18/11/2025
☀️ *एमडीए स्कूल ऑफ फार्मसी चे ऍथलेटिक्स स्पर्धेत यश* 🏛️
🔖डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत सोलापूर विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धा - २०२५ या कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दि. १६/११/२०२५ रोजी पार पडल्या. यामध्ये एमडीए स्कूल ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी ऍथलेटिक्स स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले.
🔖 या पंढरपूर येथील विभागीय स्पर्धेत हाय जंप, ट्रिपल जंप, गोळा फेक, पंधराशे मीटर व आठशे मीटर धावणे इत्यादी स्पर्धा पार पडल्या.
🔖 या क्रीडा स्पर्धेमध्ये कु. निशा पवार या विद्यार्थिनीने हाय जंप या खेळामध्ये प्रथम पारितोषिक मिळवले.
🔖कु.वर्षा राठोड या विद्यार्थिनीने ट्रिपल जंप प्रकारामध्ये प्रथम पारितोषिक मिळवले.
🔖कु. पूजा मुंडे हिने 400 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळवले.
🔖विक्रम सूर्यवंशी या विद्यार्थ्याने ट्रिपल जंप या क्रीडा प्रकारात द्वितीय पारितोषिक मिळवले.
🔖गोविंद सूरनर या विद्यार्थ्याने गोळा फेक या क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय पारितोषिक मिळवले.
🔖कु. वैष्णवी गंगावारे या विद्यार्थिनीने पंधराशे मीटर धावणे स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळवले.
🔖कु. पूजा मुंडे या विद्यार्थिनीने 800 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले.
🔖या विविध ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना एमडीए शैक्षणिक संकुलाचे संचालक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री रवी कुऱ्हाडे सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
🔖या यशस्वीतेसाठी एमडीए फाउंडेशनचे संचालक श्री दिनेश भैय्या अंबेकर, श्री यशवंत भैय्या अंबेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.