18/08/2021
पावसाळ्यामध्ये साथीच्या आजारां बरोबरच डासांमार्फत होणाऱ्या आजारांचा पण प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असतो. जसे की
#डेंग्यू, #मलेरिया, #चिकनगुनिया, वेस्ट नाईल व्हायरस, झिका व्हायरस, यलो फिव्हर इ.
#डेंग्यू चे डास हे स्वच्छ पाण्यावर तयार होतात आणि ते दिवसा चावतात, तर #मलेरिया चे डास हे अस्वच्छ पाण्यावर तयार होतात आणि सायंकाळी रात्री चावतात.
डेंग्यू न होण्यासाठी स्वच्छ पाणी झाकून ठेवावे, पावसाचे पाणी घराबाहेर असलेल्या कुंड्यांमध्ये, भांड्यांमध्ये, टायर किंवा तत्सम वस्तू मध्ये फार दिवस राहिल्यास डेंग्यू चे डास त्यामध्ये अंडी सोडतात. आणि त्यापासून भरपूर डासाची निर्मिती ही पावसाळ्यामध्ये होत असते. दर आठवड्याला घरातील साठवलेले पाणी काढून कोरडा दिवस साजरा करावा, जेणेकरून यदाकदाचित या पाण्यामध्ये डासांनी सोडलेली अंडी असतील तर ती नष्ट होतील.
मलेरियाचे डासांची पैदास न होण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा. उघड्या गटारी बंद कराव्यात तसेच साठलेल्या पाण्यावर, डबक्यावर केरोसिन तेल किंवा तत्सम तेल टाकावे, जेणेकरून डास आणि डासांच्या आळ्या त्या तेलाच्या खाली गुदमरून मरतात. पाण्याचा साठा फारच असेल तर त्यात गप्पी मासे सोडले तर ते डासांच्या आळ्या (लारव्हा) खातात त्यामुळे डासाची निर्मिती कमी होते.
घरी डासांपासून संरक्षण करण्यासाठी पूर्ण कपडे वापरावेत, डास रोधक जाळ्या खिडक्यांना लावाव्यात तसेच डासांना पळवून लावणारे काही द्रव्य जसे की गुड नाईट, हे शक्यतो 24 तास चालू ठेवावेत.
बाकी खजूर, पपई खाऊन डेंग्यू होत नाही हे चुकीचे आहे. झाल्यानंतर शुद्ध शाकाहारी आहार करावा आणि पाणी जास्तीत जास्त प्यावे. कुठल्याही पोस्ट किंवा अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या डॉक्टरांना दाखवून त्वरित तपासण्या करून इलाज केला तर डेंग्यू पासून आपली नक्कीच लवकरात लवकर सुटका होऊ शकते. अजूनही डेंग्यू वर लस ही बाजारात उपलब्ध नाही.
काळजी घ्या, सुरक्षित रहा.... 👍
- #डॉहोनमानेसुरेश.
एम. डी. बालरोगतज्ञ