13/01/2026
*सहल एक आनंददायी प्रसंग*
सहल हा एक प्रत्येकाच्या जीवनातील आनंदाचा आणि विस्मरणीय क्षण...
डॉक्टर संदीप इंचनाळकर हे आपल्या कर्मचारी वर्गासोबत एक वेगळा अनुभव घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात आणि त्यातूनच आपल्या लोकांना प्रोत्साहन देतात...
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सहलीचा बेत टाकला आणि ठिकाण ठरले आंबा घाट कोकण. मग काय नेहमीप्रमाणे आम्ही सकाळी लवकर निघायचे ठरवले आणि त्याप्रमाणे आम्ही निघालो. जाताना गाडीमध्ये गाण्याच्या आवाजावर डान्स करत एन्जॉय सुरू झाला मध्ये थोडा चहा नाश्ता केला. हे सर्व करत करत आम्ही दुपारी बारा वाजता आंबाघाट मध्ये पोहोचलो. तिथे आम्ही एक रिसॉर्ट बुक केले आम्ही मारलेश्वर हे ठिकाण पाहण्यास गेलो. व तिथे गेल्यावर सर्वांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि सर्वांनी एन्जॉय केला. तिथून परत आम्ही रिसॉर्टवर आलो व दुपारचे जेवण केले. त्यानंतर सर्वांनी थोडी विश्रांती घेऊन स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा आनंद घेतला व गाण्याच्या सुरात डान्स केला. हे सगळ्या स्टाफ नी खूप आनंद घेतला.
त्यानंतर आम्ही चहा व नाश्ता केला त्यानंतर डॉक्टर संदीप इंचनाळकर सर आणि आम्ही सर्व स्टाफ ने एकत्र येऊन गेम खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही बॉल पासिंग हा गेम खेळला नंतर गाण्याच्या सुरात डान्स करत संगीत खुर्ची हा खेळ खेळला नंतर वॉटर बॉटल हा गेम खेळला. हे सर्व गेम खेळून झाल्यानंतर आम्ही सर्व स्टाफ नी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर सर्वांनी शेकोटीला बसून गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सर्वजण जंगल सफारीसाठी आंबा टू पावनखिंड ही जंगल सफारी केली जाताना विविध पॉईंट बघितले त्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट होता तो पावनखिंड. पावनखिंड या ठिकाणी मावळ्यांनी कशी झुंज केले असेल हे त्या ठिकाणी पाहून आम्हाला आश्चर्य वाटले कारण त्या ठिकाणची जागा अतिशय बारीक होती मावळ्यांची शौर्यगाथा त्या ठिकाणी आम्हाला दिसून आली. त्यानंतर आम्ही पुन्हा परत रिसॉर्टवर पोहोचलो व चहा व नाश्ता करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. या प्रकारे आम्ही दोन दिवस सहलीचा सुखद अनुभव घेतला.