29/11/2025
उपचाराने आले नवे आयुष्य ...
श्रीमती छाया सतीश शिंदे, रा. मनमाड, या गेल्या 1 डिसेंबरपासून SJS हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कर्करोगावर उपचार घेत आहेत. त्यांना कॅन्सरसाठी 12 केमोथेरपी आणि 35 रेडिएशनचे डोस मिळाले.
पूर्वीची अडचण: उपचारांमुळे त्यांना खाण्या-पिण्यात खूप त्रास होत होता.
नवीन उपाय: डॉ. मुकेश चंद्रे यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर नुकतीच स्टेन्ट टाकण्याची प्रक्रिया करण्यात आली.
परिणाम : स्टेन्ट टाकल्यामुळे त्यांना आता खाता-पिता येत आहे.
दवाखाना नव्हे, घर!
श्रीमती शिंदे यांनी हॉस्पिटलमधील सेवा आणि डॉक्टरांच्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे:
उत्कृष्ट काळजी : "सगळे डॉक्टर आणि स्टाफ एकदम घरच्यांसारखे माझी खूप काळजी घेतात. जसं काय मी माहेरघरात आहे असं वाटतं."
योजनेचा लाभ : त्यांचे केमोथेरपी आणि रेडिएशनचे उपचार शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत मोफत झाले आहेत.
अखंडित सेवा: हॉस्पिटलने त्यांना खूप छान सहकार्य केले आहे.
प्रतिक्रिया : "आता आम्हाला जायची वेळ आली, तर आम्हाला असे (रडायला) होते."
SJS हॉस्पिटल हे
हॉस्पिटल नाही मायेचे घर....