... क्रिस्टल स्कॅनचा ५ वा वर्धापनदिन...आज क्रिस्टल स्कॅन आपला पाचवा वर्धापनदिन साजरा करीत आहे. पाच वर्षांपू...
20/10/2025

आज २० ऑक्टोबर... क्रिस्टल स्कॅनचा ५ वा वर्धापनदिन...

आज क्रिस्टल स्कॅन आपला पाचवा वर्धापनदिन साजरा करीत आहे. पाच वर्षांपूर्वी कोल्हापुरात सुरू झालेल्या क्रिस्टल स्कॅनने अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने ‘अचूक निदान' आणि 'वेळेत सेवा' देत हजारो रुग्णांना योग्य निदान आणि उपचारांची दिशा देण्यात साहाय्य केले. अर्थात, यात रुग्णांचे सहकार्य आणि पाठबळ मोठे होते. आमच्या कर्मचाऱ्यांनीही या काळात आम्हाला मोलाची साथ दिली.
आज सहाव्या वर्षांत पदार्पण करीत असताना या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद...

‘क्रिस्टल स्कॅन’ने आपल्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. आता रुग्णांना सिटी स्कॅनच्या तपासणी शुल्कात ५०० ते १००० रु. इतकी सवलत मिळणार आहे. ही योजना १५ ऑक्टोबर ते १५ या नोव्हेंबर या कालावधीत सुरु राहणार आहे.

रुग्ण फोनवरून अपॉइंटमेंट घेऊ शकतात. या योजनेचा फायदा घ्यावा.

क्रिस्टल स्कॅन, कोल्हापूर
सि. स. क्र. १२३७/क, अप्पर ग्राउंड फ्लोअर शॉप,
मिसाळ प्राईड, शाहू मिल ते इंडियन ऑईल पेट्रोल पंप रोड,
बागल चौक, कोल्हापूर – ४१६००८
मो. 86864 66464

आज (२० ऑक्टोबर) नरकचतुर्दशी / दीपावली...दीपावली... हिंदू धर्मियांचा सर्वांत मोठा सण... कुप्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीच...
20/10/2025

आज (२० ऑक्टोबर) नरकचतुर्दशी / दीपावली...

दीपावली... हिंदू धर्मियांचा सर्वांत मोठा सण... कुप्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून ‘दीपांचा उत्सव’ अर्थात ‘प्रकाशोत्सव’ म्हणून साजरा करण्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. दीपावली / दिवाळी या शब्दांतच मांगल्य, उत्साह भरलेला आहे. या चैतन्यदायी दीपोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.

आज नरक चतुर्दशीचा दिवस... भगवान श्रीकृष्णांनी त्रिभुवनाला आत्यंतिक त्रास देणाऱ्या नरकासुराचा वध आजच्या दिवशी केला. श्रीकृष्णांनी नरकासुराला अंत्यसमयी 'तुझ्या मृत्यूचा दिवस हा ‘नरकचतुर्दशी’ म्हणून ओळखला जाईल', असे वरदान दिले होते. नरक चतुर्दशी हा सण अभ्यंगस्नान, देवांचे पूजन, श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण करून, आप्तेष्टांच्या गाठीभेटी घेऊन आणि गोडधोड पदार्थांचे सेवन करून साजरा केला जातो. या चतुर्दशीला ‘रुपचतुर्दशी’ तसेच छोटी दिवाळी असेही संबोधले जाते.

नरकचतुर्दशी आणि दीपावलीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...

#दीपावली #नरकचतुर्दशी #भगवान_श्रीकृष्ण #पूजन #शुभेच्छा

आज (आश्विन कृ. १२ - १८ ऑक्टोबर) धनत्रयोदशी / धन्वंतरी जन्मोत्सव...धनत्रयोदशीचा दिवस हा दीपावलीचा दुसरा दिवस. या दिवशी दे...
18/10/2025

आज (आश्विन कृ. १२ - १८ ऑक्टोबर) धनत्रयोदशी / धन्वंतरी जन्मोत्सव...

धनत्रयोदशीचा दिवस हा दीपावलीचा दुसरा दिवस. या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदीचे दागिने खरेदी करणे विशेष शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते, समृद्धी येते आणि देवी महालक्ष्मी प्रसन्न होते, असे हिंदू धर्मशास्त्रात म्हटले आहे.

पौराणिक कथेनुसार, याच दिवशी देवांचे वैद्य मानले गेलेल्या भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्रमंथनादरम्यान झाला होता. भगवान धन्वंतरी यांनीच जगाच्या कल्याणासाठी अमृतसदृश औषधांचा शोध लावला होता. सध्याचे वैद्य आणि डॉक्टर हे भगवान धन्वंतरीचे शिष्य मानले जातात. कारण, ते योग्य प्रकारे रुग्णांवर औषधोपचार, शल्यक्रिया करतात. वास्तविक उत्तम आरोग्य ही माणसाची सर्वांत मोठी संपत्ती, धनच आहे. धनत्रयोदशीला ‘धन्वंतरीची पूजा, आराधना केल्याने उत्तम आरोग्याची प्राप्ती होते, असे मानले जाते.

धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जन्मोत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#धनत्रयोदशी #श्रीलक्ष्मी #धन्वंतरी_जन्मोत्सव #पूजन #शुभेच्छा

17/10/2025
04/10/2025

सोनोग्राफी मशीनमुळे विविध गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजाराचे अचूक निदान करणे शक्य होते. ज्या वेळी डॉक्टर सोनोग्राफी करण्याबाबत सुचवितात, त्या वेळी पेशंटने सोनोग्राफीसाठी कोणती पूर्वतयारी करावी, याबाबत ‘क्रिस्टल स्कॅन’मधील विख्यात रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिजीत मगदूम यांनी माहिती दिली आहे.

या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये टेस्ट करण्यासाठी रुग्ण फोनवरून अपॉईंटमेंट घेऊ शकतात.

क्रिस्टल स्कॅन, कोल्हापूर
सि. स. क्र. १२३७/क, अप्पर ग्राउंड फ्लोअर शॉप,
मिसाळ प्राईड, शाहू मिल ते इंडियन ऑईल पेट्रोल पंप रोड,
बागल चौक, कोल्हापूर – ४१६००८
मो. 86864 66464

Address

Kolhapur
416003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krystal Scan kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category