10/09/2025
*आज माननीय श्री प्रकाशजी आबिटकर, मंत्री, सामाजिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य*
यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेण्यात आली , आयुर्वेद वैद्यांच्या सर्व मागण्या त्यांनी सविस्तर ऐकून घेतल्या.
या मीटिंग साठी *मर्म संस्थेचे अध्यक्ष वैद्य अजित राजिगरे यांनी विशेष पुढाकार घेतला , याला निमा आयुर्वेद फोरम सेंट्रल कौन्सिल चे अध्यक्ष वैद्य निलेश लोंढे ,खजिनदार वैद्य महेश पाटील , सभासद वैद्य सागर अर्डक , ग्लोबल आयुर्वेद प्रॅक्टिंशनर असोसिएशन चे अध्यक्ष वैद्य विक्रांत पाटील , खजिनदार वैद्य श्याम जगताप , निमा महाराष्ट्र आयुर्वेद फोरम चे अध्यक्ष वैद्य अमोल ठवळी ,निमा पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष व निमा सेंट्रल कौन्सिल प्रवक्ता डॉ प्रताप सोमवंशी* यांचे सहकार्य लाभले, *महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन व आयुर्वेद व्यासपीठ* यांचे सुद्धा सहकार्य लाभले .तसेच या संदर्भात *आयुर्वेद डॉक्टर व आमदार असलेले मा किरण लहामटे* यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.
*विषयः आयुर्वेद क्लिनिक,पंचकर्म सेंटर यांना बायो मेडिकल वेस्ट व बॉम्बे नर्सिंग एक्ट नियमावलीत सुधारित बदल करण्याबाबत निवेदन देण्यात आले*
वरील विषयास अनुसरून *बॉम्बे नर्सिंग एक्ट* च्या अंतर्गत महाराष्ट्रात जे रुग्णालयांच्या तपासण्या केल्या जातात, त्यात आयुर्वेद रुग्णालयांना ही एलोपॅथी रुग्णालया प्रमाणे निकष लावले जातात.
या मध्ये दोन्ही पॅथी च्या गरजांमध्ये तफावत असून एकसारखे नियम लागू होऊ शकत नाही. त्या संबंधी आमच्या काही अडचणी व मागण्या मांडण्यात आल्या .
1. *आयुर्वेद क्लिनिक पंचकर्म सेंटर, आयुर्वेद हॉस्पिटल यांची रजिस्ट्रेशन साठी वेगळी प्रोसेस* असावी त्यामध्ये नर्सिंग स्टाफ ए एन एम ,जी एन एम ,बी एस सी नर्सिंग स्टाफ यांची आवश्यकता नसून त्या ऐवजी पंचकर्म थेरपीस्ट कोर्स , पेशंट असिस्टंट कोर्स केलेला स्टाफ ची आवश्यकता असते तर अशा अनुषंगाने त्यामध्ये तशी तरतूद असावी
2. *बायोमेडिकल वेस्ट चार्जेस* हे इतर हॉस्पिटल प्रमाणे न आकारता शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी याची वेगळी सोय असावी कारण त्यांच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात बायो मेडिकल वेस्ट निर्माण होत असते
3. *एमपीसीबी चे सर्टिफिकेट* घेत असताना त्याच्यामध्ये सुद्धा शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी वेगळी सोय असावी
4. सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्रमाणेच *राज्य कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या हेल्थ स्कीम* मध्ये किंवा त्यांच्या पॉलिसीमध्ये आयुर्वेद उपचारांची सोय असावी तसेच राज्य कर्मचाऱ्यांना आयुर्वेद उपचार घेण्यासाठी आयुर्वेदाचे हॉस्पिटल सुद्धा इम्पेनल करण्यात यावी
5. *आयुर्वेद व पंचकर्म* हा शब्द फक्त रजिस्टर्ड प्रॅक्टिशनरनेच वापरावा इतर कोणीही वापरू नये वापरल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी किंवा वेलनेस सेंटर आयुर्वेद व पंचकर्म उपचार होणार असल्यास त्यामध्ये आयुर्वेदिय वैद्यांची नेमणूक करण्यात यावी.
६. एखाद्या *ऑलोपॅथी हॉस्पिटल मध्ये आयुर्वेद युनिट सुरु करावयाचे असल्यास त्यासंबंधित नियम असावेत व तशी सोय रेजिस्ट्रेशन प्रोसेस* मध्ये असावी
आयुर्वेदाच्या राजश्रयासाठी प्रयत्न करत असलेल्या सर्व वैद्य व संघटनांचे मनापासून आभार !!!
जय आयुर्वेद