Shivaji University, Kolhapur

Shivaji University, Kolhapur Shivaji University, established in 1962, is named after the Great Maratha Warrior and founder of the Maratha empire Chhatrapati Shivaji.

Shivaji University was founded primarily to cater to the regional aspirations which has now geared up to transcend this regional image and emerging as one of the premier institutes of higher education and research in India It was inaugurated on 18th November, 1962 by Dr. Radhakrishnan, the then President of India. One of the major objectives behind foundation of this University was to cater to the regional needs of South Maharashtra. The jurisdiction of the University is spread over three districts viz. Kolhapur, Sangli and Satara with strength of about 2,00,000 students studying in 225 affiliated colleges and recognised institutes. This region of Maharashtra boasts of rich and varied socio-cultural heritage. Under the innovative and socially reformist leadership of Chhatrapati Shahu Maharaj, the princely ruler of Kolhapur, the city had become at the beginning of this century, a focal point of educational opportunities for all classes and communities of South-Western Maharashtra, and northern parts of neighbouring Karnataka. This is also land of Karmaveer Bhaurao Patil, who struggled for taking education to the masses by his innovative 'Earn and Learn' scheme. When the University was founded by the Shivaji University Act of 1962, the objectives set before the University included making opportunities of higher education accessible to rural youth, conducting fundamental and applied research in the field of science and humanities to ensure regional growth and development. In 1962 the University started functioning with 34 affiliated colleges and about 14000 students with 5 Post-graduate Departments on the campus. Today the number of affiliated colleges has gone upto 225 and students strength upto 2,00,000 with 34 Postgraduate Departments on campus. The University imparts education in 10 major faculties of Arts, Social Science, Science, Commerce, Education, Fine Arts, Law, Medicine, Ayurvedic Medicine, Engineering and Technology. During initial two decades the efforts were concentrated on expansion of higher education and foundation of new colleges in different parts in the four districts under its jurisdiction. The University consolidated its base in this phase by 'taking education to the people'. The decade of 1980s saw a major expansion, especially the growth of professional faculties like Engineering, Education, Management and Medicine. The recent phase of the University can be termed as "a pursuit of academic excellence". Since last 4-5 years, several attempts are being made to overcome the image of University as a regional University. Several steps have been taken to raise the standards of teaching and research so as to measure upto global standards. This is being achieved by exploring new areas of higher learning and research in rapidly emerging fields like Industrial Chemistry, Space Science, Environmental Science, Bio-Chemistry, Sericulture, Polymer Chemistry and Computer Science, in addition to basic science disciplines. The University Department of Physics has been recently identified by UGC for its Special Assistance Programme and recognised as Department of Research Support. New research areas in these departments are Super conductors Energy, Bio-diversity and Bio-technology. The University has also established the University-Industry Interaction Cells in three districts. The faculties of Arts and Social Sciences are also gearing up to meet the demands of changing time. Establishment of Centre for Women's Studies and extension activities through Adult and Continuing Education and Shramik Vidyapeeth are indicators of this change. Department of Economics has been selected by UGC for its Special Assistance Programme. Departments of Sociology, Education, Geography, Physics and Economics are offering special courses in emerging areas like Environmental Science is also functioning actively.

अभिमानास्पद.. ❤️💐💐
02/04/2021

अभिमानास्पद.. ❤️💐💐

शिवाजी विद्यापीठ ५५ वा पदवीदान समारंभ: निवेदन
04/10/2018

शिवाजी विद्यापीठ ५५ वा पदवीदान समारंभ: निवेदन

मराठीच्या संवर्धनाची संधी - शिवाजी विद्यापीठ बनणार "ज्ञानमंडळ"============================================माझे मराठीची ब...
17/01/2017

मराठीच्या संवर्धनाची संधी - शिवाजी विद्यापीठ बनणार "ज्ञानमंडळ"
============================================
माझे मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
हे संत ज्ञानेश्वरांचे बोल सार्थ ठरवत ‘मराठी’ भाषेतील ज्ञान संवर्धनाच्या, विस्ताराच्या प्रक्रियेने काहीशी गती घेतली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणाच्या सुरू असलेल्या प्रकल्पात लोक सहभागाचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न चालवला आहे. विश्वकोश निर्मिती मंडळाने आखलेल्या धोरणानुसार महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे, साहित्य क्षेत्रातील संस्थांना या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात आले आहे. ‘ज्ञानमंडळ’ या संकल्पनेच्या माध्यमातून विद्यापीठे, साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामवंत संस्था या प्रकल्पाशी जोडल्या जातील. मंडळातर्फे निर्मिती केल्या जाणाऱ्या विश्वकोश खंडांमधील नोंदींचे अद्ययावतीकरण, विविध विषयांवरील नव्या माहितीची भर टाकणे हे या ज्ञानमंडळांचे उद्दिष्ट असेल. त्यातही प्रत्येक उपविषयासाठी स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन करण्याची दूरदृष्टी महामंडळाने दर्शविली आहे. नंतरच्या टप्प्यात सर्व ज्ञानमंडळे परस्परांशी जोडणे व त्या आधारे विश्वकोशाची पुढील रचना करणे, हा उद्देश मंडळाचा आहे. त्यासाठी संबंधित संस्था आणि महामंडळ यांच्यात ‘सामंजस्य करार’ करण्याची प्रकिया सध्या सुरू आहे.

मुंबई विद्यापीठ, डेक्कन इन्स्टिट्यूट, नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या संस्थांशी जोडून घेण्यात आले आहे. याच प्रक्रियेअंतर्गत शिवाजी विद्यापीठात आधुनिक इतिहास, राज्यशास्त्र आणि मराठी साहित्य या तीन विषयांची ज्ञानमंडळे स्थापन करण्यात आली आहेत. शिवाजी विद्यापीठ या उपक्रमात आधुनिक इतिहास, राज्यशास्त्र आणि मराठी साहित्य या विषयांत ज्ञानमंडळ म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. त्यासाठीचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला.

विश्वकोश निर्मिती मंडळ मराठी विश्वकोशाच्या २० खंडांधमधील नोंदींचे अद्ययावतीकरण करीत आहे. या प्रक्रियेत कालबाह्य झालेल्या नोंदींची निश्चिती केली जाणार आहे. याशिवाय, विद्यमान नोंदींचे पुनर्लेखन, नव्या नोंदी लिहून घेणे असे काम केले जाणार आहे. यात विविध विषयांचा समावेश असेल. प्राथमिक टप्प्यातील या कामानंतर जगभरातील अद्ययावत माहितीच्या आधारे नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली जाईल. त्यासाठी आता स्थापन करण्यात येत असलेली ज्ञानमंडळे ही महत्त्वाची ठरतील. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ज्ञानमंडळ असे धोरण मंडळाचे आहे. सर्व ज्ञानमंडळे मराठी विश्वकोशाशी जोडली जावीत असा प्रयत्न मंडळाचा आहे.मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या संस्थांची निवड करणे, त्यांना ज्ञानमंडळ म्हणून आपल्याशी जोडून घेणे हा ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंकलन आणि ज्ञानसंवर्धन यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्ञानमंडळांच्या माध्यमातून मराठी विश्वकोश निर्मितीसाठी माहितीची देवाण-घेवाण होईलच, मात्र त्यातून समाजही जोडला जाईल हे निश्चितच महत्त्वाचे. मराठी विश्वकोशाच्या ज्ञानमंडळ या प्रक्रियेत शिवाजी विद्यापीठाने मराठी, इतिहास आणि राज्यशास्त्र या तीन विषयांशी स्वतःला जोडून घेतले आहे. तिन्ही अधिविभागांच्या माध्यमातून ज्ञानाचे आदान-प्रदान, अद्ययावतीकरणासाठीचे काम चालणार आहे.

आजच्या घडीला पसरलेले नवतंत्रज्ञान आणि ज्ञानाची वाढत असलेली व्याप्ती, होत असलेला विस्तार लक्षात घेता मराठीच्या संवर्धनाला एका गतीची आवश्यकता होती. जागतिक स्तरावर विविध ज्ञानशाखांमध्ये प्रचंड ज्ञानभांडार उपलब्ध आहे. फक्त गरज आहे ती, हे ज्ञान मराठी भाषेत आणण्याची. त्यासाठी विविध विद्यापीठांमधील, सामाजिक, साहित्यिक संस्थांमधील तज्ज्ञांना सामावून घेण्याचा विश्वकोश निर्मिती मंडळाचा उपक्रम हे एक पुढचे पाऊल म्हटले पाहिजे. यातून मराठी भाषेत ज्ञानाचे नवे भांडार खुले होलच, शिवाय त्या-त्या ज्ञानशाखेतील संस्थांचा संवाद आणि लोकसहभाग वाढणार आहे. ज्ञानाच्या आदान-प्रदानासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

05/12/2016
30/08/2016

विद्यापीठाच्या जलसंधारण कामांची राज्य शासनाकडून दखल
========================================
शिवाजी विद्यापीठाने कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली आहेत. त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. जलसंधारणातून केलेल्या कामांच्या अहवाल राज्य सरकारने मागितला असून, त्याचे सादरीकरण राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांच्यासमोर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कधी नव्हे ते विद्यापीठाला पाणी टँकरने पाणी घ्यावे लागले. याआधीही दुष्काळस्थितीवर मात करण्यासाठी विद्यापीठाने तलाव खोदले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे हे सर्व तलाव आटले होते. यावर्षी विद्यापीठाने युद्धपातळीवर जलसंधारणाची कामे राबवली.

सलग दोन वर्षे कमी पाऊसमानामुळे सर्वत्र भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. जिल्ह्यातील शेतीक्षेत्राबरोबरच विद्यापीठालाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. त्यामुळे दरवर्षी मार्च, एप्रिलमध्ये महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा जानेवारीपासूनच सुरू करावा लागला होता. टंचाईचा सर्वाधिक फटका बॉटनिकल गार्डनला बसला होता. देशभरातील दुर्मिळ वनस्पतींचे जतन करण्यासाठी विद्यापीठाला त्यामुळे चांगलीच कसरत करावी लागली होती.

संकट हीच संधी मानून यातून कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी विद्यापीठाने उपलब्ध पाण्याचे स्रोत बळकट करण्याबरोबरच नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेतली. सुमारे साडेसहा लाख रुपये खर्च करुन विद्यापीठ परिसरातील विहिरींचा गाळ काढण्याबरोबरच संरक्षक भिंतीचे कामही करण्यात आले. या कामामध्ये अनेक वर्षे गाळाने भरलेल्या विहिरीही पुनरुज्जीवित करण्यात आल्या. एनएसएसच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या कॅम्पच्या माध्यमातून आयोजन करुन शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली. त्याचा फायदा यावर्षी झालेल्या पावसात झाला. या सर्व ठिकाणी सुमारे ३० कोटी लिटर पाणी विद्यापीठक्षेत्रात जमा झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या पाणीटंचाईपासून विद्यापीठाची सुटका होणार आहे. जलसंधारणाची कामे करणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील एकमेव अकृषी विद्यापीठ ठरले आहे.

विद्यापीठाच्या या कामाची माहिती राज्य पातळीवर देण्यासाठी ट्रीपल अॅकॅडमिक ऑडिट अँड अॅक्रिडीशन कमिटीने अहवाल तयार केला आहे. पुढील आठवड्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. अहवालाबरोबर जलसंधारणाच्या कामाची सचित्र पुस्तिका तयार करण्याचेही काम सुरू झाले आहे.

24/08/2016

शिवाजी विद्यापीठात सामूहिक राष्ट्रगीत गायन
================================
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात ७५०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला आणि आपल्या राष्ट्रप्रेमाची प्रचिती दिली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे विद्यापीठात सकाळी ११ वाजता "आझादी ७० - याद करो कुर्बानी" या उपक्रमांतर्गत सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाने केलेल्या आवाहनाला विद्यार्थी-विद्यार्थिनींसह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवकांसह नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे साडेसात हजारांहून अधिक लोक या प्रसंगी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात उपस्थित राहिले.

विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. एन.व्ही. चिटणीस, निखील भगत, अंजली निगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल पोतदार, स्नेहल पाटील, आरुषा पाटील या विद्यार्थिनींनी 'हम होंगे कामयाब..' आणि 'ऐ मेरे वतन के लोगों...' ही गीते सादर केली. मधुसुदन शिखरे (हार्मोनियम) व दीपक दाभाडे (तबला) यांनी संगीतसाथ केली. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन केले.

यावेळी विद्यापीठात 'ग्यान' उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेसाठी आलेले रशियाचे प्रा. डी. सोकोलो यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, एनएसएस समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभागप्रमुख पी.टी. गायकवाड यांच्यासह अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर - ५३ वा दीक्षान्त समारंभ जाहीरात* महत्वाच्या तारखा:३ जुलै २०१६ ते ३१ ऑगष्ट २०१६ - नियमित शुल्...
26/07/2016

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर - ५३ वा दीक्षान्त समारंभ जाहीरात

* महत्वाच्या तारखा:
३ जुलै २०१६ ते ३१ ऑगष्ट २०१६ - नियमित शुल्क रु. २५०/-
१ सप्टेंबर २०१६ ते १५ सप्टेंबर २०१६ - विलंब शुल्क रु. ३५०/-
१६ सप्टेंबर २०१६ ते ३१ सप्टेंबर २०१६ - अतिविलंब शुल्क रु. ८५०/-

ही पोस्ट शेअर करुन अधिकाधिक मित्रांना कळवा.

कोल्हापूरच्या देवयानी हालकेची UPSC त बाजी; ५७६ वा क्रमांक ===========================================कोल्हापूर येथील कणे...
13/05/2016

कोल्हापूरच्या देवयानी हालकेची UPSC त बाजी; ५७६ वा क्रमांक
===========================================
कोल्हापूर येथील कणेरकर नगर परिसरातील देवयानी हालके युपीएससी परीक्षेत यशस्वी झाली. तिला ५७६ वी रँक मिळाली आहे. पहिल्या प्रयत्नात तिने पूर्वपरीक्षा पास केली तर दुसऱ्या प्रयत्नात ती मुलाखतीपर्यंत पोहोचली.

देवयानीचे शालेय शिक्षण प्रिन्सेस इंदुमतीदेवी गर्ल्स हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेजमध्ये झाले. सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये कॉम्प्युटर विषयात बीई केल्यानंतर ती इन्फोसिसमध्ये रूजू झाली. मुळातच हुशार असलेली देवयानी दहावीत ९४ टक्के तर बारावीत ९६ टक्के गुण मिळवून बोर्डात आली होती. इन्फोसिसमध्ये नोकरी करत असतानाच तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरूवात केली. मात्र नोकरी आणि अभ्यास यांचे वेळापत्रक जुळेना झाले तसे तिने इन्फोसिससारख्या नोकरीचा राजीनामा देण्याचे धाडसी पाऊल उचलले. त्यानंतर मात्र सेल्फ स्टडीवर भर देत देवयानीचा पुण्यात अभ्यास सुरू झाला. तिसऱ्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले. देवयानी सांगते, 'दोन प्रयत्नात आलेल्या अपयशातूनच मी शिकले. कोणत्या त्रुटी राहत आहेत आणि कशी सुधारणा केली पाहिजे, याचा विचार केला आणि त्या अनुषंगाने अभ्यास सुरू ठेवला आणि यश मिळाले.'

सांगलीच्या शिवम दत्तात्रय धामणीकर यानेही गुणवत्ता यादीत ९३४ वा क्रमांक मिळवत स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे.

अमोघ थोरात यांचे यश प्रेरणादायी; युपीएससी परीक्षेत ९६६ वा क्रमांक=============================================='सर्वसाधा...
13/05/2016

अमोघ थोरात यांचे यश प्रेरणादायी; युपीएससी परीक्षेत ९६६ वा क्रमांक
==============================================
'सर्वसाधारण परिस्थितीतून मोठे यश संपादन करणाऱ्या अमोघ थोरात यांचे यश विद्यापीठामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत' असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काढले. विद्यापीठाच्या सेवापूर्व मार्गदर्शन केंद्राचा विद्यार्थी अमोघ थोरात यांच्या सत्कारप्रसंगी कुलगुरु डॉ. शिंदे बोलत होते.

अमोघने युपीएससी परीक्षेत ९६६ व्या क्रमांकास यश संपादन केले. विद्यापीठाच्या सेवापूर्व मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. जगन कराडे यांच्यासह अमोघने कुलगुरू डॉ. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्याचा शाल, स्मृतीचिन्ह व राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ देवून सत्कार करण्यात आला. अमोघ याने 'माझ्या यशामध्ये विद्यापीठाच्या सेवापूर्व मार्गदर्शन केंद्राच्या मार्गदर्शनाचा महत्त्वाचा वाटा आहे. मी स्वयं अधयानातून यश मिळवले आहे. २०१० पासून आतापर्यंत एक ते सहा गुणांच्या फरकाने युपीएससीमधील गुणांकन हुकले. पण संयम राखून सातत्यपूर्ण प्रयत्नांनी यश साध्य केले. याचा मोठा आनंद आहे' अशी प्रतिक्रिया अमोघ थोरातने व्यक्त केली.

शंखपुष्पीतून वाढते हिमोग्लोबिन - शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्र विभागाचे संशोधन====================================श...
10/05/2016

शंखपुष्पीतून वाढते हिमोग्लोबिन - शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्र विभागाचे संशोधन
====================================
शंखपुष्पी वनस्पतीची पाने आणि फुलांचे रोज सेवन केल्यास महिलांमधील हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते, असे संशोधन ‌शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्र विभागाने केले आहे. या प्रयोगावर अधारित संशोधन पेपर अमेरिकन व युरोपियन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. आहारातील कमी प्रथिनांमुळे अनेकांमध्ये हिमोग्लोबिन व कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. विशेषतः १२ ते ४० वयोगटातील मुली व महिलांमध्ये ही समस्या दिसून येते. यावर शंखपुष्पीचा चांगला उपयोग होतो.

शंखपुष्पी वनस्पती सर्वत्र आढळते. आयुर्वेदामध्ये तिची मुळे, बीया आणि पानांचा ब्रेन टॉनिक म्हणून वापर केला जातो. हे महत्त्व ओळखून वनस्पतीशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका वर्षा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती देशमुख यांनी संशोधन पेपर तयार केला. तो अमेरिकन जर्नल 'फार्मासिटीकल रिसर्च'मध्ये 'स्टडीज ऑफ क्लायटोरिया टर्नेटिया' नावाने तर युरोपियन जर्नल ऑफ एक्स्प्रेमिंटल प्रायव्होजन- २०१४ मध्ये 'हिमॅटोलॉजिकल पॅरॉमिटकल ऑफ इंडियन गोट्स पेड ड्राइड टायटेरिया यूज बेस्ड डाएट' नावाने प्रसिद्ध झाला आहे.

या वनस्पतीची कोवळी पाने खाल्यास हिमोग्लोबिन वाढते. जास्त दिवसांच्या पानांचे चूर्ण घेतल्यास कॅल्शियम व हिमोग्लोबिन वाढत असल्याचा निष्कर्ष देशमुख यांनी काढला आहे. कॅल्शियम, आयर्न, झिंक, पोटॅशियम या मूलद्रव्यांसोबत मोठ्या प्रमाणात 'अ' व 'ब' जीवनसत्व असल्याचेही आढळून आले आहे. पानामधील क्युरासिटीन घटक फुप्फुसाच्या कॅन्सरवर गुणकारी असल्याचा निष्कर्ष काढला आहे. गायी व शेळ्यांना चारा म्हणून तिचा वापर केल्यास दूध उत्पादनातही भरपूर वाढ होऊन जनावरे सुदृढ होण्यास मदत होईल, असाही दावा देशमुख यांनी केला आहे.

असे झाले संशोधन:

शंखपुष्पीचे औषधी गुणधर्म ओळखण्यासाठी शेळ्यांवर प्रयोग केले. चार किलोच्या प्रत्येकी तीन शेळ्यांचे तीन ग्रुप करण्यात आले. पहिल्या व दुसऱ्या ग्रुपला प्रत्येकी २५० ग्रॅम पाने व एका ग्रुपला दहा ग्रॅम निळ्या व पांढऱ्या फुलांचे चूर्ण देण्यात आले. तिसऱ्या ग्रुपला गव्हाचा भरडा देण्यात आला. प्रयोगादरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये पहिल्या दोन्ही ग्रुपमध्ये हिमोग्लोबिन व कॅल्शियम वाढल्याचे दिसून आले.

सह्याद्री किंवा अन्य पठारी भागात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींचे पारंपरिक ज्ञान घेऊन त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करता येतो. अशा प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या ज्ञानाचे संकलन करणे गरजेचे आहे. वनस्पतीशास्र विभागाने अशा ४०० वनस्पतींचे डाक्युमेंटेशन केले आहे.

प्रा. वर्षा जाधव, वनस्पतीशास्र विभाग

शिवाजी विद्यापीठ राज्यात पहिले==========================='नॅक' च्या पुनर्मूल्यांकनामध्ये ३.१६ सीजीपीए मूल्यांकनासह राज्य...
06/04/2016

शिवाजी विद्यापीठ राज्यात पहिले
===========================
'नॅक' च्या पुनर्मूल्यांकनामध्ये ३.१६ सीजीपीए मूल्यांकनासह राज्यातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ ठरलेल्या शिवाजी विद्यापीठाने आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) या राष्ट्रीय क्रमवारीत २८ वे तर महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे एनआयआरएफने देशातल्या 'टॉप-१००' विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांची क्रमवारी सोमवारी जाहीर केली. विद्यापीठाने मिळवलेल्या यशाबद्दल अनेक मान्यवरांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

विविध खाजगी संस्था विविध प्रकारच्या निकषांवर शैक्षणिक संस्थांच्या निरनिराळ्या क्रमवारी प्रसिद्ध करीत असतात. तथापि, या पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २९ सप्टेंबर २०१५ रोजी एनआयआरएफची निर्मिती केली. विद्यापीठाने अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधनपर व व्यावसायिक कृतीशीलता, विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण, महिला व समाजातील विविध वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला होता. विद्यापीठाने सर्व माहिती एनआयआरएफच्या संकेतस्थळावर भरली होती. त्यानुसार प्राप्त झालेल्या माहितीच्या अधारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय क्रमावारी जाहीर केली.

क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाने पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवले आहे. विद्यापीठाबरोबरच संलग्नीत महाविद्यालयांनीही टॉप - शंभरमध्ये स्थान मिळ‍ले आहे. अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर या महाविद्यालयाने राष्ट्रीय क्रमवारीत ७५वे तर राज्यस्तरीय यादीत सातवे स्थान मिळविले आहे. फार्मसी संस्थांच्या यादीत कोल्हापूर येथील भारती विद्यापीठाच्या फार्मसी महाविद्यालयाने राष्ट्रीय क्रमवारीत २५वे तर राज्यस्तरीय यादीत पाचवे स्थान मिळविले आहे. शिवाजी विद्यापीठाबरोबर राज्यातील जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ५९ वे तर औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ८७ वे स्थान मिळवले आहे. राष्ट्रीय क्रमवारी जाहीर झाल्यानंतर बीसीयूडी संचालक डॉ. डी. आरे. मोरे यांच्या केबिनेमध्ये प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, पीआरओ अलोक जत्राटकर यांनी अभिनंद केले. विद्यापीठाने मिळवलेल्या यशामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

=================================================

'नॅक'च्या पुनर्मूल्यांकनात शिवाजी विद्यापीठाने सर्वश्रेष्ठ बहुमान पटकावला. विद्यापीठाच्या या कामगिरीवर केंद्रीय मंत्रालयाच्या क्रमवारीत मिळालेल्या स्थानामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. ज्या संशोधन आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर स्थान प्राप्त झाले आहे, ती आगेकुच कायम राखण्यासाठी सर्व घटक प्रयत्नशील राहतील.

- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

शिवाजी विद्यापीठ-सी डॅकमध्ये सामंजस्य करार=================================शिवाजी विद्यापीठ आणि प्रगत संगणन विकास केंद्र...
02/04/2016

शिवाजी विद्यापीठ-सी डॅकमध्ये सामंजस्य करार
=================================
शिवाजी विद्यापीठ आणि प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) या दोन महत्त्वपूर्ण संस्थांत शुक्रवारी सामंजस्य करार झाला. दोन्ही संस्थांच्या भावी शैक्षणिक व माहिती तंत्रज्ञानविषयक सहकार्य वृद्धीमध्ये मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मोना यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग आणि सी-डॅक यांच्यात प्रा. मोना व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. सामंजस्य करारावर विद्यापीठातर्फे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि सी-डॅकतर्फे सचिव कर्नल अनुपकुमार खरे यांनी स्वाक्षरी केल्या.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, विद्यापीठ स्तरावरील कॉम्प्युटिंगला काही प्रमाणात मर्यादा येतात. त्यामुळे या क्षेत्रातील 'सी-डॅक' या दिग्गज कंपनीसोबत सामंजस्य कराराची भूमिका घेतली. दोन्ही संस्थांमध्ये ज्ञान व माहितीचे होणारे आदान-प्रदान विद्यार्थी, शिक्षक, संशोधकांच्या दृष्टीने उपयोगी ठरेल. संगणक क्षेत्रातील संशोधन विकासालाही विद्यापीठात चालना मिळेल.'सी-डॅक'चे सह-संचालक महेश कुलकर्णी यांनी 'सी-डॅक'च्या वाटचालीचा आढावा घेतला. संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी स्वागत केले. कुलगुरू डॉ. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला.

प्रा. मोना म्हणाले, 'सी-डॅक' गेली २८ वर्षे कार्यरत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा देश अशी देशाची जगभर ओळख प्रस्थापित करण्यात 'सी-डॅक'ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विद्यापीठानेही मुडलसारख्या आधुनिक शिक्षण पद्धत स्वीकारली आहे विज्ञान विभागासह हिंदी भाषा अधिविभागातही आयसीटीविषयक अतिशय काम सुरू आहे. विद्यापीठासोबत केलेला एमओयू निश्चितच उपयोगी ठरेल.

** सामंजस्य कराराची उपयुक्तता -

संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञानाबरोबरच पूरक ज्ञान उपलब्ध होणार आहे. बीग डाटा अॅनालिसीस, फ्री अॅण्ड ओपन सोर्स डाटा यनिंग एम्बेडेड सीस्ट‌िम, वायरलेस सेन्सर नेटवर्क, व्ही. एल. एस. आय. डिझाइन, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, मल्टिलिंग्युअल टेक्नॉलॉजी यांसारख्या अत्यावश्यक संशोधन क्षेत्रांसंदर्भातील देवाण-घेवाण होईल. औद्योगिक क्षेत्रास आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार होण्यास बळ मिळेल. नवतंत्रज्ञान, संशोधन याबाबतीत या दोन शिखर संस्थांमध्ये चर्चासत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण कार्यशाळा होतील. त्याच लाभ संशोधक, विद्यार्थी व शिक्षकांना अद्यावत ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी होईल. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांतील बदल, संशोधनाच्या बाबतीत समन्वय व विचारविनिमय करता येणे शक्य होणार आहे. सी-डॅकमधील तज्ज्ञांची अभ्यागत व सहयोगी व्याख्याते म्हणून नियुक्त करता येऊ शकेल. पुणे येथे सी-डॅक प्रकल्प तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहे. विद्यार्थ्यांच्यात कौशल्ये विकसित केली जाणार असल्याने व्यवसाय-रोजगार संधी मिळविण्यासाठी फायदा होईल.

Address

Vidyanagar, Kolhapur/416 004
Kolhapur
416004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivaji University, Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shivaji University, Kolhapur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram